दत्ता जाधव

हळद या नगदी पिकाच्या मोठय़ा प्रमाणावरील लागवडीमुळे हिंगोली जिल्हा जागतिक नकाशावर आला आहे. त्यानिमित्त राज्यात यंदा हळदीची लागवड किती झाली, हळदीच्या जागतिक उत्पादनात भारताचे, महाराष्ट्राचे स्थान काय या मुद्दय़ांचा ऊहापोह.

india recorded highest cultivation of wheat rabi crop sowing exceeds 632 lakh hectares
यंदा गहू मुबलक; देशात उच्चांकी लागवड; रब्बी पेरण्या ६३२ लाख हेक्टरवर; पोषक वातावरणाचा परिणाम
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
overseas debt become expensive due to the depreciating rupee
रुपयाच्या अवमूल्यनामुळे परदेशातून कर्ज उभारणी महाग
india exports contract 1 percent in december 2024
डिसेंबरमध्ये देशाच्या निर्यातीत घसरण; नेमके कारण काय?
tur dal cost decrease by rs 50 per kg other pulses price drop
तूरडाळ किलोमागे ५० रुपयांनी स्वस्त
Wholesale Price Inflation Climbs to 2.37 percent in December 2024
घाऊक महागाई वाढली; अन्नधान्यांच्या किमतीमुळे नव्हे तर…; महागाई दर डिसेंबरमध्ये वाढून ….
Artificial Intelligence, Sugarcane Farming, Lokshiwar ,
लोकशिवार : ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता
retail inflation rate at 5 22 percent in december
चलनवाढीचा दिलासा, पण बेताचाच! डिसेंबरमध्ये दर ५.२२ टक्के; चार महिन्यांच्या नीचांकी

भारतात सर्वाधिक हळद उत्पादन?

भारत हा जगातील सर्वात मोठा हळद उत्पादक आणि निर्यातदार आहे. भारतातील मसाले आणि मसाल्यांखालील पिकांच्या एकूण क्षेत्राच्या सुमारे सहा टक्के क्षेत्रावर हळदीचे पीक घेतले जाते. चीन, म्यानमार, नायजेरिया आणि बांगलादेश या देशांमध्येही हळदीची लागवड केली जाते. जगातील हळदीखालील क्षेत्राचा विचार केल्यास मुख्य क्षेत्र भारतात असून जगातील एकूण लागवडीपैकी ८२ टक्के एकटय़ा भारतात आहे. त्या खालोखाल चीनमध्ये आठ टक्के, म्यानमारमध्ये चार टक्के, नायजेरियात तीन टक्के आणि बांगलादेशात तीन टक्के इतके हळदीचे क्षेत्र आहे.

हळदीचा वापर कशासाठी होतो?

आयुर्वेदात हळदीला खूप महत्त्वाचे स्थान आहे. प्राचीन चिकित्सा पद्धतीत हळदीचा वापर मोठय़ा प्रमाणावर केला जात होता. पारंपरिक उपचार पद्धतीसह नव्याने आलेल्या करोना साथीत रोगप्रतिकारकशक्ती वाढवणारे आयुर्वेदिक औषध म्हणून हळदीचा वापर जगभरात वाढला आहे. आरोग्यासह हळदीला आर्थिक, धार्मिक, औषधी व सामाजिकदृष्टय़ा अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. हळदीचा उपयोग रोजच्या आहारात, औषधांमध्ये, सौंदर्यप्रसाधनांमध्ये, जैविक कीटकनाशकांमध्ये मोठय़ा प्रमाणावर केला जातो. प्रत्येक धार्मिक कार्यात हळदीचा वापर प्रामुख्याने होत असतो. त्यामुळे हळद ही भारतीयांच्या जीवनशैलीतील महत्त्वाचा घटक बनली आहे.

देशात महाराष्ट्रात सर्वाधिक क्षेत्र?

भारतात हळद हे मसाला पिकातील प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखले जाते. भौगोलिकदृष्टय़ा हळद लागवडीस भारतात अनुकूल वातावरण असल्यामुळे भारतात सर्वदूर हळदीची लागवड होऊ शकते. तरीही प्रामुख्याने तेलंगणा, महाराष्ट्र, तमिळनाडू, छत्तीसगड, आंध्र प्रदेश या राज्यांत हळदीचे उत्पादन घेतले जाते. २०१९-२० मध्ये देशात हळद पिकाखाली एकूण २.१८ लक्ष हेक्टर क्षेत्र होते. त्यापैकी ०.५५ लक्ष हेक्टर क्षेत्र फक्त महाराष्ट्रात होते. महाराष्ट्र हे तेलंगणानंतर हळद पिकाखालील क्षेत्रानुसार देशातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे.

राज्यात जिल्हानिहाय हळदीचे क्षेत्र किती?

कसबे डिग्रज (ता. मिरज) येथील हळद संशोधन केंद्राने दिलेल्या माहितीनुसार राज्यात हळद लागवडीखालील एकूण क्षेत्र ८४ हजार ६६ हेक्टर आहे. त्यापैकी एकटय़ा हिंगोलीत ४९ हजार ७६४ हेक्टर क्षेत्रावर हळद लागवड झाली आहे. हे क्षेत्र एकूण क्षेत्राच्या तुलनेत निम्म्याहून अधिक आहे. त्या खालोखाल नांदेड जिल्ह्यात १३ हजार १३१ हेक्टर, वाशिममध्ये ४ हजार १४९ हेक्टर, यवतमाळ जिल्ह्यात ३ हजार ७३६ हेक्टर, परभणीत ३ हजार १५१ हेक्टर, बुलढाण्यात १ हजार ७६३ हेक्टर, जालन्यात १ हजार ७७ हेक्टर, जळगावात ९८४ हेक्टर, चंद्रपूरमध्ये ७८७ हेक्टर, गोंदियात ३८२ हेक्टर, भंडाऱ्यात ३७५ हेक्टर आणि नागपुरात ३५१ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. हळदीचे क्षेत्र विक्रमी झाल्यामुळे हिंगोली हळद उत्पादनात जागतिक नकाशावर आले आहे.

सांगली, साताऱ्याची पिछाडी कशामुळे?

आजवर हळदीसाठी प्रसिद्ध असलेला सांगली जिल्हा, हळदीच्या लागवड क्षेत्राचा विचार करता अकराव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. सांगलीत एकूण ७७४ हेक्टरवर तर साताऱ्यात एक हजार ७८८ हेक्टरवर हळदीची लागवड झाली आहे. मराठवाडय़ात वेगाने हळद लागवडीखालील क्षेत्र वाढत असल्यामुळे सांगली, साताऱ्याची हळद लागवडीतील मक्तेदारी मोडीत निघाली आहे. सांगली, साताऱ्यात द्राक्ष, डािळबसारखी इतर फळ पिकांची लागवड वाढल्याचाही हा परिणाम आहे.

मराठवाडय़ात बाजारपेठेचा विस्तार झाला?

सांगलीची हळदीची बाजारपेठ जगात प्रसिद्ध आहे. सांगलीसह सातारा, मराठवाडा आणि कर्नाटकच्या सीमाभागातील हळद विक्रीसाठी सांगलीत येत होती. आता हिंगोली, वसमत, वाशिम, नांदेड येथे हळदीचे सौदे होऊ लागले आहेत. बाजारपेठ उपलब्ध झाल्याने आणि सरासरी नऊ हजार ते दहा हजार प्रति िक्वटल दर मिळत असल्यामुळे मराठवाडा आणि विदर्भात हळदीचे क्षेत्र झपाटय़ाने वाढत आहे. उत्तर भारतातील व्यापारी सांगलीऐवजी मराठवाडय़ातील हळदीला पसंती देत आहेत. पण दर्जेदार, निर्यातक्षम हळदीसाठी अद्यापही सांगलीची ओळख कायम आहे.

मराठवाडा, विदर्भाची आघाडी कशामुळे?

मराठवाडा आणि विदर्भात आजवर प्रामुख्याने कापूस, सोयाबीन आणि कडधान्य पिकांची लागवड केली जायची. पण अलीकडे नैसर्गिक आपत्तींमुळे सोयाबीन पीक अडचणीत आले आहे. कापसाची उत्पादकता बोंडअळीमुळे अत्यंत कमी झाली आहे. शिवाय कापूस वेचणीच्या वेळी अवकाळी पावसाची भीती असतेच. कडधान्यांची अवस्था अशीच आहे. त्यामुळे हळदीचे पीक शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे. जमिनीखाली हळदीच्या कंदाची वाढ होत असल्यामुळे अतिवृष्टी, पूर किंवा गारपिटीचा थेट फटका बसत नाही, फार तर उत्पादकता कमी होणे किंवा कंदकुज काही प्रमाणात होते. परिणामी नुकसानीचे प्रमाण कमी राहते. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाडय़ातील शेतकरी हळदीला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे सांगली, सातारा, कोल्हापूरच्या तुलनेत हळदीचे क्षेत्र अत्यंत वेगाने विदर्भ, मराठवाडय़ात वाढत आहे, अशी माहिती कसबे डिग्रज (ता. मिरज) येथील हळद संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. मनोज माळी यांनी दिली.

datta.jadhav@expressindia.com

Story img Loader