पुन्हा एकदा पायरेट्स ऑफ द कॅरेबियन चित्रपट अभिनेता जॉनी डेप त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. पूर्वाश्रमीची पत्नी एम्बर हर्डच्या विरोधात जॉनीने पुन्हा एकदा कोर्टात मानहानीचा अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरू असून, त्यात अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. यासोबतच दोघांनी एकमेकांबद्दल अनेक खुलासेही केले आहेत. दरम्यान, तीन दिवसांपासून सुरु असलेल्या या खटल्यात जॉनी डेपने हर्ड विरुद्ध ५० दशलक्ष डॉलर मानहानीचा खटला दाखल केला आहे. एम्बर हर्ड ‘द वॉशिंग्टन पोस्ट’मध्ये लिहिलेल्या लेखाच्या आधारे डेपने हा खटला दाखल केला आहे.
या सुनावणीचे रूपांतर एक तमाशात झाले आहे जेव्हा ज्यामध्ये डेपने लहानपणी गोळ्या घेण्यापासून ते मानसिक आरोग्य बिघडण्यापर्यंत सर्व गोष्टींबद्दल साक्ष दिली आहे.
डेप हे का करत आहे?
हर्डच्या वकिलांनी चेतावणी दिली होती की खटला हा एक चिखलफेक करणारा असेल जो खरा जॉनी डेप उघड करेल. डेपने हर्डसोबत गैरकृत्य केल्याच्या आरोप खरे असल्याचे म्हटले नाही. त्याच्या मादक पदार्थांच्या वापर करण्याकडे आणि त्याच्या हिंसक वृत्तीकडे लोकांचे लक्ष वेधूनही, त्याने सांगितले की त्याला सत्य सांगण्याचे वेड आहे आणि ज्यांनी त्याच्याकडे आशेने पाहिले त्यांना निराश करू इच्छित नाही.
जॉनी आणि एम्बर हर्डचा २०१७ मध्ये घटस्फोट झाला, परंतु त्यानंतरही या पूर्वाश्रमीच्या जोडप्यामधील तणाव कमी झाला नाही. नुकत्याच झालेल्या न्यायालयीन खटल्याकडे पाहता दोघांमधील भांडण वाढत चालले आहे. आरोप-प्रत्यारोपांचा सुरूच असून दोघेही एकामागून एक धक्कादायक खुलासे करत आहेत.
जॉनी डेपकडून लैंगिक छळ
माध्यमांच्या वृत्तानुसार एम्बर च्या वकिलाने दावा केला आहे की तिचा मानसिक, शाब्दिक आणि शारीरिक छळ करण्यात आला आहे. जॉनीने एम्बरचे लैंगिक शोषणही केले होते. त्याने अंबरच्या खाजगी भागामध्ये दारूची बाटली घुसवली होती. तेव्हा हे जोडपे ऑस्ट्रेलियात सुट्टीसाठी गेले होते असे सांगण्यात आले आहे.
जेव्हा जॉनी डेपचे बोट कापले होते
जॉनीनेही हर्डवर शारीरिक छळ केल्याचा आरोपही केला होता. त्याने सांगितले की एम्बरने त्याच्यावर वोडकाची बाटली कशी फेकली आणि मधले बोट कापले गेले. त्यानंतर त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. पायरेट्स ऑफ द कॅरिबियन चित्रपटाच्या पाचव्या सीझनच्या निर्मात्यांनी देखील सीजीआयच्या मदतीने अभिनेत्याचे बोट ऑनस्क्रीन दाखवले जेणेकरून ते खरे वाटेल.
अशी झाली वादाची सुरुवात
घटस्फोटानंतर एम्बर हर्डने दावा केला होता की जॉनी डेप दारूच्या नशेत तिला मारहाण करायचा. मात्र जॉनी डेपने हे आरोप फेटाळून लावले. २०१८ मध्ये एम्बर हर्डने मध्ये वॉशिंग्टन पोस्टमध्ये एक ओपिनियन पोस्ट लिहिली होती. ज्यामध्ये त्याने स्वत:ला घरगुती हिंसाचारातून वाचलेले असल्याचे सांगितले. हर्डने त्यात जॉनी डेपचे नाव घेतले नाही, पण ती त्याच्याकडे बोट दाखवत असल्याचे दिसून आले. जॉनी डेपलाही याची जाणीव झाली आणि त्यांनी एम्बर हर्डवर मानहानीचा खटला दाखल केला.
एम्बर हर्डबद्दल वापरले होते अपशब्द
एम्बर हर्डच्या वकिलाने डेप आणि त्याचा मित्र बारूच यांच्या काही चॅट्स उघड केले होते. यामध्ये जॉनी त्याच्या माजी पत्नीएम्बर हर्डबद्दल अपशब्द वापरताना दिसला. हर्डबद्दल बोलताना तो म्हणाले की, मला आशा आहे की हर्डचे प्रेत होंडा सिलिकच्या ट्रंकमध्ये कुजत असावे. वृत्तानुसार, जॉनीचा मित्र बारूचने कोर्टात कबुली दिली आहे की, जॉनीने हे लिहिलं होतं. तरी तो त्याच्या मित्राचा बचाव करताना दिसला.
डेपला हवे होते घरातील सामान
खटल्यादरम्यान जॉनी डेपने २०१६ मध्ये अंबरच्या वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान दोघांमध्ये कसा वाद झाला होता, हे कोर्टात सांगितले. त्याने सांगितले की त्याला लग्न मोडायचे होते आणि त्यांच्या घरामधून त्याचे सामान काढून घ्यायचे होते. त्यावेळी एम्बर तिथे नव्हती. सुरक्षा रक्षक शॉनने सामान देण्यास नकार दिला.
सुरक्षा रक्षकाने दाखवला फोटो
एंटरटेनमेंट विकलीच्या वृत्तानुसार, जॉनी म्हणाला, मला काही बातम्या मिळाल्या होत्या. मला फोटो दाखवला. जॉनीने सांगितले की, एम्बर दोन-तीन दिवसांसाठी बाहेरगावी गेल्याचे समजल्यानंतर तो सामान घेण्यासाठी गेला होता. त्याला विशेषतः त्याच्यासाठी मौल्यवान वस्तू घ्यायच्या होत्या. यावर सुरक्षा रक्षक शॉनने थांबवले आणि म्हणाला की ही योग्य वेळ नाही. त्याने डेपला त्याच्या फोनवर एक फोटो दाखवला ज्यामध्ये त्याच्या पलंगाच्या एका बाजूला मानवी मलमूत्र पडलेले होते.
एम्बर हर्ड आणि कारासोबत एलन मस्कचे थ्रीसम?
या प्रकरणातील सर्वात मोठा धक्कादायक खुलासा एलोन मस्कच्या थ्रीसमबाबत झाला आहे. त्यामुळे एलन मस्कचे नाव पुन्हा एकदा या प्रकरणात ओढले गेले आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, २०१६ मध्ये एलन मस्क एम्बर हर्डच्या प्रेमात होते आणि तिच्यावर प्रेम करत होते. दोघेही एकत्र वेळ घालवत असत. नंतर एम्बर हर्डने देखील एका फोटोद्वारे एलन मस्कसोबतच्या तिच्या नातेसंबंधाची पुष्टी केली. आता पुन्हा एकदा इलॉन मस्कचे नाव चर्चेत आले आहे. जॉनी डेप आणि एम्बर हर्ड प्रकरणांच्या सुनावणीदरम्यान जारी करण्यात आलेल्या दस्तऐवजांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की एलन मस्कने एम्बर हर्ड आणि मॉडेल-अभिनेत्री कारा डेलेव्हिंगने शारीरिक संबंध ठेवले होते. तिने २०१६ मध्ये जॉनी डेप आणि हर्डच्या लॉस एंजेलिस येथील घराममध्ये थ्रीसम केले. त्यावेळी जॉनी डेप शूटिंगच्या निमित्ताने ऑस्ट्रेलियात होता.