जालंधरचे ख्रिस्ती धर्मगुरू (बिशप) फ्रॅंको मुलक्कल यांना ननवरील बलात्कार प्रकरणात केरळ येथील कनिष्ठ न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. कोट्टायम येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश जी गोपाकुमार यांनी हा निकाल दिला. आरोपात तथ्य नसल्याचं म्हणत न्यायालयाने त्यांची सुटका केली आहे. ६ मे २०१४ ते २३ सप्टेंबर २०१६ या काळात त्यांनी एका ननवर बलात्कार केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. निकालानंतर परमेश्वराची स्तुती करा! असे मुलक्कल यांनी न्यायालयाच्या आवारातून बाहेर पडण्यापूर्वी पत्रकारांना सांगितले. निकाल जाहीर होताच ते कोर्टात बाहेर पडले आणि त्यांनी त्याच्या वकिलांना मिठी मारली.

नन बलात्कार प्रकरण काय आहे?

Request to the court to quash the rape charges against the boy by the girl in Nagpur news
मुलगी न्यायालयात म्हणाली, चुकीने बलात्काराची तक्रार…आता मला भूतकाळ…
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Vishal Gawli News
Vishal Gawli : “विशाल गवळीने माझ्या मुलीला जवळ ओढलं, तिचं तोंड दाबलं आणि…”, पीडितेच्या आईने सांगितला दोन वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंंग
sexual assault at anna university
Chennai Crime: चेन्नईत रस्त्यावरील ठेलेवाल्याचा कॉलेज कॅम्पसमध्येच विद्यार्थिनीवर बलात्कार; सत्ताधाऱ्यांशी संबंध असल्याचा विरोधकांचा आरोप!
Egg thrown at a Bengaluru BJP MLA Munirathna
BJP MLA Munirathna Naidu: बलात्कार प्रकरणात जामीन मिळालेल्या भाजपा आमदारावर अंडी फेकली; तिघांना अटक
Image Of Dhananjay Munde
Dhananjay Munde : “माझ्याजवळचा असला तरी सोडू नका”, संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंकडून फाशीची मागणी
kalyan rape murder case vishal gawali
Video : शेगावात वैद्यकीय तपासणीनंतर विशाल गवळीची कल्याणकडे रवानगी, मध्यरात्री…
kalyan east minor girl rape case
कल्याण पूर्वेतील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी दोन जण अटक, दाढी करून पेहराव बदलत असताना विशाल गवळीवर पोलिसांची झडप

जून २०१८ मध्ये कुरविलंगड पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या तक्रारीमध्ये, चर्चच्या मिशनरीज ऑफ जीझसच्या आदेशाशी संबंधित असलेल्या एका वरिष्ठ ननने तत्कालीन बिशप फ्रँको मुलक्कल यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. कुराविलंगगड येथील मिशन कॉन्व्हेंटमध्ये २०१४ ते २०१६ दरम्यान १३ वेळा अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप ननने केला होता. बिशप यांनी आपल्यावरील आरोप ‘बनावट’ असल्याचा आरोप केला. एका महिलेची तक्रार केलेल्यानंतर झालेल्या कारवाईवरुन माझ्यावर आरोप लावले जात आहेत असे फ्रॅंको मुलक्कल यांनी म्हटले.

गुन्हा नोंदवल्यानंतर लगेचच, सप्टेंबर २०१८ मध्ये, पीडितेच्या जवळच्या नन्सच्या एका गटाने मुलक्कलच्या अटकेच्या मागणीसाठी कोची येथील केरळ उच्च न्यायालयाच्या आवारात उपोषण सुरू केले. त्यानंतर मुलक्कलला जालंधरहून कोचीला आणले गेले, पोलिसांनी तीन दिवस चौकशी केली आणि अखेरीस अटक केली. तब्बल महिनाभरानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली. सप्टेंबर २०२० मध्ये खटला सुरू झाल्यानंतर मुलक्कल यांनी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात त्यांच्यावरील आरोप रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली. मात्र न्यायालयाने याचिका स्वीकारण्यास नकार दिला.

मुलक्कल यांच्यावर काय आरोप आहेत?

मुलक्कल यांच्यावर बेकायदेशीर बंदिवास, सत्तेचा गैरवापर करून लैंगिक छळ, अनैसर्गिक लैंगिक संबंध, बलात्कार आणि महिलेच्या विनयभंगासह अनेक आरोपांचा सामना करावा लागला. वायकोमचे पोलीस उपअधीक्षक के सुभाष हे तपास अधिकारी होते.

न्यायालयात १०५ दिवस चाललेल्या खटल्याच्या शेवटी न्यायालयाने मुलक्कल यांना निर्दोष मुक्त केले. याप्रकरणात ८३ साक्षीदार होते. त्यापैकी ३९ साक्षीदारांनी फिर्यादीच्या बाजूने साक्ष दिल्याचे सांगितले जाते. बचाव पक्षाचे नऊ साक्षीदार सादर होते. साक्षीदारांमध्ये सायरो-मलबार चर्चचे मेजर आर्चबिशप जॉर्ज अॅलेन्चेरी यांच्यासह चार बिशप, ११ धर्मगुरू, २५ नन्स, गुप्त साक्ष देणारे सात दंडाधिकारी आणि वैद्यकीय चाचणी करणारे डॉक्टर यांचा समावेश होता.

हे प्रकरण लक्षणीय का आहे?

भारतात बलात्कार आणि लैंगिक छळाच्या आरोपाखाली कॅथोलिक बिशपला अटक आणि गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे. बलात्कार प्रकरणी पोलिसांनी त्याच्यावर आरोप लावल्यानंतर मुलक्कलला जालंधर बिशपच्या अधिकारातून आणि कर्तव्यातून मुक्त करण्यात आले. तक्रार निवारणासाठी क्वचितच कोणतीही यंत्रणा नसताना चर्चमध्ये ननना ज्या भयावहतेचा सामना करावा लागतो त्यावरही या प्रकरणाने प्रकाश टाकला. बर्‍याचदा, वरिष्ठ पाद्री विरुद्ध छळवणुकीच्या तक्रारींकडे लक्ष दिले जात नाही आणि उच्च व्यवस्थापनातील लोक जाणूनबुजून अशी प्रकरणे दाबतात. खटल्यातील निकालामुळे चर्चमधील सत्ता हाती असलेल्यांवर अधिक चर्चा होईल आणि त्यांना सुधारणा करण्यास भाग पाडले जाईल, अशी आशा आहे.

Story img Loader