संतोष प्रधान
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
वस्तू आणि सेवा कराचे (जीएसटी) राष्ट्रीय पातळीवर फेब्रुवारी महिन्यात १ लाख ३३ हजार कोटी रुपयांचे संकलन झाले. जानेवारी महिन्याच्या तुलनेत फेब्रुवारीत संकलन ५.६ टक्क्यांनी घटले असले तरी करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेत वस्तू आणि सेवा कराच्या संकलनावर परिणाम झालेला नाही. फेब्रुवारी महिना २८ दिवसांचा असल्याने जानेवारीच्या तुलनेत संकलन नेहमीच कमी होते. पण यंदा संकलन चांगले असल्याचा दावा वित्त विभागाने केला. महाराष्ट्रातील संकलनात मात्र हजार कोटींची घट झाली आहे.
जानेवारी आणि फेब्रुवारीतील संकलनात किती फरक पडला ?
जानेवारी महिन्यात १ लाख ४० हजार कोटींचे विक्रमी संकलन झाल्याचे वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना जाहीर केले होते. फेब्रुवारी महिन्यात १ लाख ३३ हजार कोटींचे संकलन झाले आहे. जानेवारीच्या तुलनेत ५.६ टक्के संकलनात घट झाली. जानेवारीच्या तुलनेत दरवेळेलाच फेब्रुवारीमध्ये तूट येते. कारण फेब्रुवारीचे २८ दिवस असतात. चालू आर्थिक वर्षात पाचव्यांदा १ लाख ३० हजार कोटींच्या संकलनाचा टप्पा गाठला आहे.
संकलन घटण्याचे कारण काय ?
ओमायक्राॅनच्या संसर्गामुळे फेब्रुवारीच्या सुरुवातीचे दोन आठवडे बहुतांशी भागांत करोनाचे निर्बंध होते. जवळपास सर्वच राज्यांमध्ये रात्रीची संचारबंदी लागू होती. याशिवाय काही मोठ्या शहरांमध्ये व्यवहार अशंत: बंद होते. यामुळे संकलनात घट झाल्याचे वित्त विभागाचे म्हणणे आहे. तरीही तेवढा फटका बसलेला नाही.
वस्तू आणि सेवा कराचे चालू आर्थिक वर्षात किती संकलन झाले?
फेब्रुवारी १ लाख ३३ हजार कोटी, जानेवारी १ लाख ४० कोटी, डिसेंबर १ लाख २९ हजार कोटी, नोव्हेंबर १ लाख ३१ हजार कोटी, ऑक्टोबर १ लाख ३० हजार कोटी, सप्टेंबर १ लाख १७ हजार कोटी, ऑगस्ट १ लाख १२ हजार कोटी, जुलै १ लाख १६ हजार कोटी, जून ९२ हजार ४९८ कोटी, मे १ लाख ०२ हजार कोटी.
महाराष्ट्रात यंदा किती संकलन झाले ?
राज्यात फेब्रुवारीमध्ये १९ हजार ४२३ कोटींचे संकलन झाले. जानेवारीत राज्यात २० हजार ७०४ कोटींचे संकलन झाले होते. अर्थात केंद्र व राज्य सरकारच्या आकडेवारीत नेहमीच फरक असतो. देशातील संकलन कमी झाल्याचा फटका महाराष्ट्रालाही बसला आहे.
देशात महाराष्ट्र जीएसटी संकलनातही आघाडीवर
वस्तू आणि सेवा कराच्या संकलनात महाराष्ट्र हे देशात नेहमीच पहिल्या क्रमांकावरील राज्य असते. फेब्रुवारीत महाराष्ट्रात संकलन झाले १९ हजार ४२३ कोटी एवढे. त्यानंतर क्रमांक लागतो तो कर्नाटकचा. कर्नाटकात फेब्रुवारीमध्ये ९,१७६ कोटी एवढे संकलन झाले. पहिल्या आणि दुसऱ्या क्रमाकांच्या राज्यांमध्ये दुपटीपेक्षा अधिक फरक आहे. तिसऱ्या क्रमांकावर ८,८७३ कोटींचे संकलन झालेले गुजरात राज्य आहे. तमिळनाडू ७,३९३ कोटी, उत्तर प्रदेश ६,५१९ कोटींचे संकलन झाले.
राज्यात चालू आर्थिक वर्षात किती संकलन झाले ?
राज्यात २०२१-२२ या आर्थिक वर्षात आतापर्यंत १ लाख ९७ हजार ६८७ कोटींंचे संकलन झाले आहे. सर्वाधिक २२ हजार कोटींचे संकलन हे एप्रिलमध्ये झाले होते. दुसऱ्या लाटेत मे आणि जूनमध्ये संकलन १३ हजार कोटीं पर्यंत घटले होते.