आकाश निरीक्षणासाठी (star gazing) काही वर्षांपूर्वी शहराबाहेरची-गावाबाहेरची एखादी जागा सोयीची ठरायची. कारण प्रदुषण मुक्त वातावरण, कृत्रिम दिव्यांचा झगमगाट नसलेला परिसर यामुळे स्वच्छ आकाश सहज उपलब्ध व्हायचे. मात्र सध्या आकाश निरीक्षणासाठी जागा सपाडणे कठीण आहे अशी परिस्थिती सध्या आहे. तेव्हा खगोलप्रेमींसाठी, हौशी अभ्यासकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लडाखमध्ये देशातील पहिले आकाश निरीक्षणासाठीचे राखीव क्षेत्र हे उभारलं जात आहे. यामुळे आकाश दर्शनाची अनोखी अनुभूती मिळेलच पण त्याचबरोबर लडाखमधील पर्यंटन वाढण्यासही मदत होणार आहे.

भारतातील पहिलं आकाश निरीक्षणासाठी राखीव क्षेत्र ज्याला Dark Sky Reserve म्हणूनही ओळखलं जातं हे लडाखमध्ये हेनले वेधशाळेच्या परिसरात साकारलं जाणार आहे. अवकाशाचे निरीक्षण करणारी हेनले (Hanle Astronomical Observatory) ज्याला Indian Astronomical Observatory (IAO) म्हणूनही ओळखले जाते, लडाखमध्ये अग्नेय दिशेला स्थित असून लेहपासून सुमारे २६० किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. ही जगातील उंचावरच्या वेधशाळांपैकी एक असून समुद्रसपाटीपासून चार हजार ५०० मीटर उंचीवर आहे. हा सर्व परिसर थंड वाळवंट (cold desert) म्हणूनही ओळखला जातो. स्वच्छ आकाश आणि प्रदुषण मुक्त परिसर म्हणून १९९२ च्या सुमारास या वेधशाळेच्या उभारणीला सुरुवात झाली. लवकरच हा परिसर Dark Sky Reserve -आकाश निरीक्षणासाठी राखीव क्षेत्र म्हणून ओळखला जाणार आहे.

ISRO docked SpaDeX satellites space
ISRO Mission : इस्रोची आणखी एक मोहीम फत्ते, अवकाशात दोन उपग्रहांची केली यशस्वी जोडणी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Global Warming, Chandrapur , International Conference on Climate Change-2025,
‘ग्लोबल वॉर्मिंग’विरोधात शंखनाद, चंद्रपुरात पर्यावरण बदलावर…
pm narendra modi launches mission mausam
‘मिशन मौसम’ला सुरुवात; हवामान विभाग भारतीयांच्या वैज्ञानिक प्रगतीचे प्रतिक, पंतप्रधानांचे गौरवोद्गार
grand alliance government accelerate the shaktipeeth highway work after election victory
निवडणुकीत प्रचंड बहुमत… आता महायुती सरकारकडून शक्तिपीठ महामार्गाला गती?
150 years of India Meteorological Department
अपुरी साधनसामग्री ते अद्यायावत तंत्रज्ञान
last two days temperature in Mumbai increased and dew in atmosphere has reduced
मुंबईत ढगाळ वातावरणाची शक्यता
spadex satellites successfully come 3 meters to each other says isro
‘स्पाडेक्स’ मोहिमेत दोन्ही उपग्रह तीन मीटर अंतरावर

Dark Sky Reserve म्हणजे काय?

International Dark Sky Association (IDSA) ही अमेरिकतील एक हौशी खगोलप्रेमी आणि शास्त्रज्ञ-अभ्यासकांनी स्थापन केलेली संस्था आहे. आकाश निरीक्षणासाठी परिसर उपलब्ध व्हावेत आणि आकाश निरीक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी ही संस्था काम करत असते.

या संस्थेच्या म्हणण्यानुसार असे क्षेत्र की ‘ज्या ठिकाणी फक्त नैसर्गिक प्रकाश असेल, कृत्रिम प्रकाशाचा अभाव असेल, हवा प्रदुषणमुक्त असेल ज्यामुळे आकाश सहज न्याहाळता येईल, महत्त्वाचे म्हणजे ही परिस्थिती कायम रहावी याचे भान या भागात असेल’ तो परिसर आकाश निरिक्षणासठी उत्तम म्हणून जाहीर केला जातो, त्या भागाला Dark Sky Reserve नावाने ओळखले जाते.

आकाश निरीक्षणासाठी राखीव क्षेत्र कसे निश्चित केले जाते?

IDSA संस्थेने दिलेले निकष जो परिसर पुर्ण करतो तो भाग Dark Sky Reserve या नावाने ओळखला जातो. जगात अशा १९५ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. नुसतं आकाश स्वच्छ किंवा परिसर प्रदुषण मुक्त असून चालत नाही तर संबंधित जागा जिथून आकाश निरीक्षण केले जाणार आहे ती एकतर खाजगी किवा सार्वजनिक जमीन असली पाहिजे असा निकषही यासाठी आवश्यक ठरतो. कारण या ठिकाणी लोकांनी तेवढ्याच सहजतेने पोहचणेही महत्त्वाचे आहे, प्रवास करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध असल्या पाहिजेत.

कोणतीही व्यक्ती किंवा एखादा समुह हा राखीव क्षेत्रासाठी IDSA या संस्थेकडे अर्ज करु शकतो. जागतिक वारसा स्थळासाठी ज्याप्रमाणे अर्ज केला जातो तशीच ही राखीव क्षेत्रासाठी प्रमाणपत्र मिळवण्यासाठीची प्रक्रिया आहे.

लडाखमध्ये आकाश निरीक्षणासाठी राखीव क्षेत्र कोण विकसित करत आहे?

लडाख केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासनाने Dark Sky Reserve साठी मुख्य पुढाकार घेतला आहे. बंगळुरु इथली Indian Institute of Astrophysics (IIA) ही संस्था यााधीच हेनले वेधशाळा चालवत असून आता या उपक्रमासाठी वैज्ञानिक उपकरणे आणि तंत्रज्ञानासाठी सहाय्य उपलब्ध करुन देणार आहे. या सर्व उपक्रमाला केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्या दिली आहे. लवकरच याबाबत करार केला जाणार असून Dark Sky Reserve मान्यतेची औपचारिकता पुर्ण केली जाणार आहे.

लडाख परिसराची का निवड करण्यात आली?

लडाख हा परिसरात एक cold desert म्हणून ओळखला जातो, या भागाचे किमान तापमान हे उणे ४० अंश सेल्सियस एवढे असते. काही भाग सोडला तर या भागात विरळ अशी मानवी वस्ती असून बहुतांश भाग निर्मनुष्य आहे. त्यामुळे प्रदुषण नाही, कृत्रिम प्रकाशाचा त्रास नाही, त्यात समुद्रसापाटीपासून उंच असल्याने हवा विरळ. त्यामुळे लडाख परिसर हा आकाश निरीक्षणासाठी भारतात उत्कृष्ठ म्हणून ओळखला जातो. म्हणूनच याच Hanle इथे वेधशाळा स्थापन करण्यात आली. आता हा परिसर Dark Sky Reserve म्हणून विकसित करण्यासाठी पावले उचलली जात आहेत.

Dark Sky Reserve चा फायदा काय?

Dark Sky Reserve क्षेत्र घोषित झाल्याने इथे याबाबतचे नियम पाळणे हे बंधनकारक रहाणार आहे. यामुळे या भागात आकाश निरीक्षणासाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात स्थानिकाना सहज हाताळता येतील आणि आकाशाचे निरिक्षण करता येईल अशा १० दुर्बिणी दिल्या जातील. तसंच तारकासमुह, ग्रह-तारे यांची माहिती तसंच ते ओळखण्याची पद्धत याचे प्राथमिक प्रशिक्षणही दिले जाणार आहे. या दुर्बिणी स्थानिकांच्या घरातच ठेवल्या जाणार आहेत. यामुळे या भागातले पर्यटन आणि रोजगार वाढण्यास मोठी मदत होणार आहे.

लडाखमधील पर्यंटन क्षेत्रांमध्ये यापुढच्या काळात हेनले इथल्या Dark Sky Reserve ची भर पडणार आहे. यामुळे पर्यंटन होईलच, रोजगार वाढेल पण त्याचबरोबर आकाश निरीक्षणाबद्दलची रुची- अभ्यास वाढण्यास हातभार लागेल असा विश्वास या प्रकल्पाची अंमलबजावणी करणाऱ्यांना आहे.

Story img Loader