महागाई दर वाढल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. रेपो रेटमध्ये ५० बेसिस पॉइंटची (०.५० टक्के) वाढ करण्यात आली आहे. यासोबत रेपो रेट ४.९ टक्क्यांवर पोहोचला आहे. एक महिन्याच्या अंतराने रेपो रेटमध्ये करण्यात आलेली ही दुसरी वाढ आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरण निर्धारण समितीच्या (एमपीसी) बैठकीनंतर रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आल्याची माहिती दिली आहे.
तसेच आरबीआयने युनिफाइड पेमेंट इंटरफेसशी (यूपीआय) क्रेडिट कार्ड लिंक करण्याची परवानगी दिली आहे. सर्वसामान्यांना मोठा दिलासा म्हणून याकडे पाहिले जात आहे. या सुविधेचा लाभ तुम्हाला कसा घेता येईल, हा प्रश्न अनेकांना पडले आहे.
यूपीआय म्हणजे काय?
त्याआधी युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजे काय समजून घेणे आवश्यक आहे. यूपीआय ही एक संकल्पना आहे जी एका मोबाइल अॅपद्वारे अनेक बँक खात्यांना पैसे हस्तांतरित करण्याची परवानगी देते. प्रत्येक पेमेंट अधिकृत करण्यासाठी, मोबाइल पिन प्रविष्ट करणे आवश्यक आहे. त्यानंतरच तुम्ही पेमेंट करू शकता.
काय आहे नवीन सुविधा?
सध्या यूपीआयला डेबिट कार्डद्वारे बचत किंवा चालू खात्याशी लिंक केले जाऊ शकते आणि याद्वारे तुम्ही पेमेंट करू शकता. मात्र, आता यामध्ये क्रेडिट कार्डचा पर्यायही उपलब्ध झाला आहे. आरबीआयच्या नव्या सुविधेमुळे डिजिटल व्यवहारांना तर चालना मिळेलच, पण वापरकर्त्यांना पेमेंटचा नवा पर्यायही मिळेल. तुम्ही खरेदी करण्यापासून ते क्रेडिट कार्डला जोडून पैसे ट्रान्सफर करण्यापर्यंत सर्व काही करू शकता.
समजा पहिल्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीला पैसे ट्रान्सफर करायचे आहेत. पहिल्या व्यक्तीच्या बँक खात्यात पैसे नाहीत, म्हणून तो त्याच्या क्रेडिट कार्डमधून पैसे दुसऱ्या व्यक्तीला देण्याच्या विचारात आहे. आतापर्यंतच्या सुविधेनुसार, तुम्ही क्रेडिट कार्डवरून कोणत्याही थर्ड पार्टी अॅप असलेल्या पेटीएम, मोबिक्विक, फोनपे इत्यादीद्वारे पैसे पाठवू शकता. पण त्याबदल्यात शुल्क भरावे लागते.
मात्र, नवीन सुविधेत तुम्ही थेट यूपीआयद्वारे दुसऱ्याच्या बँक खात्यात पैसे पाठवू शकाल. याचा अर्थ असा की पहिल्या व्यक्तीला आता क्रेडिट कार्डने पैसे देण्यासाठी थर्ड पार्टी अॅपची गरज भासणार नाही. तो दुसऱ्या व्यक्तीला थेट पैसे ट्रान्सफर करू शकेल. या बदल्यात कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. आरबीआयने शुल्काबाबत स्पष्टपणे काहीही सांगितले नसले तरी ही सुविधा रुपे क्रेडिट कार्डने सुरू होणार आहे.
त्याचप्रमाणे दुसरी व्यक्ती दुकानात गेली तर त्याला एक स्कॅनर मिळेल, जो स्कॅन केल्यानंतर तो यूपीआयद्वारे क्रेडिट कार्डने पैसे भरू शकेल. यादरम्यान दुसरी व्यक्तीला कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही. ज्या प्रकारे तुम्ही सामान्यतः क्रेडिट कार्ड वापरता आणि शुल्क भरावे लागते, त्याच प्रकारे तुम्हाला यूपीआयद्वारे पेमेंट करण्यासाठी क्रेडिट कार्ड चार्ज देखील भरावा लागेल. याचा अर्थ जे काही अतिरिक्त शुल्क आकारले जाईल ते क्रेडिट कार्डवर असणार आहे.
Google Pay वर उपलब्ध पर्याय
गुगल पे सारख्या काही पेमेंट अॅप्सवर, यूपीआय मध्ये क्रेडिट कार्ड जोडण्याचा पर्याय आधीपासूनच आहे. मात्र, ते केवळ व्यापाऱ्यासाठी आहे. याचा अर्थ असा की तुम्ही व्यापाऱ्याला पैसे देऊ शकता आणि कोणत्याही खाजगी व्यक्तीला नाही.
गुगले पेसारख्या अॅप्सवर डेबिट/क्रेडिट कार्ड जोडण्याचा पर्याय फक्त ‘पे बिजनेस’ विभागासाठी आहे. ही सुविधा कोणत्याही व्यक्तीला पैसे भरण्यासाठी उपलब्ध नाही. आरबीआय आपल्या ताज्या निर्णयाबद्दल लवकरच मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार आहे. त्यानंतर परिस्थिती अधिक स्पष्ट होईल.