सध्या भारतीय डोलो ६५० करोना महामारीदरम्यान देशातील सर्वाधिक प्रसिद्ध असे औषध म्हणून उदयास आले आहे. सध्या हे देशातील सर्वाधिक विकले जाणारे औषध आहे. करोनापूर्वीही हे औषध वापरले जात होते. पण करोनाच्या तिसऱ्या लाटेत डोलो ६५० वरचढ आहे. वेदना आणि तापावरील या औषधाने विक्रीच्या बाबतीत क्रोसिनला मागे टाकले आहे. मार्च २०२० ते डिसेंबर २०२१ पर्यंत, करोना महामारीच्या २० महिन्यांत ५६७ कोटी रुपयांच्या ३५० कोटी डोलो ६५० गोळ्यांची विक्री झाली आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेत डोलोने विक्रीचे रेकॉर्ड तोडले आहेत.

डोलो २०२१ मध्ये ३०७ कोटी रुपयांच्या विक्रीसह भारतातील दुसरे सर्वाधिक विकले जाणारे ताप आणि वेदनानाशक औषध बनले आहे. दुसरीकडे, GSK ची Kalpol ३१० कोटी रुपयांच्या विक्रीसह अव्वल स्थानावर आहे. क्रोसिन सहाव्या क्रमांकावर पोहोचली आहे. डोलो ६५० बनवणारी कंपनी मायक्रो लॅब्स लिमिटेड, बंगळुरू येथील आहे. दुसरीकडे, Kalpol आणि क्रोसिनची निर्मिती ब्रिटनस्थित बहुराष्ट्रीय कंपनी जीएसके फार्मास्युटिकल्सने केली आहे. डिसेंबर २०२१ मध्ये, डोलो ६५० ने २८.९ कोटी रुपयांच्या गोळ्यांची विक्री केली आहे, जी डिसेंबर २०२०च्या तुलनेत ६१.४५ टक्के जास्त आहे. डोलोची वाढती लोकप्रियता दाखवण्यासाठी हे आकडे पुरेसे आहेत.

Indian rupee latest marathi news
रुपयाची प्रतिडॉलर ८५ च्या दिशेने वाटचाल
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Mahindra Thar Earth Edition With More Than 3 Lakh Rupees Discount, See Thar Other Variant Offers
महिंद्रा थारवर मिळतेय ३ लाखांपर्यंत सूट; थार प्रेमींनो आत्ताच उचला संधीची फायदा, जाणून घ्या ऑफर्स डिटेल्स
11 December Latest Petrol Diesel Price
Daily Petrol Diesel Price :तुमच्या शहरांत पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? एक लिटर इंधनासाठी किती रुपये मोजावे लागणार?
modi government to purchase all farm produce at msp says shivraj singh chouhan
सर्व शेतमालाची खरेदी हमीभावाने; केंद्रीय कृषीमंत्री चौहान यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
Vishal Mega Mart IPO
Vishal Mega Mart IPO Date : तुफान कमाई करून देणार ८,००० कोटींचा हा आयपीओ; पहिल्याच दिवशी लागेल लॉटरी, जाणून घ्या संपूर्ण माहिती….
bitcoin price review bitcoin prices got a boost reaches 100000 usd
विश्लेषण : ‘बिटकॉइन’ पोहोचले १ लाख डॉलरवर… का आणि कसे? भारतात मान्यता मिळेल?
bitcoin surges above 100000 usd for the first time in 2024
‘बिटकॉइन’ तेजीचे १ लाख डॉलरचे शिखर

“काही दिवसांनी Dolo 650 सोन्याच्या दुकानांमध्ये मिळेल”; करोनाच्या तिसऱ्या लाटेत मागणी वाढल्याने मीम्स व्हायरल

डोलो ६५० टॅब्लेट हे वेदना कमी करण्यासाठी आणि ताप कमी करण्यासाठी वापरले जाणारे औषध आहे. डोकेदुखी, अंगदुखी, दातदुखी आणि सर्दी यांसारख्या इतर समस्यांवर उपचार करण्यासाठी याचा वापर केला जातो. वेदना आणि ताप कारणीभूत असलेल्या काही रसायनांचे प्रकाशन रोखून ते कार्य करते.

डोलो ६५० टॅब्लेट एकट्याने किंवा दुसर्‍या औषधाच्यासोबत दिले जाऊ शकते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते नियमितपणे घेता येते. सामान्यतः याचे सेवन अन्नासोबत करणे चांगले असते, अन्यथा त्यामुळे पोटाचा त्रासही होऊ शकतो. याचे जास्त प्रमाणात सेवन करू नये असा सल्लाही डॉक्टरांकडून दिला जातो.

लोकसत्ता विश्लेषण : कोविड-१९चा पुन्हा किती वेळा संसर्ग होऊ शकतो?; जाणून घ्या..

हे औषध योग्य प्रकारे वापरले तर दुष्परिणाम कमी होतात. या औषधामुळे काही लोकांमध्ये पोटदुखी, मळमळ आणि उलट्या होऊ शकतात. जर यापैकी कोणतेही दुष्परिणाम त्रासदायक असतील तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हे औषध सुरक्षित मानले जाते पण प्रत्येकासाठी योग्य नाही. ते घेण्यापूर्वी, तुम्हाला यकृत किंवा मूत्रपिंड समस्या असल्यास किंवा रक्त पातळ करणारी औषधे वापरत असल्यास तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

डोलो ६५० टॅब्लेट हे वेदना कमी करण्यासाठी आणि उपचार करण्यासाठी वापरले जाणारे सामान्य वेदनाशामक औषध आहे. डोकेदुखी, मज्जातंतूचे दुखणे, दातदुखी, घसा खवखवणे, मासिक पाळीत दुखणे, सांधेदुखी आणि स्नायू दुखणे यावर ते प्रभावी आहे.

लोकसत्ता विश्लेषण : कोविड-१९ मधून बरे झालेल्यांना ओमायक्रॉन पुन्हा संक्रमित करू शकतो? जाणून घ्या…

या गोळ्या जास्त प्रमाणात किंवा जास्त वेळ घेऊ नका कारण ते धोकादायक असू शकते. गर्भधारणेदरम्यान किंवा स्तनपान करवताना वेदना कमी करण्यासाठी ही पहिली निवड असते. या औषधामुळे होणाऱ्या बहुतेक दुष्परिणामांना डॉक्टरांच्या सल्ल्याची आवश्यकता नसते. साइड इफेक्ट्स कायम राहिल्यास किंवा लक्षणे वाढत असल्यास, डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.

Story img Loader