एक आयातदार असण्यापासून ते ‘फ्रेंच फ्राईज’चा निर्यातदार बनण्यापर्यंत भारताने खूप मोठा पल्ला गाठला आहे. यात सर्वात मोठा वाटा गुजरातचा आहे, ज्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही ही कामगिरी बजावली आहे आणि आज फ्रेंच फ्राईजच्या निर्यातीत गुजरात भारतासाठी महत्वाची भूमिका बजावत आहे.

Continue reading this story with Loksatta premium subscription
Already a subscriber? Sign in

देशाच्या एकूण बटाटा उत्पादनापैकी गुजरात केवळ ७.४२ टक्के उत्पादन करत असले तरी, तरीही हे राज्य फ्रेंच फ्राईजचा सर्वात मोठा निर्यातदार बनले आहे. हे आश्चर्यकारक असले तरी हे सत्य देखील आहे. चालू वर्षात, उत्तर प्रदेश हे ३१.२६ टक्के उत्पादन वाटा असलेले प्रमुख बटाटा उत्पादक राज्य आहे, त्यानंतर पश्चिम बंगाल, बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेश अनुक्रमे २३.२९ टक्के, १३.२२ टक्के, ७.४३ टक्के आणि ६.२० टक्के आहे.

गुजरातमध्ये मॅककेन फूड्स, इस्कॉन बालाजी फूड्स आणि हायफन फूड्स या तीन कंपन्यांचे प्रक्रिया प्रकल्प आहेत, जे ‘फ्रोझन पोटॅटो प्रोडक्ट्स’च्या उत्पादनात काम करतात. उत्पादनाव्यतिरिक्त या कंपन्या त्यांची निर्यातही करतात. या कंपन्या केवळ ‘फ्रोझन पोटॅटो’ उत्पादनांच्या प्रमुख निर्यातदारच नाहीत, तर भारतातील आघाडीच्या बर्गर क्विक सर्व्ह रेस्टॉरंट (QSR) चेनसाठी सर्वात मोठ्या पुरवठादार देखील आहेत.

सध्या मॅकडोनाल्ड्स, वेंडीज, सबवे, केएफसी, बर्गर किंग आणि डॉमिनोज सारख्या फास्ट-फूड चेनचा प्रवेश भारतातील ‘फ्रोझन पोटॅटों’च्या बाजारपेठेत महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. ‘फ्रोझन पोटॅटो’ हे ताज्या बटाट्या सारखेच फायदे आणि चव देतात आणि त्यांचे शेल्फ-लाइफ जास्त असते.

भारताचा आलेख चढता राहिला आहे –

२००७ मध्ये भारताने ६ हजार मेट्रिक टन फ्रेंच फ्राईज आयात केले होते. पण आठ वर्षांतच भारत आयातदारापासून निर्यातदार बनला आहे. भारताने २०१५ मध्ये ५ हजार मेट्रिक टन वार्षिक निर्यात करून फ्रेंच फ्राईज निर्यात करण्यास सुरुवात केली. गुजरात हे भारतातील आघाडीचे ‘फ्रोझन पोटॅटो’ उत्पादनाचे निर्यातदार आहे.

देशाने २०१९ मध्ये सुमारे ३०,००० मेट्रिक टन (MT) ‘फ्रोझन पोटॅटो’ निर्यात करण्यात यश मिळवले, ज्यामध्ये फ्राईजचा वाटा एकूण निर्यातीपैकी ९५ टक्के आहे. २०२० पर्यंत गुजरातने निर्यातीत मोठी झेप घेतली. २०२० मध्ये, ‘फ्रोझन पोटॅटो’ उत्पादनांच्या बाजारपेठेचे मूल्य सुमारे १.१० अब्ज अमेरिकन डॉलर इतके झाले.

मॅककेन फूड्स, इस्कॉन बालाजी फूड्स आणि हायफन फूड्स या भारतातील प्रमुख तीन बटाटा प्रक्रिया कंपन्यांनी गुजरातमध्ये १ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ५२० लाख मेट्रीक टन एकूण उत्पादनाच्या तुलनेत २०१८-१९ मध्ये गुजरातमध्ये एकूण ४० लाख मेट्रीक टन बटाट्याचे उत्पादन झाले. तसेच, गुजरातने एकूण ३.८० मेट्रिक टन बटाटा निर्यातीत १ लाख मेट्रिक टन योगदान दिले.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained gujarat plays a major role in indias transition from importer to exporter in the french fries industry msr
Show comments