जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे प्राणघातक हल्ल्यामध्ये निधन झाले असून जगभरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आबे आज सकाळी एका सभेत भाषण देत असताना त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोराने गोळीबार केला. या हल्ल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचाराला प्रतिसाद न दिल्यामुळे शिंजो आबे यांचा मृत्यू झाला. दरम्यान, आबे यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराचे नाव यामागामी तेत्सुआ असल्याचे समोर आले आहे. तो जपानमधील नौसेना म्हणजेच जपान मेरिटाईम सेल्फ डिफेन्स फोर्सचा (JMSDF) माजी सदस्य असल्याचे म्हटले जात आहे. सध्या आरोपी तेत्सुआ याला जपानी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मात्र जेएमएसडीएफ म्हणजे नेमकं काय आणि तेत्सुआ याचा त्याच्याशी काय संबंध असे विचारले जात आहे.

हेही वाचा >>> Shinzo Abe Death : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची हत्या; पाच तास मृत्यूशी अयशस्वी झुंज

आबे यांच्यावर हल्ला करणारा हल्लेखोर कोण आहे?

मिळालेल्या माहितीनुसार शिंजो आबे यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराचे नाव यामागामी तेत्सुआ असे असून तो ४१ वर्षीय आहे. तो जपान मेरिटाईम सेल्फ डिफेन्स फोर्स अर्थात जेएमएसडीएफचा माजी सदस्य आहे. याव्यतिरिक्त त्याने जपानमधील एका स्थानिक विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केलेले आहे. त्याने आबे यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. यातील पहिली गोळी आबे यांच्या छातीवर तर दुसरी गोळी मानेला लागली. याच हल्ल्यानंतर आबे यांचा मृत्यू झाला आहे.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा >>> Shinzo Abe Death: भारतात उद्या राष्ट्रीय दुखवटा, मित्राच्या मृत्यूने मोदी हळहळले; म्हणाले, “आज संपूर्ण भारत…”

आबे यांच्यावर हल्ला नेमका कसा झाला?

मिळालेल्या माहितीनुसार आबे यांच्यावर हल्ला करण्यासाठी यामागामी तेत्सुआ याने हँडमेड बंदुकीचा वापर केला. जपानमध्ये शॉर्ट बॅरल शॉटगनचा परवाना मिळवण्याची प्रक्रिया चांगलीच किचकट आहे. त्यासाठी कठोर नियमावली आहे. त्यामुळे तेत्सुआ या आरोपीला ही बंदूक नेमकी कोठून मिळाली? याचा शोध घेतला जात आहे. आबे आज सकाळी जपानच्या नारा या भागात एका कार्यक्रमात भाषण करत होते. याच वेळी तेत्सुआ या आरोपीने आबे यांच्यावर मागून गोळीबार केल्याचे म्हटले जात आहे.

हेही वाचा >>> शिवसेनेतील बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंनी केली मोठी मागणी, म्हणाले ‘… तर आम्ही घरी बसू’

तेत्सुआने सेवा बजावलेले JMSDF म्हणजे नेमकं काय?

शिंजो आबे यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी यामागामी तेत्सुआ हा जेएमएसडीएफचा माजी सदस्य असल्याचे म्हटले जात आहे. भारत देशात संरक्षण दलाचे जसे आर्मी, नौसेना आणि वायुसेना असे तीन विभाग आहेत. अगदी तशाच पद्धतीने जपानमेध्येही संरक्षण दलाचे तीन विभाग आहेत. जपान ग्राऊंड सेल्फ डिफेन्स फोर्स, जपान मेरिटाईम सेल्फ डिफेन्स फोर्स आणि जपान एअर सेल्फ डिफेन्स फोर्स असे जपानी संरक्षण दलाचे तीन विभाग आहेत. यापैकी आरोपी तेत्सुआ याने जपान मेरिटाईम सेल्फ डिफेन्स फोर्समध्ये सेवा बजावलेली असल्याचे म्हटले जात आहे. JMSDF द्वारे जपानच्या समुद्र किनाऱ्याचे संरक्षण केले जाते. तसेच देशांतर्गत आपत्ती आल्यास JMSDF च्या जवानांकडून सक्रियपणे मदतकार्य केले जाते. जपान देशाला जगातील सर्वात मोठा आठवा समुद्रकिनारा लाभलेला आहे. या देशाची अर्थव्यवस्थादेखील समुद्राच्या माध्यमातून होणाऱ्या व्यापारावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. त्यामुळे जपानी संरक्षणदलात JMSDF चे अनन्यसाधारण महत्त्व आहे.

हेही वाचा >>> “आमचे पूर्वज हिंदूच, पण… बद्रुद्दिन अजमलांचे खळबळजनक विधान

दरम्यान, आबे यांच्या हत्येनंतर जगभारातून दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. भारतातही उद्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील मित्र गेल्याची भावना व्यक्त करत हळहळ व्यक्त केली आहे.

Story img Loader