जगात मद्यप्रेमींचे प्रमाण लक्षणीय असून उंची मद्ये पिणे म्हणजे भूषणावह बाब असल्याचे अनेकांना वाटते. मात्र प्रमाणापेक्षा जास्त मद्यसेवन केल्यामुळे शरीरावर वाईट परिणाम होतात. याबाबत लॅन्सेटने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालामध्ये एकूण २०४ देशांचा अभ्यास करण्यात आला असून २०२० साली एकूण १.३४ अब्ज (१.०३ अब्ज पुरुष आणि ०.३१२ अब्ज स्त्रिया) लोक प्रमाणापेक्षा जास्त मद्यसेवन करत असून त्याचा शरीरावर वाईट परिणाम होत असल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> विश्लेषण : एका महिन्यात २० पेक्षा अधिक विमानांमध्ये तांत्रिक बिघाड; यामागे नेमके कारण काय आहे?

ग्लोबल बर्डन ऑफ डिसिज या संस्थेने एकूण २०४ देशांमध्ये प्रदेश, वय आणि लिंगाधारित मद्यसेवनाच्या प्रमाणावर एक अहवाल तयार केला आहे. हा अहवाल लॅन्सेटमध्ये प्रकाशित झाला असून यानुसार वय वर्षे १५ ते ३९ वर्षे वयोगटात मद्यसेवन करण्याचे प्रमाण जास्त आहे. पुरुषांवर त्याचे दुष्परिणाम जास्त प्रमाणात होत आहेत. प्रदेशानुसार अभ्यास केल्यानंतर मद्याचे अतिसेवन करणाऱ्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण लक्षणीय आहे. २०२२ साली मद्याचे अतिसेवन करणाऱ्यांमध्ये ५९.१ टक्के लोक हे १५ ते ३९ वर्षे वयोगटातील होते. यापैकी ७६.७ टक्के पुरुष होते.

हेही वाचा >>> विश्लेषण : काली बेई नदीतील पाणी प्यायल्याने पंजाबचे CM भगवंत मान रुग्णालयात दाखल? शिखांसाठी ही नदी पवित्र का आहे?

१५ ते ३९ वयोगटातील मद्यसेवन करणाऱ्या व्यक्तींना आरोग्यविषयक कोणताही फायद झाला नसल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे. तर मद्यसेवन केल्यानंतर झालेल्या ६० टक्के दुर्घटनांमध्ये याच वयोगटातील लोकांचा समावेश होता. या दुर्घटनांमध्ये वाहन अपघात, आत्महत्या, हत्या अशा गुन्ह्यांचादेखील समावेश आहे. भारतामध्ये २०२० साली १५ ते ३९ वर्षे वयोगटातील १.८५ टक्के महिला तर २६.७ टक्के पुरुष प्रमाणापेक्षा जास्त मद्यसेवन करत असल्याचे समोर आले आहे. हेच प्रमाण ४० ते ६४ वर्षे या वयोगटात अनुक्रमे १.७९ टक्के आणि २३ टक्के आहे.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा >>> विश्लेषण: गर्भाशय मुखाच्या कर्करोगावर आता भारतीय लस!

४० वर्षे वयोगटातील मद्यसेवन करणाऱ्या व्यक्तींच्या शरीरावर वय आणि प्रदेशानुसार परिणाम पडतात, असेही या अहवालात सांगण्यात आले आहे. तसेच ४० वर्षांवरील व्यक्तींनी कमी प्रमाणात मद्यसेवन केले, तर शरीरावर काही चांगले परिणादेखील दिसून आले आहेत. उदाहरणार्थ रेड वाईनचे ३.४ औंस (एक औंस म्हणजे २८.३५ ग्रॅम) सेवन केले तर हृदय तसेच रक्तवाहिन्यांसंबधीचे आजार, स्ट्रोक, तसेच मधुमेह अशा रोगांचा धोका कमी होतो, असे लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात सांगण्यात आले आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण: कंत्राटदार आत्महत्या प्रकरणात कर्नाटकात भाजप नेत्याला निर्दोषत्व; काय होते नेमके प्रकरण?

“तरुणांनी मद्यसेवन करु नये. मात्र वृद्धांना याचा काही प्रमाणात फायदा होतो. या अहवालानंतर तरुण मद्यप्राशन थांबवतील हा विचार वास्तववादी नाही. मात्र सध्याचे संशोधन आणि पुरावे लोकांना सांगणे गरजेचे असल्याचे आम्हाला वाटते. या संसोधनामुळे लोकांना त्यांच्या आरोग्याविषयी माहिती मिळेल. तसेच ते निर्णय घेऊ शकतील, अशी आम्हाला आशा आहे,” असे युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन स्कूल ऑफ मेडिसिन येथील हेल्थ मॅट्रिक्स सायन्सेसच्या प्राध्यापिका डॉ. इमॅन्युएला गाकिडौ यांनी या अहवालात म्हटले आहे. तसेच, या अहवालात कोणी किती मद्यसेवन करावे हे प्रदेश आणि वयानुसार निश्चित केले जावे. यासाठी वय वर्षे १५ ते ३९ वर्षे वयोगटातील व्यक्तींना कठोर मार्गदर्शक तत्वे असावीत, असेही या अहवालात सांगण्यात आले आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : युरोपीय देश मोठ्या प्रमाणात प्रवासी गोंधळाला सामोरे का जात आहेत?

या अहवालाबाबत टाटा मेमोरियल सेंटरचे उपसंचालक डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही मद्यसेवन करण्याविषयक धोरण आखण्यासाठी आतापर्यंत आरोग्य विभागाला अनेक पत्रे लिहिली आहेत. मद्यावर पूर्णपणे बंदी घालवी, असे आमचे मत नाहीये. मात्र मद्यसेवनावर मर्यादा घालणे गरजेचे आहे. पिअर प्रेशरमुळे कमी वयोगाटातील मुलांचे मद्यसेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे. १५ ते १६ वर्षे वयोगटातील मुलेदेखील मद्यसेवन करत आहेत,” असे चतुर्वेदी यांनी सांगितले.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained know how much consumption of alcohol is unsafe based on age prd