निलेश अडसूळ

मुंबई महापालिकेच्या महत्वाकांशी प्रकल्पांपैकी एक असलेल्या सागरी किनारा मार्गाच्या प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी सागरी सेतूच्या पहिल्या टप्प्याचे काम सध्या प्रगतीप्रथावर असून २०२३ पर्यंत हा मार्ग पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. परंतु या प्रकल्पातील काही त्रुटींमुळे पारंपरिक मत्स्यव्यवसाय धोक्यात आल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे. यासंदर्भात न्यायालयीन लढा सुरू आहे. या विरोधामागे स्थानिक मच्छीमारांची नेमकी भूमिका काय?

what is livestock census
प्राण्यांची गणना का केली जाते? त्यामागचे उद्दिष्ट काय?
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
Negative reactions of Nagpurkars on the new experiment of traffic No Right Turn
‘नो राईट टर्न’: वाहतुकीच्या नव्या प्रयोगावर नागपुरकरांची प्रतिक्रिया, हा तर ‘नाकापेक्षा मोती जड’!
Fish dead in Murbe Satpati Bay palghar news
मुरबे सातपाटी खाडीत हजारो मासे मृत; प्रदूषित पाण्यामुळे घटना घडल्याचे मच्छीमारांचे आरोप
Funds to Urban Development Department for Construction of Elevated Road of Rustamji Urbania Housing Complex thane news
रुस्तमजी अर्बेनिया गृहसंकुलाच्या उन्नत मार्गाच्या हालचालींना वेग
hitendra thakur to contest assembly election again to save bahujan vikas aghadi
विश्लेषण : हितेंद्र ठाकूर पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात का उतरले? बविआला वाचवण्याची धडपड?
implementation of hawkers policy stalled for ten years
विश्लेषण : मुंबईत फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी दहा वर्षे का रखडली? मुजोर फेरीवाल्यांना ‘राजकीय आशिर्वाद’?
MSP on agricultural produce
विश्लेषण : शेतमालाचे जाहीर हमीभाव शेतकऱ्याला प्रत्यक्षात मिळतात का?

सागरी किनारा मार्गाची रचना

सागरी किनारा मार्गाचा पहिला टप्पा प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी सागरी सेतु पर्यंतचा आहे. अंदाजे ११ किलोमीटरचा हा रस्ता बांधण्यासाठी समुद्रात जवळपास ११० हेक्टर भराव घालण्यात आला आहे. सागरी किनारा मार्ग वरळी सागरी सेतुला जोडण्यासाठी वरळी येथील समुद्रात एक सेतू बांधण्यात येणार आहे. या पूलासाठी समुद्रात ६० मीटर अंतरावर ११ खांब समुद्रात उभारले जाणार आहेत.

“दर्यावर्दींना उद्ध्वस्त कराल तर आई एकविरेची शपथ..”; कोस्टल रोड प्रकल्पावरुन भाजपाचा इशारा

विरोध का?

या प्रकल्पाच्या भूमिपूजनापासूनच मच्छीमार समुदाय आणि पर्यावरणवादी कार्यकर्त्यांकडून विरोध होत आहे.  समुद्रात भराव घातलेल्या भागांमध्ये मासेमारी होत होती. कोळंबी, बोंबील, रावस, शेवण, खाजरा, कालवे यासह अनेक लहानमोठे मासे याठिकाणी मिळत होते. माशांच्या प्रजनन काळात माशांचे तळ याठिकाणी असायचे. भराव घातल्याने या ठिकाणची मासेमारी बंद झाली, शिवाय समुद्रातील मासेही पूर्वीपेक्षा काही अंतर दूर गेल्याची माहिती मच्छीमारांनी दिली. भराव घातल्याने झालेले नुकसान भरून येणारे नाही. परंतु वरळी सागरी सेतुशी हा मार्ग जोडला जाणार असल्याने त्या दरम्यान समुद्रात एक सेतू उभारण्यात येणार आहे. त्या सेतुच्या खांबामधील अंतर ६० मीटर असणार आहे. अशा पद्धतीचा पूल बांधल्यास वरळी कोळीवाड्यातील मच्छीमारांना बोटी घेऊन समुद्रात जाण्यास अडचण निर्माण होईल. वाऱ्याचा वेग, लाटा यांचे गणित चुकल्याने दरम्यान मोठे अपघातही होऊ शकतात असे मच्छीमारांचे म्हणणे आहे.

“निवडून येतात आमच्या गावातून अन्…”; आदित्य ठाकरेंवर टीका करत वरळी कोळीवाड्यात स्थानिकांनी बंद पाडलं कोस्टल रोडचं काम

प्रकल्पापूर्वी प्रकल्पग्रस्तांना विश्वासात घेतले होते का?

अशा प्रकल्पामध्ये प्रकल्पग्रस्तांना विश्वसात घेणे गरजेचे असते परंतु सागरी किनारा मार्गातील समुद्रात टाकल्या जाणाऱ्या भरावाबाबत मच्छीमारांना कोणतीही कल्पना दिली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ‘भरावामुळे मच्छीमारांचे कोणतेही नुकसान झालेले नाही, भराव घातलेल्या ठिकाणी मासेमारी होत नव्हती. त्यामुळे त्यांना कल्पना देण्यात आली नाही,’ अशी मुंबई महापालिकेची भूमिका आहे.

न्यायालयाचे म्हणणे काय आहे?

सागरी किनारा मार्गाला विरोध करणाऱ्या सहा याचिका न्यायालयात दाखल झाल्या आहेत. मच्छीमारांचा उदरनिर्वाह, जैवविविधतेचे नुकसान, झाडांच्या कत्तली अशा विविध मुद्द्यांवरील याचिकांचा विचार करून उच्च न्यायालयाने या प्रकल्पाला स्थगिती दिली होती. परंतु पालिका आणि कंत्राटदार यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागून ही स्थगिती दूर केली. कंत्राटदाराचे आर्थिक नुकसान होत असल्याचे कारण देत हे काम पुन्हा सुरू करण्यात आले.

मच्छीमारांची अपेक्षा काय?

समुद्रातून ये-जा करणाऱ्या मार्गांतील दोन खांब हे परस्परांपासून २०० मीटर अंतरावर असावे अशी मागणी वरळी कोळीवाड्यातून होत आहे. याबाबत पालिकेसह राज्य सरकारकडे अनेकदा दाद मागूनही प्रश्न सुटला नसल्याने मच्छीमारांनी समुद्रात जाऊन काम बंद पाडण्याचा पवित्रा घेतला आहे. या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी नुकतीच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या उपस्थितीत एक बैठक झाली. परंतु अद्याप यावर तोडगा निघालेला नाही