अभिनेत्री कंगना रणौतने देशाचं नाव बदलण्याची गरज असल्याचं वक्तव्य केलं आहे. कंगनाने देशाचं ‘इंडिया’ हे नाव बदलून ‘भारत’ असं करण्याची मागणी आपल्या फेसबुक पोस्टमधून केलीय. ‘इंडिया’ हे नाव ब्रिटीशांनी ठेवलं असून ते गुलामगिरीची आठवण करून देणारं आहे, असं ती म्हणाली आहे. मात्र कंगनाने मांडलेल्या या मुद्द्यानंतर आपल्या देशाला नाव नक्की कसं पडलं यासंदर्भातील चर्चा सुरु झाल्या आहेत. म्हणजेच भारत, हिंदुस्तान, इंडिया ही नावं देशाला कशी पडली यासंदर्भात अनेकांना माहिती नाहीय. त्याचबद्दल जाणून घेण्याचा केलेला हा प्रयत्न….

कंगना काय म्हणाली?

nana patekar amitabh bachchan KBC 16
नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Indian communities Unity in Diversity
भारतात खरोखरच ‘विविधतेत एकता’ आहे का?
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
Opposition leaders hold protest in the Parliament complex over Adani issue
Priyanka Gandhi : ‘मोदी-अदाणी भाई भाई’ असं लिहिलेली बॅग घेऊन प्रियांका गांधी पोहचल्या संसदेत, राहुल गांधी म्हणाले, “क्यूट..”
allahabad highcourt
“हे हिंदुस्थान आहे, बहुसंख्याकांच्या इच्छेनुसारच देश चालणार”, न्यायाधीशांच्या वक्तव्याची चर्चा!
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Who is Telangana Thalli?
Telangana Thalli : ‘तेलंगणा थळ्ळी’ कोण आहेत? त्यांच्या नव्या पुतळ्यावरुन नेमका वाद का पेटला आहे?

आधी पुस्तकांमधले किंवा इतर संदर्भ देण्याआधी कंगनाच्या ज्या पोस्टवरुन देशाच्या नावाबद्दल चर्चा सुरु झालीय त्या पोस्टमध्ये काय म्हटलं आहे बघुयात…

भारत शब्दाचा अर्थ सांगताना कंगना तिच्या पोस्टमध्ये म्हणते, ” ब्रिटीशांनी आपल्याला ‘इंडिया’ हे गुलामीचं नावं दिलंय. ज्याचा अर्थ केवळ सिंधू नदीच्या पूर्वेकडील देश असा होतो. आपण एखाद्या लहान मुलाला ‘लहान नाक’,’दुसरा मुलगा’ किंवा त्याहून वाईट म्हणजे ‘सी-सेक्शन’ अशा नावाने उल्लेख करू का? हे कसलं नाव आहे?” कंगनाने पुढे भारत या शब्दाचा अर्थ सांगितला. “भारत हा संस्कृत शब्द आहे. भा म्हणजे भाव. र म्हणजे राग आणि त म्हणजे ताल असा आहे. गुलाम होण्याआधी आपण सांस्कृतिक आणि कलात्मकतेच्या बाबतीत खूपच विकसित होतो,” असं कंगना तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

पण खरोखरच भारताला भारत हे नाव कसं पडलं याची गोष्ट फार रंजक आहे. संजीव संन्याल यांनी लिहिलेले ‘लँड ऑफ द सेव्हन रिव्हर्स – अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ इंडियाज् जिओग्राफी’ पुस्तकामधील हिंदुस्तान आणि भारत या नावांचा उगम कसा झाला आणि एकंदरितच भारताच्या भौगोलिक इतिहासाबद्दल मुद्दे जाणून घेऊयात…

– सरस्वती नदीकाठचे भरभराटीला आलेले नागरीकरण, जशी नदी आटत गेली तसे लयाला गेले. या लयाचा विचार, अभ्यास केल्याशिवाय भारताच्या इतिहासाचा प्रवाह समजून घेता येणार नाही.

नक्की वाचा >> समजून घ्या : लस घेतल्यानंतर नक्की किती दिवसांनी करोना संसर्गाचा धोका कमी होतो

– भारतीय लोक भूगोल, इतिहास, नागरीकरण यांविषयी पाश्चात्त्यांच्या तुलनेत मागासलेले होते, अशी समजूत आहे, ती खरी नाही.

– नवीन संशोधनानुसार भारतीय उपखंड आता जसा भौगोलिकदृष्टय़ा स्वतंत्र आहे, तसा पूर्वी नव्हता, तर आफ्रिका व मादागास्करशी जोडलेला होता.

– ख्रिस्तपूर्व १५००च्या दरम्यान आर्य (इंडो-युरोपियन) घोडे आणि पोलादी तलवारी घेऊन आशियावर आक्रमण करून आले. त्यांनी त्यानंतर भारताचे नागरीकरण केले अशी समजूत आहे. ती घट्ट करणे युरोपीय ब्रिटिशांच्या सोयीचे होते. परंतु नवीन संशोधनाकडे पाहिले असता सरस्वती काठचे ‘द्रविडी-हडाप्पा’ नागरीकरण हे त्याहून खूपच प्राचीन व प्रगत होते.

नक्की वाचा >> समजून घ्या : करोना मृतांच्या कुटुंबीयांना चार लाखांची भरपाई मिळणार का?; काय आहे कायदा?

– हार्वर्ड मोडिकल स्कूलच्या डेव्हीड रीच या शास्त्रज्ञाने २००९मध्ये प्रसिद्ध केलेल्या संशोधनानुसार भारतातील लोक हे प्राचीन दक्षिण भारतीय (Ancestral South Indian) आणि प्राचीन उत्तर भारतीय (Ancestral North Indian) या दोन ढोबळ गटांत विभागले जातात. यातील दक्षिणेकडील प्रजा ही युरोप, पूर्व आशिया वा इतर कोणत्याही वंश-गटाशी संलग्न नाही. पण उत्तर भारतातील लोकांमध्ये काहीसा युरोपियन संकर आढळतो. उत्तरेतील R1a1 हे जैविक मिश्रण (Gene Mutation) हे उत्तर भारतीयांत आणि पूर्व युरोपीयन, चेकोस्लोवाकिया, पोलंड, लिथुआनिया, दक्षिण सबेरिया, कझाकिस्तान, उत्तर पूर्व इराण आणि कुर्दस्तिान यात सामायिक आढळते. जसा उत्तर भारतीय मानव हा कोणत्याही एका वंशाशी निगडित नाही, त्याचप्रमाणे दक्षिण भारतीय मानवही कोणत्याही एका वंशाशी निगडित नाही. त्यामुळे शुद्ध वंश असे काही भारतात अस्तित्वात नाही.

नक्की वाचा >> समजून घ्या : देशामधील करोना संसर्गाचा वेग एवढ्या झपाट्याने का कमी होतोय?

– प्राचीन भारतीय इतिहासात दोन स्रोत उपयोगाचे पडतात-
१) पुरातत्त्व पुरावा आणि २) वैदिकपरंपरेतील साहित्य रचना. यांचा थेट संबंध हडप्पन, इंडस व्हॅली किंवा इंडस-सरस्वती नागरी प्रस्थापनेशी आहे. १९२०च्या दशकात राखाल दास बॅनर्जी, सर जॉन मार्शल या भारतीय पुरातत्त्व खात्यांतील संशोधकांनी आणि दयाराम सहानी या शास्त्रज्ञाने हडप्पन संस्कृतीचा शोध लावेपर्यंत, आर्य संस्कृतीचे अवडंबर कमी झाले नव्हते. मोहंजोदडो या एकाच शहरात ५०,००० पेक्षा जास्त लोक राहत होते आणि या शहरात ६०० ते ७०० विहिरी होत्या. याचा अर्थ तेथील मानवाचे वास्तव्य, नागरी जीवनाचे अस्तित्व बऱ्याच काळापर्यंत अस्तित्वात होते आणि ते आर्याच्या आगमनापूर्वी होते. हडप्पन भारतीय आणि आर्य यांतील विशेष फरक हा घोडय़ांच्या वापराचा आहे. हडप्पन संस्कृतीत घोडे नव्हते, आर्य घोडे घेऊन आले. ऋग्वेदातील आर्याचा उल्लेख हा खास करून घोडय़ांच्या संदर्भात येतो.

– हिंदूंच्या सर्वात जुन्या रचनांपकी ऋग्वेद ही रचना आहे आणि ती आजही पवित्र मानली जाते. ऋग्वेदात सरस्वतीचा उल्लेख ‘नदीस्तूतीसूक्त’ या रचनेत आला आहे. सरस्वतीचे भौगोलिक स्थान यमुना आणि सतलजमध्ये असल्याचे म्हटले आहे. गंगेचा उल्लेख मात्र नाममात्र असाच आहे. अलाहाबादमध्ये जिथे यमुना आणि गंगेचा संगम होतो, तिथेच जमिनीखाली सरस्वती वाहत असावी असे संन्याल यांचे मत आहे.

– सप्तसिंधू (या सात नद्या) हे ऋग्वेदाचे उगम स्थान होय. कदाचित सप्तसिंधू म्हणजे फक्त सरस्वती आणि वर्णघात होऊन सप्तसिंधूचे ‘हप्तिहदू’ असे नामकरण झाले आणि त्यातून हिंदू हे नाव उदयाला आले.

नक्की वाचा >> समजून घ्या : काही किलोमीटरपर्यंत पसरलेल्या या ‘स्पायडर वेब’मागील रहस्य आहे तरी काय?

– ‘हिंदू’ या शब्दाच्या आणखी दोन व्याख्या सापडतात. १. हिंदेन – इजिप्शीयन भाषेत कापसाला हिदेन म्हणत असत. कापूस भारतातून इजिप्तला गेला या संदर्भात हिंदेनचे हिंदू झाले असावे. २. इंडस-सिंधू नदीच्या जवळ हिंदूकुश आदी ठिकाणी राहणारे लोक ते हिंदू असेही असावे.

– ‘दहा राजांचे युद्ध’ असा जो एका महायुद्धाचा उल्लेख ऋग्वेदात येतो ते युद्ध पंजाबातील रावी नदीच्या किनारी झाले. दहा वेगवेगळ्या टोळ्यांनी एकत्र येऊन ‘भारत’ नावाच्या बलाढय़ टोळीवर हल्ला केला. ऋग्वेदामध्ये भारत या टोळीचा उल्लेख त्रुसू असाही येतो. भारत ही टोळी आज जिथे हरयाणा आहे तेथील. भारत या टोळीचे गुरू वसिष्ठ (आणि त्यांचे शत्रू विश्वामित्र) होत. या टोळीने इतर टोळ्यांचा दणदणीत पराभव केला. या टोळीच्या नावावरून आपल्या देशाला ‘भारत’ हे नाव पडले असावे.

– भारत या बलाढय़ टोळीने पराभूत केलेल्या टोळ्यांपकी दोन मोठय़ा टोळ्या म्हणजे द्रुया (Druhya) आणि पारसू (Parsu) या होय. त्यातील द्रुया या टोळीला पंजाबातून पूर्व अफगाणिस्तानात हाकलण्यात आले. ‘गंधर्व’ हा त्यांचा राजा. त्यावरूनच आजचे ‘कंदाहार’ हे नाव रूढ झाले. म्लेंच्छ (Mlechhas) या शब्दाचा अर्थ राक्षसी वृत्तीचे परकीय लोक असा होतो. द्रुया या टोळीचा उल्लेख ऋग्वेदात म्लेंच्छ (Mlechha) असा केलेला आढळतो.

नक्की वाचा >> Explained: संसर्गाची लाट म्हणजे काय? ती कशी येते? तिसरी लाट टाळता येणं शक्य आहे का?

– दुसरी टोळी पारसू. ही टोळी बरेच अंतर गाठत पाख्ता या टोळीबरोबर (आजचे पख्तून) पार पíशयाच्या टोकापर्यंत जाऊन पोहोचली. तिथे गेल्यावरही त्यांनी आपला आर्य धर्म टिकवून ठेवला. पíशयात न आढळणारा सिंह हा परसूनी आपले प्रतीक म्हणून कसा वापरला? कारण त्यांना सिंह-आर्यावर्तामुळे माहिती होता. अगदी अलीकडे इराणच्या शहाचे प्रथम बिरुद हे ‘आर्य-मिहीर’ असेच होते. ऋग्वेद आणि झेंद अवेस्ता यांमध्ये आढळणारे साम्य सर्वश्रुत आहे. यातूनच सप्तसिंधू, हप्तिहदू हा वर्णबदल अभिप्रेत आहे. कालांतराने पर्शियातून यातीलच काही लोक इस्लामच्या हल्ल्यामुळे पारसी म्हणून भारतात परत आले.

– ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ ही महाकाव्ये, महायुद्धे दक्षिणापथ आणि उत्तरापथ या दोन महामार्गावर घडलेली दिसतात. सीता, द्रौपदीपेक्षा रेशीम, रत्ने, मसाले यांच्या व्यापारावर ताबा मिळवणे हे या युद्धांचे अर्थकारण असावे. (Helen of troy किंवा Cleopatra यांच्यामुळे झालेल्या युद्धांतसुद्धा, व्यापार हे मूळ कारण असल्याचे दिसते.)

नक्की वाचा >>  समजून घ्या : Long Covid म्हणजे काय आणि त्यावर कशी मात करता येते?

प्राचीन भारतातील विजयनगर आणि आर्यावर्त हे दोन प्रांत वेगवेगळ्या काळी केंद्रिबदू होते. विजयनगरचे साम्राज्य आणि दौलताबादचा किल्ला यांची जशी महती पुस्तकात वर्णिली आहे, त्यापेक्षा अधिक महती ही आर्यावर्त, (म्हणजे आताचा हरयाणा) याविषयी आहे. आर्यावर्त हेच केंद्रस्थान धरून इतिहासाचे विश्लेषण संन्याल यांनी केले आहे. हरियाणाचे आजचे संदर्भ आर्यावर्ताशी कसे निगडित आहेत, तसेच आर्यावर्ताचे केंद्र म्हणजे आत्ताचे गुडगांव असे थोडेसे धाडसाचे विधान संजीव संन्याल ‘लँड ऑफ द सेव्हन रिव्हर्स – अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ इंडियाज् जिओग्राफी’ या पुस्तकात केलं आहे.

नक्की वाचा >> ‘साइटोकिन स्टोम’ म्हणजे काय?; तरुण रुग्णांचा मृत्यू होण्यासाठी हाच फॅक्टर कारणीभूत असतो का?

इंडिया नाव कुठून आलं?

कंगनाने जरी इंडिया हे नाव ब्रिटीशांनी दिल्याचा दावा केला असला तरी इंडिया हा शब्द मूळच्या लॅटीन भाषेतून आलाय. इंडिया नावाबद्दल सांगायचं झाल्यास या शब्दाचा उगम हा लॅटीन भाषेत सापडतो. इंडस या पर्शियन नावाने सिंधू नदी ओळखळी जायची. याच नदीच्या आजूबाजूचा परिसर या अर्थाने सिंधू नदीच्या पूर्वेकडील भूभागाला ग्रीक आणि पर्शियन लोकांनी इंडिया असं नाव दिल्याचं सांगितलं जातं. नंतर हळूहळू सिंधू नदीपासून ते पूर्व आणि दक्षिणेपर्यंतच्या भूभागाला इंडिया नावाने संबोधलं जाऊ लागल्याचं सांगण्यात येतं.

मूळ लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Story img Loader