अन्वय सावंत
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाचा (सीएसए) माजी क्रिकेट संचालक आणि राष्ट्रीय संघाचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथची वर्णभेदाच्या आरोपांतून निर्दोष मुक्तता करण्यात आली. स्मिथने वर्णाच्या आधारे खेळाडूंना वेगवेगळी वागणूक दिल्याचा ठपका गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सामाजिक न्याय आणि राष्ट्र-निर्माण (एसजेएन) समितीने ठेवला होता. ‘एसजेएन’ समितीने सादर केलेल्या २३५ पानी अहवालात स्मिथसह अन्य माजी खेळाडूंवरवर वर्णभेदाचे आरोप करण्यात आले आहेत. त्यानंतर ‘सीएसए’कडून स्मिथची अधिकृत चौकशी करण्यात आली. मात्र, संपूर्ण खासगी लवाद प्रक्रियेनंतर, एंग्वाको माएनेत्जे आणि मायकल बिशप या तेथील सर्वोच्च न्यायालयातील दोन वकिलांनी अपुऱ्या पुराव्यांच्या आधारे स्मिथची निर्दोष मुक्तता केली.
स्मिथवर आरोप काय होते?
आफ्रिकन संघाचा कर्णधार असताना स्मिथने २०१२ ते २०१४ या कालावधीत यष्टीरक्षक-फलंदाज थामी त्सोलिकिले हा कृष्णवर्णीय असल्याने त्याला मुद्दाम संघाबाहेर ठेवले. तसेच क्रिकेट संचालकपद भूषवताना गौरवर्णीय मार्क बाऊचरची प्रशिक्षकपदी निवड आणि ‘सीएसए’मधील कृष्णवर्णीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात काम करण्याबाबत अनिच्छा, असे तीन आरोप स्मिथवर लावण्यात आले होते. मात्र, हे आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत.
खटल्यादरम्यान काय घडले?
स्मिथने कोणतेही निर्णय वर्णाच्या आधारे घेतले, हे स्पष्ट होण्यासाठी पुरेसे पुरावे नसल्याचे लवाद अधिकाऱ्यांनी निकाल देताना म्हटले. त्सोलिकिलेचा २०१२मध्ये वार्षिक कराराच्या यादीत समावेश करण्यात आला होता. त्यामुळे त्याला आफ्रिकन संघात स्थान मिळणे अपेक्षित होते. २०१२च्या इंग्लंड दौऱ्यात प्रमुख यष्टिरक्षक बाऊचर जायबंदी झाल्यानंतर त्सोलिकिलेला इंग्लंडला पाठवण्यात आले. मात्र, त्याला सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. एबी डिव्हिलियर्सने यष्टिरक्षणाची धुरा सांभाळली. कृष्णवर्णीय असल्याने तत्कालीन कर्णधार स्मिथने मला मुद्दाम संघाबाहेर ठेवल्याचा आरोप त्सोलिकिलेने केला. परंतु, डीव्हिलियर्स आधीपासूनच संघाचा भाग होता आणि त्याची संघात निवड केवळ फलंदाज नाही, तर राखीव यष्टीरक्षक म्हणूनही करण्यात आली होती. त्यामुळे स्मिथने मुद्दाम त्सोलिकिलेला संघाबाहेर ठेवले असे म्हणता येणार नाही, असे लवाद अधिकाऱ्यांनी निकालादरम्यान सांगितले.
बाऊचरची डिसेंबर २०१९मध्ये आफ्रिकन संघाच्या प्रशिक्षकपदी नेमणूक करण्यात आली होती. त्यापूर्वी आफ्रिकेच्या संघाला एकदिवसीय विश्वचषकाची बाद फेरीही गाठता आली नव्हती आणि त्यांनी भारताविरुद्धची कसोटी मालिका ०-३ अशी गमावली होती. त्यामुळे नव्या प्रशिक्षकाच्या गाठीशी खूप अनुभव असावा आणि त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दडपण ठाऊक असावे, अशी तत्कालीन ‘सीएसए’चा क्रिकेट संचालक स्मिथची धारणा होती. प्रशिक्षकपदासाठी गौरवर्णीय बाऊचर आणि कृष्णवर्णीय एनोच एनक्वेश हे शर्यतीत होते. अखेर चारशेहून अधिक सामन्यांत आफ्रिकेचे प्रतिनिधित्व केलेल्या बाऊचरची प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली. ही निवड केवळ वर्णाच्या आधारे झाल्याचा ‘एसजेएन’ समितीच्या अहवालात आरोप करण्यात आला होता. मात्र, निवडप्रक्रियेत काही चुका झाल्या असल्या, तरी बाऊचरची प्रशिक्षकपदी निवड ही केवळ क्रिकेटशी निगडित कारणांनीच झाल्याचे पुरावे सांगत असल्याचे लवाद अधिकाऱ्यांनी निकालादरम्यान स्पष्ट केले.
तसेच कृष्णवर्णीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याबाबत अनिच्छा असल्याचाही स्मिथवर आरोप होता. क्रिकेट संचालकपद सांभाळणाऱ्या स्मिथने आपल्या कामकाजाची आणि निर्णयांची माहिती ‘सीएसए’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी थबँग मोरो यांना देण्यास नकार दर्शवला. मोरो कृष्णवर्णीय असल्याने हे घडल्याचे ‘एसजेएन’ समितीच्या अहवालात म्हटले गेले. परंतु ‘सीएसए’चे सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी फोलेत्सी मोसेकी यांनी स्मिथच्या बाजूने साक्ष दिली. स्मिथला त्याच्या कामकाजाची माहिती केवळ मुख्य कार्यकारी अधिकारी नाही, तर संपूर्ण क्रिकेट मंडळाला द्यायची होती. मंडळातील एकूण नऊपैकी सात सदस्य कृष्णवर्णीय आहेत. त्यामुळे त्याच्यावरील वर्णभेदाचे आरोप योग्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
निकालानंतर स्मिथने काय भावना प्रकट केल्या?
वर्णभेदाच्या आरोपांतून मुक्तता झाल्याचे मला समाधान आहे. गेली २० वर्षे खेळाडू, कर्णधार आणि मग पदाधिकारी म्हणून मी दक्षिण आफ्रिकन क्रिकेटच्या हिताचे निर्णय घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कोणत्याही पुराव्यांविना माझ्यावर करण्यात आलेल्या वर्णभेदाच्या आरोपांमुळे मला आणि माझ्या कुटुंबाला खूप त्रास झाला. दक्षिण आफ्रिकन क्रिकेटला पुन्हा उभारी येणे गरजेचे आहे आणि या प्रकरणामुळे त्याकडे दुर्लक्ष झाले. मात्र, संपूर्ण खासगी लवाद प्रक्रियेनंतर, मी पूर्णपणे निर्दोष असल्याचे सिद्ध झाल्याचा आनंद आहे, असे स्मिथने म्हटले.
आफ्रिकन क्रिकेटमध्ये अजूनही वर्णभेद आहे का?
‘एसजेएन’ समितीच्या अहवालात स्मिथसह सध्याचा मुख्य प्रशिक्षक बाऊचर आणि नामांकित माजी खेळाडू एबी डीव्हिलियर्स यांच्यावर वर्णभेदाचे आरोप करण्यात आले आहेत. २०१५मध्ये दक्षिण आफ्रिकेने भारताचा दौरा केला होता. त्यावेळी दुखापतीमुळे जेपी ड्युमिनीला अखेरच्या एकदिवसीय सामन्याला मुकावे लागले होते. कर्णधार डीव्हिलियर्सने ड्युमिनीच्या जागी कृष्णवर्णीय खाया झोन्डोला संधी दिली नाही. त्याऐवजी चमूत नसलेल्या गौरवर्णीय डीन एल्गरला अंतिम ११मध्ये स्थान देण्यात आल्याचे ‘एसजेएन’ समितीच्या अहवालात म्हटले आहे. मात्र, डीव्हिलियर्सने ‘ट्वीट’ करत त्याच्यावरील वर्णभेदाचे आरोप फेटाळून लावले. तसेच बाऊचरवर माजी कृष्णवर्णीय संघ-सहकाऱ्यावर टिप्पणी केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्याबाबतची सुनावणी लवकरच होणार आहे.