युक्रेनमधील भारतीय दूतावासाने बुधवारी सर्व भारतीय नागरिकांना तातडीने खार्किव सोडण्याचा सल्ला दिला होता. ट्विट करत भारतीय दूतावासाने खार्किवमधील भारतीयांना लवकरात लवकर निघून पेसोचिन, बाबये किंवा बेझल्युडोव्हका येथे जाण्यास सांगितले आहे. तसेच युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षित स्थलांतरासाठी रशिया मानवतावादी दृष्टिकोनातून मार्ग तयार करत असल्याचा निर्वाळा रशियन राजदूतांकडून देण्यात आला आहे. युक्रेन-रशियालगतच्या पूर्व आणि ईशान्य भागात सुमारे चार हजार भारतीय अडकून पडले असून, त्यात बहुतांश वैद्यकीय विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
युक्रेनमधील शहरे महत्त्वाची धोरणात्मक लक्ष्ये असल्याने, रशिया ते काबीज करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे खार्किव, किव्ह इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.या भागांमध्ये मोठ्या लष्करी तुकड्या महामार्ग आणि रस्त्यांवर फिरत आहेत. त्यामुळे भारतीय दूतावासाने तात्काळ युक्रेनमधील शहरे सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे अशा युद्ध सुरु असलेल्या भागांमध्ये प्रवास करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी ते जाणून घेऊया…
सोबत काय घ्याल..
अशा परिस्थितीत जमेल तितके सोबत नेण्याची प्रवृत्ती टाळली पाहिजे. जर तुम्ही खूप जास्त सामाना सोबत घेतले तर तुम्ही वाहतुकीवर अवलंबून राहता. अशावेळी चालायला तयार राहा आणि तुमच्या पाठीवर जेवढे घेऊन जाऊ शकता तेवढेच सामान सोबत घ्या. कपडे ही सर्वात आवश्यक गोष्ट आहे. बुट, चांगले मोजे, उबदार कपडे, चॉकलेटसारखे अन्न, पाणी आणि पैसे हे सोबत घ्यावे.
एकत्र राहा
सरकारने त्यांच्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी काही नियोजन केले असल्यास, स्वतःहून बाहेर पडण्यापेक्षा त्याचे अनुसरण करा. ते अधिक व्यवस्थित असतील, कुठे जायचे ते सांगतील. कदाचित यामध्ये निवारा आणि अन्न असलेली काही ठिकाणे असतील. तसे झाले नाही तर नेहमी एकत्र गटात रहा. स्वतःहून बाहेर जाऊ नका. आपल्याला एकमेकांची आवश्यकता असेल. कोणीतरी आजारी पडू शकते, कोणीतरी अशक्त असू शकते आणि अशावेळी मदतीची आवश्यकता असू शकते.
फोन्स बाय टर्न
तुमच्याकडे संवादाचे काही साधन असणे आवश्यक आहे. जर तुम्ही १० ते १५ लोकांच्या गटात असाल तर फक्त एक किंवा दोन मोबाईल फोन चालू ठेवा. प्रत्येकाचा फोन एकाच वेळी चालू नसावा आणि चार्जिंग संपण्याची भीती असते. दूफे भारतीयांना जिथे पोहोचण्याचा सल्ला देण्यात आला आहे ती तीन ठिकाणे खार्किवपासून ११ ते १६ किमीच्या दरम्यान आहेत आणि त्यांना चालायला दोन ते चार तास लागू शकतात. तसेच त्या परिसरातील तापमान खाली आले आहे.
क्रॉसफायरमध्ये अडल्यास
तसे झाल्यास, तुम्ही सामान्य नागरिक आहात म्हणून ओळख पटवून देण्याचा प्रयत्न करणे चांगले आहे. अशा प्रकारच्या संघर्षात नागरिकांना जाणूनबुजून लक्ष्य केले जात नाही. तुम्ही नागरिक असल्याच धावण्याचा किंवा लपण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आणि गोळी लागण्याचा धोका पत्करण्याऐवजी हात वर करून चाला.
तुम्हाला सैनिक दिसल्यास
अशावेळी त्यांच्याजवळ जाणे योग्य नाही. ते त्यांच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करत असतात.
तुम्ही जागेवरुन हलू शकत नसल्यास
जोपर्यंत विरोधकांचे लक्ष्य लष्करी कार्यालये आहेत, तोपर्यंत तुम्ही तुलनेने सुरक्षित आहात. तुमच्या सध्याच्या ठिकाणी सर्वात सुरक्षित ठिकाण कोणते आहे याचे मूल्यांकन करा. लष्करी प्रतिष्ठान, सरकारी इमारती, दळणवळण केंद्रांवर हल्ले केले जातील. रुग्णालये आणि शाळांच्या परिसरातील ठिकाणे, ज्यांना सहसा लक्ष्य केले जात नाही, ते अधिक सुरक्षित असतील. मात्र, नागरी क्षेत्रे लक्ष्यित होऊ लागल्यास, शक्य तितक्या लवकर सोडणे चांगले. लढाई क्षेत्रात मोठ्या संख्येने भारतीय अकडले आहेत.
दरम्यान, घाबरणे टाळा. कारण जेव्हा तुम्ही घाबरत असाल तेव्हा तुम्ही योग्य विचार नसलेले निर्णय घ्याल. अफवा पसरवणे टाळा, थंड डोक्याने विचार करा. अशा प्रकारे तुम्ही चांगले आणि अधिक माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकता.
(२०१६ मध्ये नॉर्दर्न आर्मी कमांडर म्हणून निवृत्त झालेल्या लेफ्टनंट जनरल हुड्डा यांनी याबाबत माहिती दिली आहे. हुड्डा यांनी इथिओपिया आणि एरिट्रियामधील संयुक्त राष्ट्रांच्या मिशनसह अनेक लढाऊ क्षेत्रात काम केले आहे.)