जन्मानंतर एक तासाच्या आत स्तनपान सुरू केले पाहिजे, कारण आईचे दूध बाळासाठी अमृतसारखे असते. सहा महिने फक्त स्तनपान दिले पाहिजे. अर्भक आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी हे आवश्यक आहे, असे डॉक्टर सांगतात. मात्र पोषणविषयक अलीकडेच प्रकाशित मार्गदर्शक तत्त्वांमध्ये, केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेने शिफारस केली आहे की नवजात बालकांना तूप आणि मध यांचे मिश्रण द्यावे ज्यात काही सायकोएक्टिव्ह घटक आहेत. यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मार्गदर्शक तत्त्वे जन्माच्या पहिल्या दिवशी काही औषधी वनस्पतींसह मध आणि लोणी, दुसऱ्या दिवशी औषधी वनस्पतींसह तूप आणि जन्माच्या तिसऱ्या दिवशी फक्त तूप आणि मधासह कोलोस्ट्रम (आईचे पहिले दूध) शिफारस करतात.

kama Hospital study shows increased diabetes prevalence in pregnant women due to changing lifestyles
गर्भधारणेच्या वेळी महिलांना मधुमेहाचा धोका
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Supreme Court on maternity leave
दत्तक मूल तीन महिन्यांपेक्षा मोठे असल्याने मातृत्व रजा नाकारली ; सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे मागितले उत्तर
chatura cesarean delivery
स्त्री आरोग्य: गर्भजल कमी असल्यास ‘सिझेरियन’ अनिवार्य आहे?
diet of small babies, Health Special, Health tips,
Health Special: लहान बाळांचा आहार कसा असावा?
Nurses without pay for four months Mumbai print news
परिचारिका चार महिने वेतनाविना
Garlic Rate, Vegetable Rate, Pune, Garlic,
लसूण महागला, परराज्यातील लसणाची आवक कमी
Loksatta explained Why has the central government recommended the influenza vaccine
केंद्र सरकारने इन्फ्लूएन्झा लशीची शिफारस का केली आहे? भारताला फ्लूचा विळखा?

तर बऱ्याच डॉक्टरांनी या मार्गदर्शक तत्त्वांना स्तनपानाच्या फायद्यांचा विरोधाभास म्हटले आहे. काहींनी नमूद केले आहे की नवजात बालकांना मध खाण्यासाठी दिल्याने बोट्युलिझम नावाचा दुर्मिळ परंतु गंभीर संसर्ग होऊ शकतो.

विश्लेषण : नवमाता आणि पालक आता फॉर्म्युला मिल्क उत्पादकांच्या रडारवर? काय आहे हे प्रकरण?

स्तनपान कधी सुरू करावे?

डॉक्टरांचे म्हणणे आहे की स्तनपान शक्य तितक्या लवकर सुरू केले पाहिजे, शक्यतो जन्माच्या एका तासाच्या आत, आणि बाळांना केवळ सहा महिने स्तनपान दिले पाहिजे. “जन्मानंतर लगेचच स्तनपान सुरू करणे महत्त्वाचे आहे. कोलोस्ट्रममध्ये भरपूर प्रमाणात अँटीबॉडी असतात आणि ते संक्रमणापासून त्यांचे संरक्षण करतात. खरं तर, मध, साखर, मीठ आणि गाईचे दूध एका वर्षाच्या वयापर्यंत मुलाला देऊ नये,” असे मधुकर रेनबो चिल्ड्रन हॉस्पिटलचे संचालक डॉ नितीन वर्मा यांनी सांगितले.

लहान मुलांनी वयाच्या आधी मध सेवन केल्याने बोट्युलिझमशी संबंधित जीवाणूंच्या संसर्गामुळे विषबाधा होते. ज्यामुळे डोळा, चेहरा, तोंड आणि घशाचे स्नायू कमकुवत होतात, जे धड आणि पायांमध्ये देखील पसरू शकतात. जीवाणूचे बीजाणू वातावरणात मोठ्या प्रमाणावर असले तरी, दूषित मध हे अर्भक बोट्युलिझमचे एक कारण आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन आणि मेयो क्लिनिक हे सर्व एक वर्षाखालील मुलांना मध न देण्याची शिफारस करतात.

सफदरजंग हॉस्पिटलमधील प्रसूती आणि स्त्रीरोगशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका डॉ. रुपाली दिवाण म्हणाल्या की, “लवकर स्तनपान केल्याने दुधाचे प्रमाण वाढते आणि त्यांच्यातील संबंध वाढतात. आमच्या हॉस्पिटलमध्ये, आमच्या परिचारिका हे पाहतात की प्रसूती कक्षामध्ये स्तनपान सुरू करण्यात आले आहे की नाही. सहा महिने बाळांना दुसरे काहीही प्यायला देऊ नये, अगदी पाणीही नाही.”

सहा महिने का?

“आईच्या दुधात सहा महिन्यांपर्यंत पुरेशा कॅलरी असतात. लहान मुले फक्त ठराविक प्रमाणात द्रवपदार्थ घेऊ शकतात. समजा ते 800 मिली द्रवपदार्थ सेवन करु शकतात आणि जर तुम्ही त्यांना १०० मिली पाणी दिले तर ते १०० मिली दुधात असलेल्या कॅलरीजपासून वंचित राहतील,” डॉ वर्मा म्हणाले.

अन्न सहा महिन्यांनंतर दिले केले पाहिजे. मौलाना आझाद मेडिकल कॉलेजच्या कम्युनिटी मेडिसिनच्या प्राध्यापिका डॉ सुनिला गर्ग म्हणाल्या, “फक्त सहा महिन्यांनंतर, जेव्हा बाळाचे वजन दुप्पट होते, तेव्हा आईचे दूध पुरेसे नसते आणि घन पदार्थांच्या रूपात पूरक आहार घेणे आवश्यक असते.”

डॉ. वर्मा म्हणाले, “असे संदेश (मध आणि औषधी वनस्पतींबद्दल) लोकांना गोंधळात टाकतात, विशेषत: जे फार शिकलेले नाहीत. सहा महिने फक्त स्तनपानच असावे असा स्पष्ट संदेश देणे चांगले आहे.”

भारतात स्तनपानाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे किती प्रमाणात पालन केले जाते?

“आमच्या सर्वोत्कृष्ट प्रयत्नांनंतरही, केवळ ५६ टक्के ते ६० टक्के स्त्रिया आपल्या मुलांना स्तनपान करतात. काही करू शकत नाहीत, पण काही फॉर्म्युला दुधाचा पर्याय निवडतात. पण याची शिफारस केलेली नाही. दुधाच्या बाटल्या प्रत्यक्षात घातक असतात. बाटलीच्या प्रत्येक वापरानंतर उकळलेल्या पाण्यात १० मिनिटे निर्जंतुक करणे आवश्यक आहे. १०० टक्के निर्जंतुकीकरण कायम राखणे शक्य नाही आणि यामुळे मुलांमध्ये अतिसार होतो,” डॉ गर्ग म्हणाले.