राखी चव्हाण
देशातील व्याघ्र प्रकल्पांत चांगले संरक्षण होऊ लागल्याने वाघांची संख्या वाढली, परंतु कमी होत चाललेली जंगले, वाघांचे खंडित झालेले भ्रमणमार्ग, मानवाचा आणि गुराढोरांचा जंगलातील मुक्त वावर, जंगलाच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत वाघांची वाढलेली संख्या, जंगलातील गावांची संख्या अशा अनेक कारणांमुळे वाघ-मानव संघर्षांत वाढ होत आहे. राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार २०१४-२०२० दरम्यान वाघांच्या हल्ल्यात देशात ३२० जणांचा मृत्यू झाला. त्यात महाराष्ट्रातील ९९ जणांचा समावेश आहे. यावरून हा संघर्ष किती वाढला आहे आणि त्यावर उपाययोजना करणे किती गरजेचे आहे, हे अधोरेखित होते.

उन्हाळय़ातच हल्ले का होतात?

mauled dog in Chikhli bitten many causing fear among residents
चिखलीत पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस; ३० जणांना चावा
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
In Khambhadi Koturli village Bhandara district sighting of tiger in broad daylight has created excitement among the villagers
भंडारा : वाघाला चक्क गावकऱ्यांनीच घेरले अन…
Citizens of Gondia and state experienced thrill of tigers in Navegaon Nagjira forest
नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाघिणीच्या छाव्यांचा खेळ
Cow milk subsidy of Rs 57 crores to farmers in Satara news
साताऱ्यातील शेतकऱ्यांना ५७ कोटींचे गायीच्या दुधाचे अनुदान
murder of Satish Wagh, Satish Wagh, dispute,
सतीश वाघ यांची हत्या जुन्या वादातून, पाच लाखांची दिली होती सुपारी – पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार
tigress latest marathi news
महाराष्ट्रातून ओडिशात सोडलेली वाघीण झारखंडमध्ये
Satish wagh murder case, Pune police,
सतीश वाघ हत्या प्रकरण : आरोपींच्या शोधासाठी पुणे पोलिसांची १६ पथके रवाना

उन्हाळय़ात गावकरी मोठय़ा संख्येने जंगलात तेंदूपाने, मोहफुले व इतर वनोपज गोळा करण्यासाठी जातात. यापूर्वीही गावकरी जंगलात जाऊन ही कामे करत होते, मात्र गरजेपुरत्या या वस्तू गोळा करून ते परतायचे. आता मात्र व्यावसायिक उद्देशाने ते तेंदूपाने, मोहफुले वेचतात. त्यासाठी भल्या पहाटे जंगलात जातात. यातील बहुसंख्य कामे वाकून करावी लागतात. त्या अवस्थेतील माणूस हे लहान आकाराचे सावजच आहे, असे वाघाला वाटते. त्यामुळे हल्ला होतो. उन्हाळय़ात जंगलातील पाणवठे आटतात. झाडांची पाने गळतात. वाघांना भक्ष्यही सापडत नाही आणि पाणीदेखील मिळत नाही. सावजाच्या शोधात वाघ बाहेर पडतात आणि गावातील माणसांची व जनावरांची शिकार करतात.

विदर्भात देशातील सर्वाधिक बळी का जातात?

देशातील सर्वाधिक बळींमध्ये विदर्भ आघाडीवर आहे. राज्यात सुमारे ३५०हून अधिक वाघ आहेत. त्यातही विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात २००पेक्षा अधिक आहेत. विदर्भात जंगलाचे प्रमाण अधिक असले तरी वाघांची संख्या सातत्याने वाढत असल्याने त्यांना लागणारा अधिवास कमी पडतो आहे. त्याचबरोबर जंगलालगतच्या गावांमधील लोकसंख्येची घनतादेखील वाढली आहे. वाढती लोकसंख्या, विकास, रोजगाराचा अभाव यामुळे ग्रामीण लोकांचे जंगलावरील अवलंबित्व वाढले आहे. राज्यात सुमारे ८०० गावे जंगल आणि जंगलालगत आहेत. जंगलालगतच शेती आहे. वेकोलीच्या खाणी आणि उद्योग व्याघ्र प्रकल्पालगत आहेत. यातच वाघांचे भ्रमणमार्ग खंडित झाल्याने मानव-वन्यजीव संघर्ष उद्भवतो आणि त्यात माणसे व जनावरे मृत्युमुखी पडतात.

वाघांचे हल्ले ‘बफर क्षेत्रा’त अधिक की गाभा क्षेत्रात?

वाघांचे हल्ले दाट जंगलाच्या ‘गाभा क्षेत्रा’त कमी आणि तुलनेने विरळ अशा बफर क्षेत्रात अधिक होतात. ‘बफर क्षेत्रा’त अनेक गावे आहेत. त्यांचे पुनर्वसन करण्यात वन खात्याला अद्याप यश आले नाही. वाघांची वाढती संख्या आणि सातत्याने होणारा गावकरी व त्यांच्या जनावरांचा सामना, यामुळे हा संघर्ष तीव्र झाला आहे. जंगलालगतच्या गावकऱ्यांसाठी राज्याच्या वन खात्याने गॅस सिलेंडर योजना आणली. काही वर्षे ती सुरळीत चालली, पण वाढत्या किमतीमुळे गावकरी सिलेंडर घेऊ शकत नाहीत. त्यामुळे सरपणासाठी गावकऱ्यांची पावले जंगलाकडे वळतात आणि ते बळी पडतात. गुराखी त्याची गुरे जंगलात चरायला नेतात. वाघाने जनावरांवर हल्ला केला तर त्याला वाचवण्याच्या नादात गुराख्याचाही अनेकदा बळी जातो. वाघांच्या हल्ल्यात बळी जाणाऱ्यांमध्ये सर्वात पहिल्या क्रमांकावर गुराखी, त्यानंतर सरपणासाठी जाणारा गावकरी, मोहफुले व तेंदूपाने उचलण्यासाठी जाणारा गावकरी आणि नंतर शेतात काम करणारा शेतकरी आहे.

हल्ले कुठे आणि का होत आहेत?

वाघांकडून होणारे हल्ले जंगलात किंवा गावातच नाही तर शहरी आणि औद्योगिक क्षेत्रांतही होत आहेत. वाघांची संख्या वाढल्याने शहरी आणि औद्योगिक क्षेत्राजवळच्या क्षेत्राचाही वाघांनी अधिवास म्हणून स्वीकार केला आहे. या ठिकाणी प्रजनन होऊन त्यांची नवी पिढी येथेच मोठी होत आहे. या नव्या आणि धोकादायक अधिवासाची त्यांना सवय झाली आहे. दोन-अडीच वर्षांचे होईपर्यंत वाघाचे बछडे यापूर्वी शिकार करत नव्हते, आता मात्र एक ते दीड वर्षांतच त्यांना शिकारीची सवय लागते आहे. शिकारीचे तंत्र अवगत करण्यापूर्वीच शिकारीचे प्रयत्न सुरू झाल्याने जनावरे असो वा माणूस, ते हल्ला करतात. ब्रह्मपुरी क्षेत्रातील ८० टक्के वाघ तृणभक्षी प्राण्यांऐवजी गावातील जनावरे मारतात, असे लक्षात आले आहे.

मानव-वन्यजीव संघर्षांवर उपाय काय?

राज्य वन्यजीव मंडळाचे अध्यक्ष व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय वन सेवेतील महाराष्ट्रात नियुक्त परिवीक्षाधीन अधिकाऱ्यांना या संघर्षांवर काय उपाय योजता येईल हे सांगितले. त्यांच्या मते जंगलात राहणाऱ्यांचे जंगलावरील अवलंबित्व कसे कमी करता येईल, हे पहावे लागेल, त्यांच्या चांगल्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करावे लागतील. जंगल क्षेत्रात रस्ते, रेल्वे मार्ग करताना वन्यजीवांचा प्राधान्याने विचार करावा लागेल. त्यांचे मार्ग सुरक्षित राहतील असे भुयारी मार्ग, उड्डाणपूल तयार करणे यावरदेखील अधिकाऱ्यांनी काम करायला हवे, असे ते म्हणाले. 

वाघांचे कृत्रिम स्थलांतर हा पर्याय आहे का?

वाघांची संख्या अधिक असलेल्या वन क्षेत्रातून वाघांची संख्या नसलेल्या वन क्षेत्रात वाघांचे कृत्रिम स्थलांतरण करण्याचा पर्याय राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत मांडण्यात आला. त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील १५ वाघांच्या स्थलांतरणाचा आराखडा तयार करण्यात आला. त्यातील पाच वाघ नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात येणार आहेत. या महिन्याच्या अखेरीस कृत्रिम स्थलांतरणाचा पहिला टप्पा पार पाडला जाणार आहे. त्याच्या यशस्वितेनंतरच तो पर्याय होऊ शकतो का, हे कळणार आहे.

         rakhi.chavhan@expressindia.com

Story img Loader