जम्मू-काश्मीरमध्ये या वर्षी विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. तशा हालचाली सुरू आहेत. या निवडणुकीमध्ये २५ लाख नवे मतदार असू शकतात, असा अंदाज बांधला जत आहे. असे असताना सध्या जम्मू काश्मीरमध्ये राहणाऱ्या परप्रांतीय लोकांना आपली नावे मतदार यादीत समाविष्ट करून मतदान करण्याची परवानगी निवडणूक आयोगाने दिली आहे. एवढेच नाही तर जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षेसाठी तैनात असलेले सुरक्षा दलाचे जवानही त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करू शकतात, अशी माहिती जम्मू आणि काश्मीरचे मुख्य निवडणूक अधिकारी हृदेश कुमार यांनी दिली. मात्र निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला विरोध होत असून बाहेरून मतदार आणून भाजपा निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप येथील स्थानिक पक्षांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचा निर्णय, विरोध करताना केला जणारा दावा तसेच सत्य परिस्थिती याविषयी जाणून घेऊया.
हेही वाचा >>> २५ दिवसांत ८ रुग्णालयं, १३००० किमीचा प्रवास; ९ वर्षांच्या मुलाला वाचवण्यासाठी लढा
निवडणूक आयोगाने कोणता निर्णय घेतला आहे ?
जम्मू काश्मीरमध्ये काम करण्यासाठी आलेले, मूळचे स्थानिक नसलेले लोक येथे मतदान करण्यासाठी आपले नाव मतदार यादीत नोंदवू शकतात, असे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. हे मतदार विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही मतदान करू शकतात. तसेच जेथे शांतता आहे, अशा भागात तैनात असलेले सैनिकदेखील आपले नाव मतदार यादीत नोंदवू शकतात, असा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.
हेही वाचा >>> तृणमूल काँग्रेसच्या ‘कातडी सोलू’ला भाजपाचे ‘जोड्याने मारू’ने उत्तर; पश्चिम बंगालमधील राजकारण तापले
खरंच जम्मू काश्मीरमध्ये येऊन कोणीही मतदान करू शकणार ?
नियमानुसार कोणताही भारतीय नागरिक कोणत्याही राज्यात जाऊन मतदान करू शकतो. मात्र एकच मतदार एकापेक्षा जास्त निवडणुकांमध्ये मतदान करू शकत नाही. उदाहरणादाखल मूळच्या दिल्लीतील रहिवाशाला चेन्नईत मतदान करायचे असेल तर तो करू शकतो. मात्र यावेळी त्याचे नाव दिल्लीतील मतदार यादीतून वगळण्यात येते. ही प्रक्रिया पार पाडताना मतदाराकडे योग्य कागदपत्रे असणे गरजेचे आहे.
हेही वाचा >>> दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयचा छापा
जम्मू काश्मीरशी संबंध नसणारे २५ लाख मतदार मदतान करणार?
मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया ही देशभर चालते. जम्मू काश्मीरमध्ये १ जानेवारी २०१९ साली मतदार यादी अद्ययावत करण्यात आली होती. त्यानंतर साधारण तीन वर्षांचा कालावधी लोटला आहे. याच कारणामुळे जम्मू काश्मीर निवडणूक आयोगाकडे अपलब्ध असलेल्या माहितीनुसार या वर्षी साधारण २० ते २५ लाख नागरिकांच्या नावाचा समावेश मतदार यादीत केला जाऊ शकतो. १ ऑक्टोबर २०२२ पर्यंत ज्यांची १८ वर्षे पूर्ण झाली आहेत, ती सर्व मतदार आपले नाव मतदार यादीत नोंदवू शकतात.
हेही वाचा >>> “राष्ट्रवादीतील पाच नेत्यांची चौकशी करायची आहे, त्यांची नावे लवकरच…” भाजपाच्या बड्या नेत्याचे मोठे विधान
निवडणूक जिंकण्यासाठी बाहेरून लोक आणण्यात येणार ?
इतर प्रदेशातील नागरिकांना काश्मीरमध्ये आणून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोप नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी या पक्षांकडून केला जात आहे. भाजपा जम्मू काश्मीरच्या लोकांची मनं जिंकू शकत नाही. याच कारणामुळे त्यांच्या मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी लोकांची आयात करण्यात येणार आहे, असेही या पक्षांकडून म्हटले जाणार आहे. मात्र जम्मू काश्मीरमध्ये मतदान करायचे असेल तर सामान्यत: मतदार तेथील रहिवासी असणे गरजेचे आहे. जे जम्मू काश्मीरचे रहिवासी आहेत, तेच येथे मतदान करू शकणार आहेत.
हेही वाचा >>> CBI कारवाईनंतर केजरीवाल संतापले, न्यूयॉर्क टाइम्सचा फोटो केला ट्वीट, म्हणाले “जग कौतुक करत असताना…”
दरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये मतदार नोंदणीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. येथील मतदारांची यादी येत्या १५ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. तर मतदानासाठी येथे एकूण ६०० नव्या मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. या नव्या मतदान केंद्रांसह येथे आता ११ हजार ३७० मतदान केंद्रे झाली आहेत.