राज्यसभा निवडणुकीत भाजपाला आश्चर्यकारक यश मिळाले आहे. एकीकडे हरियाणात कार्तिकेय शर्मा यांनी जिंकून अजय माकन यांना वरच्या सभागृहात पोहोचण्यापासून रोखले, तर महाराष्ट्रात तीन जागा जिंकल्या. विरोधी पक्षात असतानाही सत्ताधारी आघाडीला असा धक्का देणे हे भाजपाचे मोठे यश मानले जात आहे. मात्र, या संपूर्ण निकालाची अंतर्गत गोष्ट अशी आहे की, महाविकास आघाडीला धक्का देण्यात शिवसेनेचे माजी नेते आशिष कुलकर्णी हे होते.

सहाव्या राज्यसभेची जागा जिंकून भाजपाने महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला धक्का दिला आहे. यासाठी रणनीती तयार करण्याचे श्रेय आशिष कुलकर्णी यांना दिले जात आहे. राज्यसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या विश्वासू सहकार्यांनची एक टास्क फोर्स नेमली होती आणि यामध्ये भाजपाचे नेते आशिष शेलार, गिरीश महाजन, प्रसाद लाड आणि आशिष कुलकर्णी यांचा समावेश होता.

Uddhav Thackeray speech
“…अन् प्रियांका गांधींनी भाजपाचे दात घशात घातले”, पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आव्हानाला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
maharashtra assembly election 2024 three way fight between bjp rebels jat assembly constituency
लक्षवेधी लढत : जातीयवादाकडे झुकणारी लढत
maharashtra assembly election 2024 maha vikas aghadi vs mahayuti battle in konkan region
विश्लेषण : कोकणात लोकसभेतील यशाची पुनरावृत्ती महायुती दाखवणार का? महाविकास आघाडीला संधी किती?
Sanjay Raut and Mallikarjun Kharge
खरगेंच्या मुखी समर्थ रामदासांचा श्लोक, पण संजय राऊत निरुत्तर; जाहीरनामा प्रसिद्ध करताना नेमकं काय घडलं?
Ajit Pawar on Udyanraje Bhosale
Ajit Pawar: ‘साताऱ्याला पिपाणीनं वाचवलं, नाहीतर…’, अजित पवारांच्या मिश्किल टिप्पणीनं भाजपाचीच कोंडी
Prashant Bamb BJP MLA
“मरेपर्यंत पस्तावशील, हे लोक तुला…”, भाजपा आमदाराची भर सभेत अरेरावी; प्रश्न विचारणाऱ्यांना कार्यकर्त्यांनी हुसकावलं
Bhosari assembly, politics, ajit Gavan, Mahesh Landge
भोसरी राजकारण तापलं; महेश लांडगेंच्या तंबीला अजित गव्हाणेंचे प्रत्युत्तर, म्हणाले “पराभवाच्या छायेतून…”

आशिष कुलकर्णी एकेकाळी शिवसेनेत होते आणि ते बाळासाहेब ठाकरे यांचेही जवळचे मानले जात होते. पण आता ते भाजपामध्ये आहेत आणि शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करून तिसरी जागा जिंकण्यासाठी पक्षाची रणनिती तयार करणारे प्रमुख नेते आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीयांपैकी एक असलेले आशिष कुलकर्णी हे सध्या प्रदेश उपाध्यक्ष आहेत. शिवसेनेतून कारकिर्दीची सुरुवात करणारे कुलकर्णी २००३ मध्ये काँग्रेसमध्ये होते आणि त्यानंतर काही वर्षांपूर्वी त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. शनिवारी आलेल्या राज्यसभेच्या निकालात भाजपाचे तिसरे उमेदवार धनंजय महाडिक विजयी झाले तर शिवसेनेचे संजय पवार यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

आशीष कुलकर्णी यांच्या रणनीतीचा कसा फायदा झाला
भाजपाच्या एका नेत्याने सांगितले की, ‘या निवडणुकीसाठी आमची स्पष्ट रणनीती होती. केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि माजी मंत्री अनिल बोंडे यांना आम्ही सर्वाधिक ४८ मते दिली. यानंतर सर्व आमदारांनी तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या महाडिक यांना दुसऱ्या क्रमांकाची मते दिली. कुलकर्णी यांनी हा आराखडा तयार केला आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्याची अंमलबजावणी केली. अश्विनी वैष्णव यांनीही यात साथ दिली. गोयल आणि बोंडे यांना ४८ मते मिळाली, ज्याचे मूल्य ४८०० होते आणि सर्व दुसऱ्या प्राधान्याची मते महाडिक यांच्याकडे हस्तांतरित झाली.”

“एकूण, भाजपाला विधानसभेच्या १०६ सदस्यांची मते मिळाली. आठ अपक्षांशिवाय महाडिक यांना आणखी नऊ मते मिळाली. त्यांना मिळालेल्या एकूण मतांचे मूल्य ४,१५६ होते,” असे भाजपा नेत्याने सांगितले. आशीष कुलकर्णी यांनी तयार केलेल्या रणनीतीप्रमाणेच फडणवीस यांनी काम केले, असे भाजपाचे नेते म्हणाले. ही योजना फडणवीस आणि वैष्णव यांच्याशिवाय कोणालाही माहिती नव्हती. अपक्ष आमदार आणि छोट्या पक्षांच्या लोकांना सोबत घेऊन फडणवीस यांनी रणनीती राबवली. आशिष कुलकर्णी यांनी दोन दशकांपूर्वी शिवसेना सोडली, जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना बढती दिली होती. उद्धव ठाकरे यांच्याविरोधात असणाऱ्या नारायण राणे यांच्याशी आशिष कुलकर्णी यांचे चांगले संबंध होते.

कुलकर्णी त्यानंतर काँग्रेसमध्ये गेले आणि त्यांना २००९ मध्ये सहा संसदीय मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली. पक्षाने त्या सर्व जागा जिंकल्या. ज्या वर्षी काँग्रेसने बाजी मारली त्याच वर्षी राज्याच्या निवडणुकांसाठी त्यांना रणनीती आखण्यास सांगण्यात आले. गांधी घराण्याने त्यांची हुशारी ओळखली आणि काँग्रेस अध्यक्षांचे तत्कालीन राजकीय सल्लागार अहमद पटेल यांच्यासोबत काम करण्यासाठी त्यांना दिल्लीत हलवण्यात आले.
२०१० मध्ये, कुलकर्णी यांना काँग्रेसचे उमेदवार विजय सावंत यांना विधान परिषदsच्या तिकिटावर निवडून आणण्यात मदत करण्याचे श्रेय देखील देण्यात आले. २०१७ मध्ये, कुलकर्णी यांनी काँग्रेस सोडली आणि भाजपामध्ये प्रवेश करण्यापूर्वी काही काळ स्वतंत्रपणे काम केले.