केरळच्या कासारगोड येथे एका १६ वर्षीय मुलीचा अन्नातून विषबाधा झाल्याने मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली आहे. नुकत्याच झालेल्या घटनेमागे शिगेला विषाणू कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. या विषाणूमुळे केरळमधील एका दुकानामध्ये शोरमा खाल्ल्यानंतर सुमारे ५८ लोक आजारी पडले आणि एका तरुणीचा मृत्यू झाला, असे एका वरिष्ठ आरोग्य जिल्हा अधिकाऱ्याने सांगितले. कासारगोड जवळच असलेल्या करिवल्लूर येथील रहिवासी असलेल्या देवानंदाचा कन्हानगड जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या घटनेप्रकरणी दुकानादाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीअंती दुकानाला टाळे ठोकण्यात आले आहे. देवानंदाने याने शोरमा खाल्ला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोझिकोड प्रयोगशाळेने आधीच पुष्टी केली होती की शोरमा शिगेला विषाणू आणि इतर तीन सूक्ष्मजंतूंनी दूषित आहे. उन्हाळ्याचे दिवस हे या हानिकारक जीवाणूंच्या प्रसारासाठी अनुकूल वातावरण तयार करतात. म्हणूनच उन्हाळ्यामध्ये शिजवलेले अन्न खराब होण्याआधीच खावे, असा सल्ला तज्ञ देतात. अन्नामध्ये सूक्ष्मजंतूंची पैदास झाल्यास आणि एखाद्या व्यक्तीने दूषित अन्न खाल्ल्यास अन्नातून विषबाधामुळे मृत्यू देखील होऊ शकतो.

शिगेला विषाणू म्हणजे काय?

शिगेला विषाणूमुळे शिगेलोसिस नावाचा संसर्ग होतो. त्यामुळे जुलाब, ताप, पोटदुखी अशी लक्षणे दिसतात. काही वेळा रुग्णाच्या विष्ठेमध्येही रक्त येते. दूषित अन्न किंवा पाणी प्यायल्याने संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. तज्ञ त्याला संसर्गजन्य रोग म्हणतात. अशा परिस्थितीत शिगेला संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यानेही हा आजार होऊ शकतो.

मेयो क्लिनिकच्या मते, शिगेला संसर्ग हा एक प्रकारचा विषाणूमुळे होणारा आतड्यांतील संसर्ग आहे. शिगेला संसर्गाचे मुख्य लक्षण म्हणजे रक्तरंजित अतिसार. शिगेला हा अत्यंत संसर्गजन्य आहे, जेव्हा लोक शिगेला संक्रमित व्यक्तीच्या विष्ठेच्या संपर्कात येतात आणि थोड्या प्रमाणात जीवाणू गिळतात तेव्हा त्यांना या धोकादायक जीवाणूचा संसर्ग होण्याची शक्यता असते. याव्यतिरिक्त, जे लोक बाळाचे डायपर बदलल्यानंतर किंवा टॉयलेटमध्ये गेल्यानंतर त्यांनी त्यांचे हात व्यवस्थित धुतले नाहीत आणि अन्न खाल्ले तर त्यांना शिगेला संसर्ग होऊ शकतो.

शिगेला संक्रमित अन्न खाणे, असुरक्षित पाणी पिणे, त्यात पोहणे, न धुतलेली फळे आणि भाज्या खाणे यामुळे देखील पसरतो. याची सौम्य प्रकरणे सहसा एका आठवड्यात बरे होतात. पण आठवडाभरात संसर्ग बरा झाला नाही तर उपचाराची गरज भासू शकते. अशा परिस्थितीत डॉक्टर अनेकदा प्रतिजैविक लिहून देतात.

शिगेलाची लक्षणे

शिगेलाची लक्षणे फार लवकर दिसून येत नाहीत. शिगेलाचा संसर्ग झाल्यावर, अतिसार, पोटदुखी, ताप, उलट्या आणि मळमळ यासारखी लक्षणे दिसू शकतात. त्यामुळे या प्रकारची लक्षणे दिसल्यानंतर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained kerala girl dies after eating shigella bacterial shawarma abn