अनेक वर्षानंतर राजश्री प्रॉडक्शनची निर्मिती असलेला मल्टीस्टारकास्ट चित्रपट ‘उंचाई’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. याआधी सलमान खानला घेऊन प्रेम रतन धनो पायो हा चित्रपट केला होता. आज बॉलिवूडमध्ये काही प्रसिद्ध निर्मिती संस्था आहेत ज्यात राजश्री प्रॉडक्शनचा समावेश होतो. नुकतीच या संस्थेने ७५ वर्ष पूर्ण केली आहेत. बॉलिवूडमध्ये प्रत्येक दशकात चित्रपटाची व्याख्या बदलते, ट्रेंड बदलत असतो त्यापद्धतीने चित्रपट बदलत जातात. मात्र राजश्री प्रॉडक्शनने कायमच भारतीय संस्कृती, परंपरा, भारतीय मूल्य आपल्या चित्रपटातून दाखवली आहेत. या संस्थेबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊयात.

देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीच चित्रपट बनू लागले होते. मूळचे राजस्थानचे असलेले ताराचंद बडजात्या हे राजश्री प्रॉडक्शनचे सर्वेसर्वा, आपल्या मुलीच्या नावाने त्यांनी ही संस्था १९४७ साली स्थापन केली. ताराचंद बडजात्या निर्मितीक्षेत्रात येण्यापूर्वी ते चित्रपट वितरक म्हणून काम करत होते. आज जी दाक्षिणात्य चित्रपटांची लाट आपण बॉलिवूडमध्ये बघत आहोत त्याची सुरवात खरं तर ताराचंद बडजात्या यांनी केली आहे. सुरवातीला ते दाक्षिणात्य चित्रपटांचे देशात वितरण करत असत. भाषेची अडचण असल्यामुळे प्रेक्षक हे चित्रपट पाहत नव्हते. त्यामुळे त्यांनी दाक्षिणात्य निर्मात्यांना त्यांचे चित्रपटांचे हिंदी रिमेक करण्यास सांगितले आणि इथून पुढे रिमेक हा प्रकार उदयास आला. चित्रपट वितरणासाठी त्यांनी त्याकाळात भारतातील २० शहरांमध्ये आपले कार्यालयं स्थापन केले होते. ताराचंद बडजात्या यांच्या मृत्यूनंतर सुरज बडजात्या सक्रीय आहेत.

Madhukar Kukde returns to BJP after 10 years
तब्बल १० वर्षांनंतर मधुकर कुकडे यांची भाजपात घरवापासी
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
book review Navi Pidhi Navya Vata book by Prakash Amte
पुढच्या पिढीची कर्तबगारी!
author samantha harvey wins the booker prize 2024 with orbital novel
समांथा हार्वे यांच्या ‘ऑर्बिटल’ला बुकर ; अंतराळावरील कादंबरीचा पहिल्यांदाच सन्मान
Hadapsar, NCP, Hadapsar latest news,
हडपसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वर्चस्वासाठीची लढाई
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : नीतिशास्त्र, सचोटी  आणि नैसर्गिक क्षमता
Kiren Rijiju claim that the book on the Constitution is a hole for Congress nashik news
संविधानाविषयीच्या पुस्तकातून काँग्रेसची पोलखोल – किरेन रिजिजू यांचा दावा

विश्लेषण : बॉलिवुड अभिनेत्री आणि प्रेग्नन्सी; करिअरवर काय परिणाम होतो? आलिया भट्टमुळे चर्चेला उधाण!

लोकप्रियता :

सुरुवातीला चित्रपटांचे वितरण केल्यानंतर त्यांनी आरती या पहिल्या चित्रपटाची निर्मिती केली. हा चित्रपट हिट ठरला. मात्र राजश्रीचे नाव झाले ते १९६४साली आलेल्या दोस्ती या चित्रपटामुळे, दोन मित्रांच्या जीवनावर या चित्रपटाची कथा बेतली होती. या चित्रपटाने त्यावेळी ६ पुरस्कार मिळवले होते. त्यानंतर ‘सुरज’, ‘तकदीर’, ‘सौदाग’र, ‘गीत गाता चल’ या चित्रपटात सचिन सारिका यांच्या जोडीला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली होती. ‘चितचोर’ चित्रपटातील गाणी आजही लोकांच्या लक्षात आहेत. राजश्रीने सचिन पिळगावकर यांना घेऊन नादिया के पार हा चित्रपट बनवला, आणि या चित्रपटाने इतिहास रचला. या चित्रपटाला प्रामुख्याने उत्तर भारतात जास्त चांगला प्रतिसाद मिळाला.

दशकं बदलत होती हिंदी चित्रपटात डिस्को, उडती गाणी जास्त हिट होत होती मात्र तरीदेखील राजश्रीने कायमच वेगळी ओळख जपली. ऐंशीच दशक संपताना राजश्रीने ‘मैने प्यार किया’ चित्रपट तयार करून सलमान खान नावाच्या अभिनेत्याला स्टार बनवले. ताराचंद बडजात्या यांचे नातू सुरज बडजात्या हे दिग्दर्शनात उतरले त्यांनी ‘हम आपके हैं कौन’, ‘हम हम साथ साथ है’ या चित्रपटांची लोकांनी पारायण केली आहेत. नव्व्दच दशक संपू लागल्यावर राजश्रीने नव्या कलाकरांना घेऊन चित्रपट बनवण्यास सुरवात केली.’ मै प्रेम कि दिवानी हू’, ‘विवाह’, ‘एक विवाह ऐसा भी’ यांसारखे चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन आले.

राजश्रीने जसे दर्जेदार चित्रपट दिले तसेच त्यांच्या चित्रपटांमुळे अभिनेते अभिनेत्रीदेखील स्टार बनले आहेत. सलमान खान, भाग्यश्री, अमृता राव, अनुपम खेर, अमिताभ बच्चन, सचिन पिळगावकर, माधुरी दीक्षित,मनीष बेहेल इतकंच नव्हे तर लक्ष्मीकांत बेर्डे यांना हिंदी चित्रपटात राजश्रीनेच घेतले आहे.

विश्लेषण: जितेंद्र आव्हाडांच्या अटकेपर्यंत पोहोचला ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा वाद ; नेमकं काय आहे प्रकरण?

राजश्री प्रॉडक्शनच्या चित्रपटांचे वेगळेपण :

बॉलिवूडमध्ये आज यशराज, धर्मा प्रॉडक्शन यांसारख्या निर्मिती संस्थांनी प्रेम या संकल्पनेवर अनेक चित्रपट काढले. राजश्री प्रॉडक्शनने कायमच भारतीय संस्कृती, एकत्र कुटुंब पद्धती, मैत्री, भारतीय मूल्य यावर आधारित चित्रपट बनवले आहेत. एकत्र कुटुंबाने बघावेत असे आजच्या काळातील चित्रपट फार कमी आहेत मात्र राजश्रीचे चित्रपट एकत्र कुटुंब पाहू शकतील असेच आहे. एकत्र कुटुंब पद्धती, भव्यदिव्य लग्न सोहळा हे भारतीय प्रेक्षकांना जास्त पसंतीस पडले आहे.

आज या निर्मिती संस्थेने ७५ वर्ष पूर्ण केली आहेत. या निर्मिती संस्थेनेदेखील अनेक चढउतार पाहिले असणार मात्र तरीदेखील आपल्या तत्वांवर ते कायमच ठाम राहिले आहेत. आज प्रेक्षकांना भव्यदिव्य, दाक्षिणात्य चित्रपटांचे रिमेक दाखवण्यात इतर निर्माते मंडळी व्यस्त आहेत मात्र राजश्रीने आजच्या काळात ही भारतीय परंपरेशी नाळ त्यांनी जोडली आहे.