१७ वर्षांमध्ये पहिल्यांदाच कमी यूजर्समुळे फेसबुकला तोटा सहन करावा लागत आहे. फेसबुकची मूळ कंपनी मेटाने युजर्सची संख्या कमी झाल्यामुळे त्यांच्या नफ्यावर परिणाम झाल्याचे जाहीर केले आहे. याचा थेट परिणाम कंपनीकडून मिळणाऱ्या जाहिरातींवरही होणार आहे. ट्रेडिंगच्या काही तासांमध्ये कंपनीच्या शेअर्सच्या किंमती २२ टक्क्यांनी घसरल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फेसबुकची घसरण का झाली?

ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत, फेसबुकच्या दैनंदिन सक्रिय यूजर्समध्ये सुमारे अर्धा दशलक्ष घट झाली. जुलै-सप्टेंबर दरम्यान यूजर्सची संख्या १.९३० अब्ज वरून १.९२९ अब्ज झाली आहे. हे नुकसान प्रामुख्याने आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेतील यूजरबेसमुळे झाले आहे, असे त्यात म्हटले आहे. कंपनीने तीन महिन्यांच्या कालावधीत ३३.६७ बिलियन डॉलरची कमाई केली असून जी मागील वर्षी याच कालावधीत २८.०७ अब्ज डॉलर होती. रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, मेटाने अपेक्षेपेक्षा अॅपलच्या गोपनीयतेतील बदल आणि टीक टॉक सारख्या प्रतिस्पर्ध्यांकडून यूजर्ससाठी वाढलेली स्पर्धा याला दोष दिला आहे.

पहिल्यांदाच, मेटाने दोन विभागांमध्ये त्यांचे आर्थिक अहवाल नोंदवण्यास सुरुवात केली. फेसबुक, इन्स्टाग्राम, मेसेंजर, व्हॉट्सअप आणि इतर सेवांचा समावेश यामध्ये समावेश आहे.

कंपनीचे सुमारे २०० अब्ज डॉलर्सचे नुकसान

बुधवारी, मेटाच्या त्रैमासिक अहवालात कमकुवत महसूलाचा अंदाज लावला, ज्यामुळे गुंतवणूकदार घाबरले आणि कंपनीच्या मूल्यांकनात सुमारे २०० अब्ज डॉलर गमावले. ट्रेडिंगच्या काही तासांनंतर, मेटाचा स्टॉक २२.९ टक्क्यांनी घसरून २४९.०५ वर आला.

मेटा त्याच्या भविष्यातील मेटावर्स प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. मेटा सीईओ मार्क झुकरबर्गने याचे वर्णन व्हर्चूअल विश्वाला अधिक प्राधान्य देण्याची भूमिका म्हणून केले आहे. इंटरनेटच्या माध्यमातून लोक जेव्हा व्हर्चूअल विश्वामध्ये भ्रमंती करतात त्याला मेटाव्हर्स असं म्हणतात. यामध्ये डिजीटल स्पेसचाही समावेश होतो. डिजीटल स्पेस म्हणजेच व्हर्चूअल रिअ‍ॅलिटी आणि ऑगमेन्टेट रिअ‍ॅलिटीसारख्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उभं केलेलं आभासी जग. याच आभासी जगाला डिजीटल स्पेस असं म्हटलं जातं.

डायम प्रकल्पाचे काय झाले?

डायम प्रकल्प, ज्याला पूर्वी लिब्रा असे नाव देण्यात आले होते, त्याला २०१९ मध्ये लॉन्च झाल्यापासून थंड प्रतिसाद मिळाला आहे. सुरुवातीला जागतिक चलन म्हणून काम करणार्‍या राष्ट्रीय चलनांच्या बास्केटवर आधारित, स्टेबलकॉइन म्हणून त्याला ओळखले जात होते. फेसबुक चलनाच्या हे जवळ असल्यामुळे त्याचे नाव लिब्रावरून डायममध्ये केले गेले.

याचा अर्थ काय?

दररोज फेसबुकमध्ये लॉग इन करणार्‍या युजर्सच्या संख्येत होणारी घट हे कंपनीच्या मुख्य उत्पादनाची जागतिक बाजारपेठेतील स्थिती दर्शवते, जे यापुढे त्यांच्या युजर्सच्या संख्येत वाढ होण्यास सक्षम नसल्याचा संकेत देते. तसेच मेटाचे मुख्य आर्थिक अधिकारी डेव्ह वेहनर यांनी सांगितले की अ‍ॅपलच्या गोपनीयता बदलांचा प्रभाव १० अब्ज डॉलर्सच्या नुकसान होण्याइतका असू शकतो.