इंटनरेट आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक बनला आहे. कोणाला काही माहिती हवी असेल किंवा मग ऑनलाइन पेमेंट करायचं असेल इंटरनेटशिवाय काम होत नाही. परंतु इंटरनेटचेही एक वेगळे जग आहे. आपल्या आयुष्याप्रमाणेच इंटरनेटच्या या जगातही बरच काही घडत असतं. या जगात एक शब्द डार्क वेब सुद्धा आहे. जाणून घेऊयात याबद्दलची माहिती.
तुम्ही अनेकदा हा शब्द ऐकला असेल, बहुंताशवेळा डेटा लिंक संदर्भातील घटनांमध्ये हा शब्द वापरला जातो. यास इंटरनेटच्या जगातील ते काळं गुपित म्हणतात, जिथे आपला बहुतांशी डेटा असतो. या डेटाचीही कधी कवडीमोल दरात तर कधी उच्च दराने विक्री केली जाते.
तीन भागात आहे इंटरनेटचे जग –
ज्याप्रकारे आपले जग जमीन, आकाश आणि पाणी या तीन भागात विभागले आहे. त्याचप्रमाणे इंटरनेटचे जगही विभागलेले आहे. इथे जे आपण पाहत आहोत, शोधत आहोत तो इंटरनेटच्या जगाचा फार छोटा हिस्सा आहे. आपल्याला जे इंटरनेटवर दिसते ते ओपन वेब किंवा सर्फेस वेबचा हिस्सा आहे. रिपोर्ट्सनुसार संपूर्ण इंटरनेटच्या हे केवळ पाच टक्के आहे. म्हणजे तुम्ही गुगल, बिंग किंवा अन्य सर्च इंजिनवर जे काही सर्च करत आहात, ते सर्व इंटरनेटच्या जगाच्या केवळ पाच टक्केच आहे. तुम्ही हे वेबपेज यासाठी पाहू शकता कारण, सर्च इंजिन यांना इंडेक्स करते. मात्र इंटरनेटचे जग यापेक्षा कितीतरी मोठे आहे.
Deep Web काय आहे? –
ज्याप्रमाणे पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली पाण्याचे जग आहे. त्याचप्रमाणे इंटरनेटच्या जगात डीप वेब आहे. हा इंटरनेटच्या ९० टक्क्यांपेक्षा जास्त हिस्सा आहे. असे म्हटले जाते की इंटरनेटचा हा हिस्सा इतका मोठा आहे की येथे किती वेबपेज किंवा वेबसाइट अॅक्टीव्ह आहेत, हे कोणीच शोधू शकत नाही. याला आपण महासागर म्हणू शकतो, ज्यामध्ये गुगल किंवा अन्य सर्च इंजिन हे एका छोट्याशा मासे पकडणाऱ्या बोटी प्रमाणे आहेत. डीप वेबमध्येच इंटरनेटचे काळे जग सापडते, ज्याल लोक डार्क वेब म्हणतात. अनेकदा डीप वेब आणि डार्क वेब हे एकच असल्याच समजलं जातं. इथे तुम्हाला डेटाबेस पासून इंट्रानेट्स मिळते. जर तुम्ही विचार करत असाल की याचा वापर कसा करता येईल, तर कदाचित शक्यता अशीही आहे की तुम्ही हे रोज वापरत असाल. डीब वेप टर्म त्या वेबपेजेससाठी वापरली जाते, ज्यांना सर्च इंजिन ओळखू शकत नाहीत. तसंतर यावरील बहुतांश कंटेट हा सुरक्षितच असतो आणि हे युजर्सची प्रायव्हसी जपण्यासाठी हाइड केलेले असते.
Dark web काय आहे? –
डार्क वेब इंटरनेटच्या जगातील तो हिस्सा आहे, जिथपर्यंत सर्च इंजिन पोहचू शकत नाही. हे स्पेशल वेब ब्राउझरने अॅक्सिस करता येते. हा डीप वेबचाच एक भाग मानला जातो. डार्क वेबला अतिशय धोकादायक मानले गेले आहे. या ठिकाणी अनेक अवैध धंदे होत असतात.
सायबर जगतात अवैध कामांचा ठिकाण मानलं जातं. कधी या जगात हॅकर्स, लॉ इंफोर्समेंट ऑफिसर्स आणि सायबर गुन्हेगारांचे दबदबा होता. खरंतर एन्क्रिप्शन आणि The Onion Router सारख्या नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने लोक डार्कवेब पर्यंत पोहचू शकतात.
तसं पाहीलं तर डार्क वेबचा वापर बेकायदेशीर नाही, मात्र याचे अनेक धोके असतात. इथे तुम्ही स्कॅम, संशीय सॉफ्टवेअर किंवा सरकारी मॉनिटरिंगचे शिकार ठरू शकतात. हेच कारण आहे की सामान्य यूजर्सना इंटरनेटच्या जगापासून दूर राहण्याचाच सल्ला दिला जातो.