लष्करात नुकतीच काही लक्षवेधी उपकरणे-शस्त्रास्त्रे दाखल झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि लष्कर प्रमुख मनोज पांडे यांच्या उपस्थितीमध्ये हा एक छोटेखानी कार्यकम पार पडला. कार्यक्रम मुद्दामुनच साध्या पद्धतीने, गाजावजा न करता झाला असावा. या उकरणांमुळे लष्कराच्या ताकदीत मोलाची भर पडणार आहे.
Future Infantry Soldier As A System (F-INSAS) कार्यक्रमाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. म्हणजेच अत्याधुनिक शस्त्र प्रणालीने सज्ज असलेला लष्कराचा जवान यापुढे बघायला मिळणार आहे. तर कमी वजानाचा, अत्याधुनिक असा Nipun mines – निपुण भुसुरुंगाचा लष्करात समावेश करण्यात आला आहे. तर पाण्यातून प्रवास करत जमिनीवर वेगाने सुरक्षित उतरवू शकणारी बोट Landing Craft Assault (LCA) आता लष्कराच्या सेवेत दाखल झाली आहे. तसंच रणगाड्याचा वापर करणाऱ्यांना रात्रीच्या अंधारात दूरवर बघता येईल अशी अत्याधुनिक यंत्रणा, उड्डाण करणाऱ्या हेलिकॉप्टरमध्ये नवी माहिती उपग्रहांद्वारे डाऊनलोड करुन देणारे उपकरण अशा काही उपकरणे ही लष्कराला मिळाली आहेत.
Future Infantry Soldier As A System (F-INSAS) हे काय आहे?
लष्कराच्या जवानाला डोक्यापासून तळव्यापर्यंत सुरक्षा देत लढण्यास आणखी शस्त्रसज्ज बनवत, हल्ला करण्यास गती देणारी प्रणाली म्हणजे F-INSAS. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे जवानाकडे आता सर्वात अत्याधुनिक अशी AK-203 रायफल येणार आहे. सर्व प्रकारच्या वातावरणात काम करणारी, कमीत कमी देखरेखीची आवश्यकता आणि ३०० मीटरपर्यंत अचूक मारा करणारी रायफल म्हणून AK-203 ओळखली जाते. या रायफलमध्ये ग्रेनेड हल्ला करण्याची, विशिष्ट binoculars च्या सहाय्याने आणखी दूरवर मारा करता येईल अशी सुविधा आहे. अमेठीमध्ये अशा सहा लाख रायफलींचे उत्पादन लवकरत सुर करण्यात येणार आहे.
F-INSAS या व्यवस्थेत बुलेटप्रुफ हेल्मेट, दणकट असा गॉगल, वजनाने हलके पण मजबूत असे चिलखत, बहुउद्देशीय चाकू, कमी अंतरावर प्रभावीपणे वापरता येणारा ग्रेनेड, नाईट व्हिजन कॅमेरा यांचा समावेश आहे. अशा आधुनिक उपकरणांनी सज्ज असलेला लष्कराचा जवान यापुढच्या काळात बघायला मिळणार आहे. याची सुरुवात संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही सर्व उपकरणे हे देशातीलच उद्योगांकडून बनवली जाणार असल्याने यापुढे जवानांच्या शस्त्रसज्जतेसाठी परदेशावर अवलंबून रहावे लागणार नाही. आधुनिक लष्करी जवान सज्ज करण्याचे काम अनेक देश करत असून आता भारतातही याची सुरुवात झाली आहे.
निपुण भुसुरुंग नेमके कसे आहेत?
प्रत्यक्ष युद्धभुमिवर (forward areas) वापरता येणारे नवे भुसुरुंग निपुण हे लष्करात दाखल करण्यात आले आहेत. विशेषतः शत्रुपक्षाच्या जवानांची आगेकूच रोखण्यासाठी या भुसुरुंगाचा प्रभावी वापर करता येणार आहे. वजनाने हलके, कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त जागेत पेरता येईल असे हे भुसुरुंग डीआरडीओच्या (defense research and development organization)च्या पुणे येथील संस्थेने – Armament Research and Development Establishmentविकसित केले आहेत.
Landing Craft Assault काय आहेत?
नदी किंवा तलावात वेगाने वाहतुक करत जवानांना जमिवीवर उतरवु शकणाऱ्या खास नौका-Landing Craft Assault या लष्करासाठी विकसित करण्यात आल्या आहेत. विशेषतः पॅंगॉन्ग तलावात लष्करासाठी या नौका गोवा इथल्या Aquarius ShipYard Limited ने विकसित केल्या आहेत. यामधून एकावेळी जास्तीत जास्त ३५ जवानांची वाहतुक करता येणं शक्य होणार आहे. अशा प्रकारच्या मोठ्या आकाराच्या नौका याधीच नौदलात कार्यरत आहेत.
काही इतर उपकरणे…
टी-९० या रणगाड्यांना लष्कराचा कणा समजले जाते. या रणगाड्यांचे सारथ्य करणाऱ्या जवान-अधिकाऱ्यांना रात्रीच्या वेळीही मुक्त संचार करता यावा यासाठी स्वदेशी बनावटीची thermal imaging sight दुर्बिण आता उपलपब्ध झाली आहे. तसंच हेलिकॉप्टरने उड्डाण केल्यावर एखादी माहिती हेलिकॉप्टरच्या संगणकात अपलोड करणे शक्य नसायचे. आता अशी प्रणाली उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याचबरोबर युद्धभुमिवर जवानांना घेऊन जाणारी नवी चिलखती वाहने Quick Reaction Fighting Vehicle आणि Infantry Protected Mobility Vehicles उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
या सर्व स्वदेशी बनावटीच्या शस्त्रास्त्रांमुळे लष्कराची ताकद वाढणार असून संरक्षण दलाच्या आत्मर्निभरतेच्या दृष्टीने आणखी एक पाऊल पुढे पडले आहे.