राज्यात अतिवृष्टीने गुरुवारी (२२ जुलै २०२१ रोजी) हाहाकार माजवला. चिपळूण, महाडला पुराने वेढले असून, त्यात शेकडो नागरिक अडकले आहेत. उल्हास नदीच्या पुरामुळे बदलापूरसह कल्याण तालुक्यातील अनेक गावे जलमय झाली. कोल्हापूरसह पश्चिाम महाराष्ट्रातील नद्यांनीही धोक्याची पातळी ओलांडल्याने अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली. विदर्भातही अतिवृष्टीने दाणादाण उडवली. दुसरीकडे खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गुरुवारी सलग चौथ्या दिवशी मुसळधार पाऊस कायम आहे. त्यामुळे खडकवासला धरण गुरुवारी दुपारी १०० टक्के भरले. परिणामी या धरणातून मुठा नदीपात्रात १० हजार ९६ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. खडकवासलाच नाही तर इतर धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्येही समाधानकारक पाऊस झाल्याने धरणं भरु लागली आहेत. मात्र ती क्षमतेपेक्षा अधिक भरल्यानंतर त्यामधील पाणी सोडून देण्यात येतं. अनेकदा आपण बातम्यांमध्ये वाचतो त्याप्रमाणे अमुक एका धरणातून इतकं क्युसेक पाणी सोडलं, इतक्या टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला असा उल्लेख दिसतो. मात्र धरणातून अमूक क्युसेक पाणी सोडलं म्हणजे नक्की किती? एक टीएमसी म्हणजे नक्की किती लीटर पाणी हे अनेकांना ठाऊक नसतं. त्याच पार्श्वभूमीवर धरणातील पाणी पातळी कशी मोजली जाते आणि त्याचा विसर्ग करताना वापरल्या जाणाऱ्या एककांचा समान्य भाषेतील अर्थ काय यावर टाकलेली नजर…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा