अन्वय सावंत
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे प्रतिष्ठेच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला गुरुवारपासून (२८ जुलै) सुरुवात होणार असून भारतीय क्रीडारसिकांना या स्पर्धेत आपल्या खेळाडूंकडून दमदार कामगिरीची अपेक्षा आहे. गेल्या वर्षीच्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताने एका सुवर्णपदकासह सात पदकांची कमाई केली. ही ऑलिम्पिकमधील भारताची सर्वोत्तम कामगिरी ठरली होती. आता याच प्रकारची ऐतिहासिक कामगिरी भारत राष्ट्रकुलमध्ये करू शकेल का, कोणते खेळाडू सुवर्णपदकासाठी प्रबळ दावेदार असतील आणि नेमबाजी या खेळाला राष्ट्रकुलमधून वगळल्याचा भारताला कसा फटका बसू शकेल, याचा आढावा-
भारताची राष्ट्रकुलमधील आजवरची कामगिरी कशी आहे?
भारताने राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासात १८१ सुवर्ण, १७३ रौप्य आणि १४९ कांस्य अशी एकूण ५०३ पदके मिळवली आहे. त्यामुळे या स्पर्धेत सर्वाधिक पदके जिंकणाऱ्या देशांमध्ये भारताचा चौथा क्रमांक लागतो. भारताच्या खेळाडूंनी राष्ट्रकुल स्पर्धांच्या गेल्या काही पर्वांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. २०१८मध्ये ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या गेल्या पर्वात भारताने २६ सुवर्णपदकांसह एकूण ६६ पदके जिंकली होती. त्यामुळे भारताला पदकतालिकेत ऑस्ट्रेलिया (८० सुवर्णपदकांसह एकूण १९८ पदके) आणि ब्रिटन (४५ सुवर्णपदकांसह १३६ पदके) यांच्याखालोखाल तिसरे स्थान मिळवण्यात यश आले होते. मात्र, भारताने राष्ट्रकुल स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी ही २०१० मध्ये केली होती. या स्पर्धेचे यजमानपद भूषवताना भारताने १०१ पदके पटकावली होती. यात ३८ सुवर्णपदकांचाही समावेश होता. त्यामुळे पदकतालिकेत भारताने ऑस्ट्रेलियानंतर दुसरे स्थान पटकावले होते. यंदा भारतीय खेळाडूंना यापेक्षा दर्जेदार कामगिरी करता येते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
यंदा भारताचे किती खेळाडू उतरत आहेत?
यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारताने ३००हूनही अधिक जणांचे पथक बर्मिंगहॅम येथे पाठवले आहे. यात २१५ खेळाडूंचा समावेश असून ते १५ विविध क्रीडा प्रकारांत देशाचे प्रतिनिधित्व करतील. भारताला काही क्रीडा प्रकारांत सुवर्णपदकासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे, तर अन्य काही खेळांमध्ये धक्कादायक निकालांची नोंद करून पदक जिंकण्याची भारतीय खेळाडूंमध्ये क्षमता आहे.
कोणत्या खेळांत आणि खेळाडूंकडून पदकाची अपेक्षा आहे?
भारताला राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाजीपाठोपाठ वेटलिफ्टिंग, कुस्ती, बॉक्सिंग आणि बॅडमिंटन यांसारख्या खेळांमध्ये सर्वाधिक पदके मिळाली आहेत. यंदाही या खेळांकडून भारताला अपेक्षा आहेत. कुस्तीमध्ये विनेश फोगट आणि बजरंग पुनिया, तर वेटलिफ्टिंगमध्ये ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती मीराबाई चानू या राष्ट्रकुल स्पर्धेच्या गेल्या पर्वातील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंचा यंदाही सोनेरी यशाचा मानस असेल. बॅडमिंटनमध्ये भारताला दमदार कामगिरीची अपेक्षा आहे. महिला एकेरीत दोन वेळची ऑलिम्पिक पदकविजेती पीव्ही सिंधू, तर पुरुष एकेरीत किदम्बी श्रीकांत आणि लक्ष्य सेन यांच्यावर भारताची भिस्त आहे. सात्विकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही दुहेरीची जोडीही पदक जिंकण्यात सक्षम आहे. बॉक्सिंगमध्ये अमित पंघाल, शिवा थापा, लवलिना बोरगोहेन आणि निकहत झरीन यांना पदककमाईसाठी दावेदार मानले जात आहे. टेबल टेनिसमध्ये मनिका बात्रा, शरथ कमल आणि साथियन यांच्यामुळे भारताची पदकाची संधी बळावली आहे. त्याच प्रमाणे भारताचे हॉकी संघ, भारताचा महिला क्रिकेट संघ यांच्याकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा करता येऊ शकेल. धावपटू हिमा दासच्या पुनरागमनाकडेही चाहत्यांचे लक्ष असेल.
नेमबाजीला वगळल्याचा भारताला कसा फटका बसेल?
भारताने राष्ट्रकुल स्पर्धेत आजवर मिळवलेल्या एकूण ५०३ पदकांपैकी सर्वाधिक १३५ पदके ही नेमबाजांनी जिंकवून दिली आहेत. यात ६३ सुवर्णपदकांचाही समावेश आहे. तसेच गोल्ड कोस्ट येथे झालेल्या गेल्या पर्वात भारताच्या ६६ पदकांपैकी २५ टक्के पदके ही नेमबाजीत मिळाली होती. भारताच्या नेमबाजांनी अलीकडच्या काळात विविध विश्वचषक आणि जागतिक स्पर्धांमध्ये आपले नाणे खणखणीत वाजवले आहे. त्यामुळे यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेतून नेमबाजीला वगळण्यात आल्याचा भारताला नक्कीच फटका बसेल.
भालाफेकपटू नीरजची उणीव जाणवेल का?
भारताचा वलयांकित भालाफेकपटू नीरज चोप्राला मांडीच्या स्नायूला झालेल्या दुखापतीमुळे राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार घेणे भाग पडले. नीरजला सर्वोत्तम भारतीय ॲथलीट मानले जाते. त्याने टोक्यो ऑलिम्पिक आणि नुकत्याच झालेल्या जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करताना अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदकांची कमाई केली होती. नीरजला राष्ट्रकुल स्पर्धेतील भालाफेकीतही सुवर्णपदकासाठी प्रमुख दावेदार मानले जात होते. राष्ट्रकुलमधील ॲथलेटिक्स स्पर्धांमध्ये भारताला गेल्या ७२ वर्षांत केवळ २८ पदके जिंकता आली आहेत. त्यातच आता नीरजला माघार घ्यावी लागल्यामुळे भारताचे एक निश्चित पदक हातून निसटल्याची चाहत्यांची भावना आहे.