अनिकेत साठे
अग्नी -४ या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी नुकतीच घेण्यात आली. यादरम्यान सर्व उद्दिष्टे पूर्ण केल्याचे सांगितले जाते. अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता राखणारे हे क्षेपणास्त्र चार हजार किलोमीटरवर मारा करू शकते. सैन्यदलात टप्प्याटप्प्याने समाविष्ट होणाऱ्या अग्नी क्षेपणास्त्रांमुळे मारक क्षमता वृद्धिंगत होत आहे.

अग्नी क्षेपणास्त्र कार्यक्रम काय आहे?

Seven maoists killed in abhujmad encounter
गडचिरोली : अबुझमाडमध्ये जवान व नक्षल्यांमध्ये जोरदार चकमक;  सात नक्षल्यांना कंठस्नान
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
process of regularizing project affected constructions gained momentum after return of mahayuti government
गरजेपोटी बांधकामांच्या नियमितीकरण प्रक्रियेला वेग; तांत्रिक मूल्यमापनाचे काम अंतिम टप्प्यात
When and where will flood-affected Ektanagari residents be relocated
पूरग्रस्त एकतानगरीचे होणार स्थलांतर नक्की कधी आणि कुठे?
nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
Pune, sewage channels covering Pune, Pune Municipal Corporation, sewage pune, pune latest news,
पुणे : सांडपाणी वाहिन्यांची झाकणे समपातळीवर आणण्यासाठी महापालिकेने उचलले पाऊल !
speeding luxury car collide straight into grade
भरधाव अलीशान कार थेट गॅरेजमध्‍ये घुसली; तिघे गंभीर जखमी, अलिबाग चोंढी येथील घटना

भारताने १९८३ मध्ये एकात्मिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम हाती घेतला. त्याअंतर्गत अग्नी क्षेपणास्त्रावर काम सुरू झाले. कालांतराने अग्नीसाठी केलेली स्वतंत्र व्यवस्था देशाला क्षेपणास्त्र संशोधनात वेगळ्या उंचीवर नेणारी ठरली. संरक्षण संशोधन आणि विकास प्रतिष्ठानने (डीआरडीओ) अविरत संशोधन व चाचण्यांमधून हे यश साध्य केले. साडेतीन दशकांपूर्वी अग्नी-१ या ८०० किलोमीटर मारक क्षमतेच्या चाचणीने सुरू झालेला प्रवास अग्नी – २ (२००० किलोमीटर), अग्नी – ३ (२५०० किलोमीटर), अग्नी – ४ (४००० किलोमीटर) आणि अग्नी -५ द्वारे पाच हजार किलोमीटरच्या पुढे जाऊन पोहोचला. अग्नी – ६ आणि अग्नी – ७ द्वारे आठ ते १० हजार किलोमीटरचा पल्ला गाठण्याची तयारी आहे. जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे हे क्षेपणास्त्र एक ते दोन हजार किलोची अण्वस्त्रे किंवा स्फोटके वाहून नेऊ शकते. अग्नी मालिकेतील १ ते ३ ही क्षेपणास्त्रे सैन्यदलाच्या भात्यात समाविष्ट झाली आहेत. पुढील आवृत्त्या समाविष्ट करण्यासाठी चाचण्यांची श्रृंखला प्रगतीपथावर आहे. अग्नीसाठी आतापर्यंत हजारो कोटींची गुंतवणूक झाली आहे. अनेक आव्हाने आणि अडथळे पार करीत भारतीय क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम यशस्वीपणे वाटचाल करीत आहे.

आयआरबीएम म्हणजे काय ?

बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचे मारक क्षमतेवरून वर्गीकरण केले जाते. अग्नी-४ हे मध्यवर्ती श्रेणीचे म्हणजे आयआरबीएम क्षेपणास्त्र आहे. तीन ते पाच हजार किलोमीटरचे अंतर पार करून लक्ष्य भेदणारी क्षेपणास्त्रे आयआरबीएम म्हणून ओळखली जातात. अग्नी- ४ हे चार हजार किलोमीटरवर मारा करू शकते. त्यामुळे या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात चीनमधील सर्व प्रमुख शहरे (ते देशाच्या पूर्व भागातून डागल्यास) येतात.  त्या पुढील टप्पा आयसीबीएम अर्थात आंतरखंडीय क्षेपणास्त्रांचा असतो. साडेपाच हजारहून अधिक किलोमीटर मारक क्षमतेची क्षेपणास्त्रे आयसीबीएम म्हणून गणली जातात. अग्नीच्या पुढील आवृत्त्या आठ ते १० हजार किलोमीटर मारक क्षमतेच्या असतील.

तंत्रज्ञानात निपुणता कशी?

जागतिक पातळीवर आंतरखंडीय क्षेपणास्त्रांची स्पर्धा सुरू आहे. अशा क्षेपणास्त्राने जगात कुठेही हल्ला चढविण्याची क्षमता राखणारे केवळ पाच देश आहेत. अग्नी -५ क्षेपणास्त्राने पाच हजार किलोमीटरचा टप्पा गाठला आहे. विकसित होण्याच्या मार्गावर असलेल्या अग्नी- ६ द्वारे भारत आंतरखंडीय क्षेपणास्त्रांची क्षमता धारण करण्याच्या मार्गावर आहे. अग्नी -५ आणि त्यापुढील आवृत्यांमध्ये एकाच वेळी वेगवेगळ्या १० लक्ष्यांवर अण्वस्त्र आणि स्फोटके डागण्याचे तंत्रज्ञान अंतर्भूत राहील. मार्गदर्शन प्रणाली, इलेक्ट्रॉनिक प्रणालीचे अद्ययावतीकरण आणि पर्यायी शस्त्र वाहून नेण्याच्या क्षमतेने त्याचा माग काढून निष्प्रभ करणे आव्हानात्मक असेल. बॅलिस्टिक क्षेपणास्त्र एका विशिष्ट पद्धतीने कार्यरत असते. पृथ्वीच्या वातावरणाबाहेर गेलेले क्षेपणास्त्र आपली दिशा बदलूून लक्ष्याकडे मार्गक्रमणास सिद्ध होते. नंतर ते पुन्हा वातावरणात प्रवेश करते. ध्वनीच्या कित्येक पट वेगाने निघालेल्या क्षेपणास्त्राची वातावरणात प्रवेश करण्याची प्रक्रिया रि- एन्ट्री म्हणून ओळखली जाते. यावेळी निर्माण होणाऱ्या प्रचंड उष्णतेपासून बचावासाठी क्षेपणास्त्राच्या बाह्य आवरणात विशिष्ट धातू, पदार्थांचा वापर करावा लागतो. डीआरडीओच्या प्रयोगशाळांनी त्यातही आपले कौशल्य सिद्ध केले. क्षेपणास्त्र पल्ल्यात कमी वेळेत प्रचंड ऊर्जा देणारे प्रोपेलंट्स (इंधन) महत्त्वाचे ठरतात. अग्नी- ५ मध्ये घनरूप इंधनाचा वापर केलेला आहे. प्रोपेलंट्सची कमतरता डीआरडीओने अतिविशिष्ट ऊर्जात्मक पदार्थ संशोधन केंद्राच्या मदतीने दूर केली. गेल्या वर्षी अग्नी-पी या नव्या वजनाने हलक्या असणाऱ्या आवृत्तीची चाचणी यशस्वी झाली. अग्नीला रस्ता आणि रेल्वेतून डागण्याची यंत्रणा विकसित झालेली आहे.

अग्नीने काय साध्य होणार?

लांब पल्ल्याच्या या क्षेपणास्त्रांनी देशाची लष्करी ताकद वाढून शक्ती संतुलनाचे तत्व अमलात येईल. सीमावादाने पाकिस्तान आणि चीन या दोन्ही शेजाऱ्यांशी संघर्ष सुरू आहे. लष्करीदृष्ट्या बलाढ्य चीनच्या भात्यात १५ हजार किलोमीटरहून अधिक मारा करणारी आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहेत. त्याला रोखण्यात अग्नी हे व्यूहात्मक क्षेपणास्त्र प्रभावी ठरेल. काही आगळीक झाल्यास प्रतिहल्ल्याची जाणीव करून देण्याचे सामर्थ्य त्याने प्राप्त झाले आहे. अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता, प्रतिहल्ल्याची दहशत संघर्ष रोखण्यास हातभार लावते. तूर्तास अग्नी तीच जबाबदारी पार पाडत आहे.

Story img Loader