जगातील सर्वात मोठी टी-२० लीग म्हणजे इंडियन प्रीमियर लीग (IPL). या स्पर्धेत खेळण्यासाठी अनेक युवा, दिग्गज खेळाडू आतूर असतात. पैसा आणि प्रसिद्धी ही त्यामागची दोन कारणे. यंदा या लीगचा पंधरावा हंगाम. एखाद्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेलाही मागे टाकू शकेल, इतकी या लीगची व्याप्ती आणि ताकद आहे. यावर्षी ही स्पर्धा अजून खास ठरणार आहे. दोन नव्या संघांच्या प्रवेशामुळे लीगला नवे चैतन्य मिळाले, त्यामुळे प्रेक्षकांच्या दर्शनीय संख्येतही वाढ होण्याचे जवळपास निश्चित आहे. नव्या संघांमुळे बंगळुरूत स्पर्धेच्या संतुलनासाठी मेगा ऑक्शन पार पडले. या दोन दिवसीय ऑक्शनमध्ये अनेकजण करोडपती ठरले. आता या लीगमध्ये खेळाडूंनी किती पैसे मिळतात, त्यांचा करार कसा असतो, त्याचा कालावधी किती असतो, हे जाणून घेऊया.
माध्यमांच्या वृत्तानुसार, आयपीएल २०२२चा थरार २ एप्रिलपासून सुरू होत आहे, जो ३ जूनपर्यंत चालेल. यादरम्यान १० संघ विजेतेपदासाठी झुंजताना दिसतील. दरम्यान, आयपीएलसाठी क्रिकेटपटूंवर झालेल्या पैशांच्या पावसाचे जग साक्षीदार झाले, परंतु खेळाडूंना मिळणाऱ्या मानधनाच्या प्रक्रियेची माहिती कदाचित फार कमी लोकांना असेल.
हेही वाचा – विश्लेषण : आयपीएल महाबोली – दशकोटी वीरांमध्ये भारतीयांचा दबदबा!
कसे असते मानधनाचे स्वरूप?
ऑक्शनमध्ये ज्या रकमेवर खेळाडूला खरेदी केले जाते, ती रक्कम त्याचे मानधन ठरते. त्यानुसार कर मोजला जातो. मानधनाच्याच्या रकमेसाठी फक्त तोच खेळाडू दावेदार असतो. तसेच ही रक्कम प्रत्येक हंगामानुसार खेळाडूला दिली जाते. जर एखादा खेळाडू १० कोटी रुपयांना विकत घेतला गेला असेल, तर त्याला एका हंगामात खेळण्यासाठी ही रक्कम दिली जाते. अशा परिस्थितीत जर एखाद्या खेळाडूचा ३ वर्षांचा करार असेल तर त्याला प्रत्येक हंगामात ३० कोटी मिळतील.
किती सामने खेळावे लागतात?
जर एखाद्या खेळाडूला संपूर्ण हंगामासाठी पैसे दिले गेले, तर त्याने किती सामने निवडले किंवा त्याने किती खेळ खेळले हे महत्त्वाचे नसते. समजा एखादा खेळाडू तीन वर्षांच्या करारावर विकत घेतला गेला आणि पुढील हंगामासाठी कायम ठेवला, तर करार वाढवला जातो. आधी दिलेल्या रकमेनुसार हा करार वाढवला जातो. जर एखाद्या संघाला मानधन वाढवून खेळाडूला थांबवायचे असेल, तर रक्कम बदलू शकते. सामान्यतः खेळाडूंना वाढीव पगार देऊन कायम ठेवले जाते.
हेही वाचा – IND vs WI : “तुम्ही गप्प बसाल तर…”, विराटबाबत मत देताना रोहित शर्मा भडकला!
दुखापत झाल्यास काय होते?
एखाद्या खेळाडूला दुखापतीमुळे हंगाम सुरू होण्याआधी बाहेर जावे लागले तर, फ्रेंचायझीने खेळाडूला पैसे देण्याची आवश्यकता नाही. जर एखाद्या खेळाडूला संपूर्ण हंगामाऐवजी ठराविक सामन्यांसाठी विकत घेतले असेल, तर त्याला योग्य प्रमाणात पैसे दिले जातात. स्पर्धेदरम्यान एखाद्या खेळाडूला दुखापत झाल्यास त्याच्या उपचाराचा खर्च फ्रेंचायझीला करावा लागतो. जर एखाद्या खेळाडूला करार संपण्यापूर्वी बाहेर व्हायचे असेल, तर तो फ्रँचायझीकडून याची मागणी करू शकतो. करार पूर्ण होण्यापूर्वी संघाने खेळाडूला सोडण्याचा निर्णय घेतल्यास, त्यांना खेळाडूला पूर्ण मुदतीची रक्कम द्यावी लागेल.
खेळाडूंना पैसे कसे दिले जातात?
विशेष बाब म्हणजे सर्वच फ्रेंचायझी खेळाडूंना एकाच वेळी पैसे देत नाहीत. हे सर्व फ्रेंचायझीकडे किती रोख आहे आणि प्रायोजकत्वातून पैसे कसे येत आहेत यासारख्या अनेक गोष्टींवर अवलंबून असते. काही फ्रेंचायझी खेळाडूंना एकाच वेळी पूर्ण पैसे देतात.