या आठवड्यात पार पडलेल्या नोएडा प्राधिकरणाच्या बैठकीत पाळीव प्राण्यांचे नोंदणीकरण आणि त्यांच्याशी निगडीत घटनांसाठी दंडासंदर्भात अनेक नियम बनवले गेले. या धोरणांवर मागील काही घटनांनंतर काम सुरू झाले होते. विशेषकरून नोएडामधील विविध सोसायटींमधील भटकी आणि पाळीव कुत्री चावण्याच्या घटनानंतर प्राणीप्रेमी आणि त्यांच्या विरोध करणाऱ्यांमध्ये वाद-विवादाच्या अनेक घटना समोर आल्यानंतर, यासंदर्भात काम सुरू झाले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नोएडा के सेक्टर १०० मध्ये एका भटक्या कुत्र्याने नवजात बालकावर हल्ला करून ओरबाडल्यानंतर पाळीव आणि भटक्या प्राण्यांसंदर्भात नवीन नियमांची नितांत गरज भासत होती. या मुलाचे आई-वडील एका बांधकामाच्या ठिकाणी काम करत होते, तेव्हा भटक्या कुत्र्याने त्यांच्या बाळावर हल्ला केला.

१ फेब्रुवारी २०२३ च्या अगोदर पाळीव प्राण्यांसाठी नोंदणीकरण –

सर्वात अगोदर तर नोएडामधील रहिवाशांना १ फेब्रुवारी २०२३ अगोदर ५०० रुपयांचे वार्षिक शुल्क भरून, नोएडा प्राधिकरणाचे अॅप NAPRवर आपल्या पाळीव मांजर, कुत्र्यांची नोंदणी करावी लागेल. याचबरोबर त्यांना १ फेब्रुवारी २०२३ अगोदरच आपल्या पाळीव प्राण्यांची नसबंदी करण्यासोबतच रेबीजचे लसीकरणही करून घ्यावे लागणार आहे. यामध्ये विलंब झाल्यास प्रतिमहिना २ हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. याशिवाय पाळीव प्राण्यांनी सार्वजनिक ठिकाणांवर घाण केल्यास तिथे स्वच्छता करण्याची जबाबदारीही त्या प्राण्यांच्या मालकाची असणार आहे.

…तर मालकाला १० हजारांचा दंड –

नोएडा प्राधिकरणाने अगोदर घोषणा केली होती की पाळीव प्राण्याने कुणाला जखमी केल्यास मालकाकडून १ मार्च २०२३ पासून १० हजार रुपये वसूल केले जातील. मात्र नंतर नोएडा आणि ग्रेटर नोएडा प्राधिकरणाशी निगडीत अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, हा नियम तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आला आहे. नोएडा आणि ग्रेटर नोएडामध्ये पाळीव प्राण्यांकडून जखमी होण्याच्या घटना समोर आल्यानंर त्यांच्या मालकाकडून १० हजार रुपये वसूलही करण्यात आले. याचबरोबर उपचाराचा संपूर्ण खर्चही उचलण्यास सांगण्यात आले आहे.

‘डॉग शेल्टर्स’ बनवले जाणार –

सततच्या भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाला कमी करण्यासाठी प्राधिकरण स्वखर्चाने ‘डॉग शेल्टर’ तयार करण्याच्या विचारात आहे. ज्याची नंतर स्थानिक आरडब्ल्यूए देखभाल करेन. या डॉग शेल्टरमध्ये आजारी आणि आक्रमक कुत्र्यांना ठेवले जाईल.

ग्रेटर नोएडामध्येही नियम लागू होणार –

नोएडा प्राधिकरणाच्या धर्तीवर ग्रेटर नोएडा प्राधिकरणही हे धोरण आणि नियम स्वीकारणार आहे. सध्या नोंदणीकरणासाठी अॅप तयार करण्यावर काम सुरू आहे. जे पुढीलवर्षी जानेवारी ते मार्च दरम्यान सादर केले जाईल. यानंतर एप्रिल पासून ग्रेटर नोएडामध्येही नोंदणीकरणाचे काम सुरू केले जाईल.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained if a pet injures someone the owner will be fined 10000 know what are the new rules in noida msr