स्कॉटलंडमध्ये केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की करोनाची लागण झालेल्या २० व्यक्तींपैकी एक व्यक्ती अद्यापही पूर्णपणे बरा झालेला नाही. याशिवाय, करोनाची लागण झालेल्या प्रत्येक दहा पैकी चार रुग्णांचे असे म्हणणे आहे की, करोनाची लागण होऊन अनेक महिने उलटूनही ते अद्याप पूर्णपणे बरे झालेले नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दहा हजार लोकांवर अभ्यास –

तब्बल दहा हजार जणांवर करण्यात आलेला हा अभ्यास नेचर कम्युनिकेशन्स जर्नलमध्ये मागील आठवड्यात प्रकाशित झाला होता. ज्यामध्ये संशोधकांनी दीर्घकाळ करोनाच्या धोक्यांचा अभ्यास केला. अभ्यास सांगण्यात आले आहे की, ज्या लोकांमध्ये करोनाच्या अगोदरही लक्षणं आढळली आहेत, ज्यामध्ये श्वास घेण्यास त्रास, हृदयाचे ठोके जलद होणे आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचण या सारख्या लक्षणांचे प्रमाण संक्रमित नसेलेल्यांच्या तुलनेत तिप्पट आहे.

अभ्यास सांगतो की, या रुग्णांनी हृदय, श्वासोच्छवासाच्या समस्या, स्नायू दुखणे, मानसिक ताण आणि संवेदना प्रणालीशी निगडीत २० पेक्षा अधिक समस्यांचा सामना केला आहे. या अभ्यासात करोनाची लक्षणे न दिसणाऱ्या करोना संक्रमित लोकांच्या दीर्घकालीन समस्यांशी निगडीत धोक्यांना अधोरेखित केले गेले नाही.

जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) महासंचालक टेड्रोस म्हणतात की, जागतिक स्तरावर ही परिस्थिती लोकांचे जीवन आणि त्यांचे आरोग्य उद्ध्वस्त करत आहे.