भारत सरकारने भगवान गौतम बुद्ध यांचे चार पवित्र अवशेष म्हणजेच बौद्धधातू विशेष बाब म्हणून मंगोलिया देशात पाठवण्यास परवानगी दिली आहे. येथे हे बौद्धधातू मंगोलीयन बुद्ध पौर्णिमा उत्सवानिमित्त ११ दिवस प्रदर्शनासाठी ठेवले जातील. या काळात बौद्धधातू सामन्यांना पाहता येणार आहेत. केंद्रिय मंत्री किरेन रिजिजू तसेच २५ सदस्यीय भारतीय शिष्टमंडळासोबत बौद्धधातूंना एका विशेष विमानाने मंगोलिया येथे सोमवारी नेले जाणार असून ते उलानबाटर येथे ठेवले जाणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >> विश्लेषण : ‘ब्रह्मोस’ क्रुझ क्षेपणास्त्राच्या प्रगतीची २१ वर्षे

मंगोलिया येथे नेले जाणारे बौद्धधातू २२ बौद्धधातूंपैकी एक आहेत. या सर्व बौद्धधातूंना ‘कपिलवस्तु अवशेष’ म्हणून ओळखले जाते. हे बौद्धधातू बिहारमधील कपिलवस्तू येथे आढळलेले आहेत. बिहारमधील कपिलवस्तू परिसराचा शोध १८९८ साली लागला होता.

हेही वाचा >> विश्लेषण : बाळांना फक्त सहा महिने स्तनपान का द्यावे?

बौद्ध धर्माच्या मान्यतेनुसार वयाच्या ८० व्या वर्षी भगवान गौतम बुद्ध यांचे उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे महापरिनिर्वाण झाले. कुशीनगर येथेच तथागत भगवान बुद्ध यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर बौद्धधातू गोळा करुन मगधचे अजातशत्रू, वैशालीचे लिच्छवी, कपीलवस्तूचे शाक्य, कुशीनगरचे मल्ला, अलाकाप्पाचे बुलीस, पावाचे मल्ला, रामग्रामचे कोळिया, आणि वेथदीपा या ठिकाणी पाठवले गेले. पवित्र स्तुपे उभारण्यासाठी बौद्धधातू या भागात पाठवण्यात आले होते.

हेही वाचा >> विश्लेषण: विवाहसोहळ्यांवर बंधनं, बाजार बंद, कार्यालयांमध्ये सुट्टी; विजेच्या तुटवड्यामुळे पाकिस्तानमध्ये संकट

बौद्धधातू ज्या ठिकाणी पाठवण्यात आले होते तेथे नंतर मोठ्या स्तुपांची निर्मिती झाली. हे स्तुप बौद्ध संस्कृतीतील सर्वात प्राचीन बौद्धस्तुपे मानली जातात. सम्राट अशोकाने (ई.पू. २७२-२३२) हे बौद्धधातू नंतर एका ठिकाणी गोळा केले होते, असे म्हटले जाते. सम्राट अशोकाने बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी ८४ हजार बौद्ध स्तुपे बांधली होती.

हेही वाचा >> विश्लेषण : बेकायदेशीर बांधकामांना हाताळण्यासाठी प्रशासनाकडे प्रभावी मार्ग आहेत का?

१८९८ साली उत्तर प्रदेशमधील सिद्धार्थनगरमध्ये पिप्राहवा या भागात एका स्तुपाजवळ एक पेटी सापडली होती. ही पेटी सापडल्यानंतर हा भाग बौद्धकालीन कपीलवस्तू असल्याचा शोध लावण्यास मदत झाली. या पेटवीर बौद्धधातू आणि शाक्यांबद्दल लिहण्यात आले होते.

हेही वाचा >> विश्लेषण: आता विधान परिषदेसाठी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप! ‘अकरावा’ कोण?

सांस्कृतिक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या शोधानंतर पिप्राहवा परिसरातील अनेक गोष्टींचा उलगडा झाला. येथील स्तुपाचे १९७१-७७ या काळात उत्खनन केले गेले. या उत्खननात कपिलवस्तुचे बांधकाम समोर आले. तसेच येथे अवशेषांच्या आणखी दोन पेट्या सापडल्या. या पेट्यामंध्ये एकूण बुद्धांचे २२ पवित्र बौद्धधातू होते. हेच बौद्धधातू आता दिल्लीमध्ये राष्ट्रीय संग्रहालयात असून तज्ज्ञांच्या निगराणीखाली आहेत.

हेही वाचा >> विश्लेषण : तुरुंगांच्या आत पेट्रोल पंपाची स्थापना, काय आहे हरियाणा सरकारची योजना? घ्या जाणून

दरम्यान, आता चार बौद्धधातू मंगोलिया देशामध्ये ११ दिवसांसाठी प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. तेथे या बौद्धधातूंची सरकारी अतिथींसारखी काळजी घेण्यात येणार आहे. तसेच या बौद्धधातूंना दिल्लीमध्ये ज्या हवामानात ठेवण्यात आले होते; अगदी तशाच हवामानामध्ये त्यांना मंगोलिया येथे ठेवण्यात येणार आहेत. भारतीय हवाई दलाच्या सर्वात मोठ्या विमानांपैकी एक असलेल्या सी-१७ विमानातून बौद्धधातू मंगोलिया येथे नेले जाणार आहेत.

हेही वाचा >> विश्लेषण : राज्यसभा निवडणुकीत भाजपाच्या विजयासाठी माजी शिवसैनिकाने कशी आखली होती रणनीती?

याआधी २०१५ साली या पवित्र बौद्धधातूंना पुरातन वस्तुच्या एए श्रेणीमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तेव्हापासून हे बौद्धधातू नाजूक असल्यामुळे त्यांना प्रदर्शनासाठी देशाबाहेर नेले जाऊ नये असा नियम तयार करण्यात आला. मात्र मंगोलीयन सरकारच्या विनंतीवरुन या बौद्धधातूंच्या प्रदर्शनास परवानगी देण्यात आली आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained four buddha relics going to mongolia as for exposition know their importance prd