दत्ता जाधव
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अमूल, मदर डेअरी, गोकुळ, चितळे डेअरीसह राज्यातील सर्वच लहान-मोठय़ा दुग्ध व्यावसायिकांनी आपल्या दूध विक्री दरात सरासरी दोन रुपयांनी वाढ केली आहे. देशात दूध आणि दुग्धजन्य पदार्थाच्या दरात तेजी असताना जगभरात दूध उत्पादन कसे आहे? दूध आणि दुग्धजन्य पदार्थाच्या दरात तेजी आहे काय?
जगभरात दूध उत्पादनात घट झाली आहे का?
तीव्र उष्णतेच्या लाटा, दुष्काळ, अतिवृष्टी, पूर, जंगलांना लागलेल्या आगी आदी नैसर्गिक आपत्तींमुळे जगभरात दुधाच्या उत्पादनात घट झाली आहे. मागणी जास्त आणि उत्पादनात घट झाल्यामुळे जगभरात दूध आणि दुग्धजन्य पदार्थाच्या दरात तेजी आहे. अर्जेटिना, ऑस्ट्रेलिया, युरोपीयन युनियन, न्यूझीलंड आणि अमेरिका दूध आणि दुग्धजन्य पदार्थाचे प्रमुख जागतिक निर्यातदार देश आहेत. यापैकी फक्त अर्जेटिनामध्ये दूध संकलनात किरकोळ एका टक्क्याने वाढ आहे. अन्य देशांत नैसर्गिक आपत्तींमुळे दूध उत्पादनात घट झालेली आहे. ऑस्ट्रेलियातील दूध उत्पादन तीन टक्क्यांनी, युरोपीय संघातील देशांचे उत्पादन दोन टक्क्यांनी तर न्यूझीलंडचे उत्पादन एक टक्क्याने घटले आहे.
हेही वाचा >>> विश्लेषण : आंदोलक शेतकरी पुन्हा दिल्लीत दाखल; नेमकं राजधानीत घडतंय काय? शेतकऱ्यांच्या काय आहेत मागण्या?
दूध उत्पादनात घट होण्याचे कारण काय?
करोनाकाळात जगभरात टाळेबंदी होती. त्यामुळे दुधाची मागणी घटली. जागतिक आयात-निर्यात बंद झाल्यामुळे जगाला दूध आणि दुग्धजन्य पदार्थाचा पुरवठा करणाऱ्या देशांची आर्थिक कोंडी झाली. मागणीअभावी दुधाचे दर पडल्यामुळे दुग्ध व्यवसायाचे मोठे नुकसान झाले. त्याचा परिणाम म्हणून अनेक शेतकरी दुग्ध व्यवसायातून बाहेर पडले आहेत. गायीच्या मांसाच्या (बीफ) दरात वाढ झाल्यामुळे दूध देणाऱ्या गायींचीही मांसासाठी कत्तल झाली. त्यामुळे दूध देणाऱ्या गायींच्या संख्येत मोठी घट झाली आहे व गायींच्या गोठय़ात काम करणाऱ्या मजुरांची संख्या घटत चालली आहे. गोठय़ात काम करण्यास मजूर मिळत नाहीत, त्यामुळे मजुरीवरील खर्च वाढला आहे. दुष्काळ, उष्णतेच्या लाटांमुळे हिरव्या आणि पोषक चाऱ्यांची उपलब्धता कमी झाली आहे. अन्नधान्याच्या किमतीत जगभरात वाढ झाल्यामुळे पशुखाद्यांच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. या सर्वाचा परिणाम दूध उत्पादनावर दिसून येत आहे.
जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत?
करोनाकाळात दुग्धजन्य पदार्थाची जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली होती. ती अद्याप सुरळीत झालेली नाही. चीझ निर्यातीत ऑस्ट्रेलिया, बेलारूस, युरोपीय संघ, न्यूझीलंड आणि अमेरिका हे आघाडीवरील देश आहेत. जागतिक बाजारातील न्यूझीलंडचा वाटा पाच टक्क्यांनी घटला आहे. बटरच्या दरात तेजी असल्यामुळे बेलारूस, युरोपीयन युनियन, न्यूझीलंड आणि अमेरिका या प्रमुख निर्यातदार देशांनी बटरच्या उत्पादनावर भर दिला आहे. इतर देशांनी दोन टक्क्यांनी तर अमेरिकेने आठ टक्क्यांनी बटरच्या उत्पादनात वाढ केली आहे. मात्र करोनानंतर जागतिक बाजारात आलेली अस्थिरता अद्याप निवळलेली नाही.
हेही वाचा >>> विश्लेषण : ‘गेम ऑफ थ्रोन्स’च्या प्रिक्वलमध्ये उलगडणार ‘हाऊस ऑफ ड्रॅगन’चं रहस्य; कोणत्या प्रश्नांची मिळणार उत्तरं? जाणून घ्या…
दूध पावडरीची जागतिक बाजारात टंचाई?
जागतिक बाजारात दूध पावडरची टंचाई निर्माण झाली आहे. स्निग्धांश नसलेल्या दूध पावडरच्या उत्पादनात ऑस्ट्रेलियाने चार टक्क्यांनी, युरोपीय संघाने ११ टक्क्यांनी आणि अमेरिकेने एका टक्क्याने कपात केली आहे. तर स्निग्धांश असलेल्या दूध पावडरच्या उत्पादनात युरोपीय संघाने १३ टक्क्यांनी आणि न्यूझीलंडने नऊ टक्क्यांनी कपात केली आहे. याचा परिणाम म्हणून जागतिक बाजारात दूध पावडरच्या दरात तेजी आहे.
सर्वाधिक गायी भारतात; उत्पादनात पिछाडी?
अमेरिकेच्या कृषी विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जगातील एकूण एक अब्ज नऊ लाख ६७ हजार गायी आहेत. गायींपैकी ३०.५२ टक्के म्हणजे ३० कोटी ५५ लाख गायी एकटय़ा भारतात आहेत. परंतु दूध उत्पादनात भारताचा क्रमांक सर्वात शेवटी लागतो. जागतिक दूध आणि दुग्धजन्य पदार्थाच्या बाजारात भारताची दखलही घेतली जात नाही. देशात तयार होणारी दूध पावडर, चीझ, बटर आदी उत्पादने बांगलादेश, श्रीलंका आणि आखाती देशांना निर्यात होतात. युरोपीय बाजारपेठेत अद्यापही आपल्याला शिरकाव करता आलेला नाही. दर्जा आणि किमतीच्या बाबत देशातील उत्पादने जागतिक बाजारात टिकू शकत नाहीत.
datta.jadhav@expressindia.com