ब्लेक लेमोइन या गुगल एआय चॅटबॉट LaMDA प्रकल्पावर काम करणाऱ्या अभियंत्याने सार्वजनिकपणे दावा करून सर्वांना आश्चर्यचकित केले की ही प्रणाली संवेदनशील आहे आणि ती आपले विचार व्यक्त करू शकते. तसेच ही प्रणाली माणसांसारखा अभिप्राय देऊ शकतो. यानंतर ब्लेक लेमोईन यांना कंपनीबाबत बाहेर भाष्य केल्याबद्दल रजेवर पाठवले होते. ब्लेक यांनी दिलेल्या कागदपत्रांना Is LaMDA Sentient? असे नाव दिले आहे. गुगलने लेमोईनचे दावे फेटाळले असले तरी, या दाव्यानंतर पुन्हा एकदा एआय आणि रोबोट्सना माणसासारख्या संवदेना जाणवू शकतात का? भविष्यात यामुळे धोका असू शकतो का?, अशा चर्चांना उधाण आले आहे.

Continue reading this story with Loksatta premium subscription
Already a subscriber? Sign in

द वॉशिंग्टन पोस्टच्या अहवालानुसार, लेमोइन या २०२१ मध्ये धर्म, चेतना आणि रोबोटिक्स या विषयांवर LaMDA सोबत संवाद साधण्यास सुरू केली आणि चॅटबॉट संवेदनशील बनल्याचा निष्कर्ष काढला आहे.

चॅटबॉट म्हणजे काय?

चॅटबॉट मधील चॅट म्हणजे संभाषण आणि बॉट म्हणजे रोबोट. अशा प्रकारे चॅटबॉट म्हणजे बोलणारा रोबोट. मात्र हा रोबोट प्रत्यक्षात अस्तित्वा नाही. चॅटबॉट हा एक प्रकारचा कॉम्प्युटर प्रोग्राम आहे जो सामान्य प्रश्न-उत्तरांसाठी डिझाइन केलेला आहे. चॅटबॉटशी कोणीही बोलू शकतो. तुम्ही चॅटबॉटला एखादा प्रश्न विचारताच, ज्याचे उत्तर त्याला माहीत असेल, तर तो लगेच त्याचे उत्तर देईल. तुम्ही एखाद्या माणसाशी जसे बोलता तसे तुम्ही चॅटबॉटशी बोलू शकता.

गुगलमधील एका वरिष्ठ अभियंत्याने दावा केला की कंपनीचे आर्टिफिशियल इंटेलिजेंस-आधारित चॅटबॉट लँग्वेज मॉडेल फॉर डायलॉग अॅप्लिकेशन्स (LaMDA) संवेदनशील बनले आहे. अभियंता, ब्लेक लेमोइन यांनी, धर्म, चेतना आणि रोबोटिक्स सारख्या विषयांवर AI बॉटशी संभाषण केल्यानंतर LaMDA ला “व्यक्ती” असे माणणारे ब्लॉग पोस्ट प्रकाशित केला आहे. दाव्यांमुळे एआय-आधारित चॅटबॉट्सच्या क्षमता आणि मर्यादांबद्दल आणि ते खरोखर मानवांसारखे संभाषण करू शकतात का यावरील वादविवाद  सुरु झाला आहे.

गुगलचे LaMDA काय आहे?

LaMDA हा एक चॅटबॉट आहे जो मनुष्यांसारखा विचार करू शकतो. सहसा, जेव्हा तुम्ही वेबसाइट चॅटबॉटशी चॅट करता तेव्हा ते कोडिंगनुसार तुमच्याशी विशिष्ट टोनमध्ये चॅट करते. पण गुगलचा LaMDA चॅटबॉट स्वतः विचार करू शकतो आणि तुमच्या भावना समजून घेऊ शकतो. LaMDA हे मानवी बुद्धिमत्तेचे सर्वात अलीकडील आणि अचूक उदाहरण मानले जाऊ शकते. LaMDA ही भाषा मॉडेल आहे जी माणसांप्रमाणे गप्पा मारण्यास सक्षम आहे. गुगलने ही प्रणाली तयार केली आहे.

LaMDA हे ट्रांन्सफॉर्मर वर तयार केलेले एक न्यूरल नेटवर्क आर्किटेक्ट गुगलने विकसित केले आहे आणि २०१७ मध्ये मुक्त स्रोत म्हणून सार्वजनिक केले आहे. हा चॅटबॉट तुमचे शब्द समजून घेतो आणि त्यानंतर तुम्हाला प्रतिसाद देतो. या वर्षी गुगलने LaMDA २.० ची घोषणा केली आहे जी या प्रणालीची क्षमता आणखी वाढवते.

LaMDAला ‘संवेदनशील’ का म्हटले?

द वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, गुगलच्या रिस्पॉन्सिबल एआय टीममध्ये काम करणाऱ्या लेमोइन यांनी २०२१ मध्ये त्यांच्या नोकरीचा भाग म्हणून LaMDA शी चॅटिंग सुरू केले. त्यांनी आणि गुगलमधील एका सहकाऱ्याने धर्म, चेतना आणि रोबोटिक्स सारख्या विषयांचा समावेश असलेली AI ची मुलाखत घेतल्यावर, तो चॅटबॉट संवेदनशील असू शकतो असा निष्कर्ष काढला.

गुगलने लेमोइन यांना त्यांच्या गोपनीयतेच्या धोरणाचे उल्लंघन केल्याबद्दल सशुल्क प्रशासकीय रजेवर पाठवले आहे आणि म्हटले आहे की त्यांचे पुरावे त्यांच्या दाव्यांचे समर्थन करत नाहीत.”

गुगलने दावा नाकारला

गुगलचे प्रवक्ते ब्रायन गॅब्रिएल यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की LaMda संवेदनाक्षम असल्याचा कोणताही पुरावा नाही. तर लेमोइन यांना असा विश्वास आहे की LaMdaच्या प्रभावी शाब्दिक कौशल्यामागे संवेदनशील मेंदू देखील असू शकतो. लेमोइन यांनी चॅटबॉटसह चॅटिंग समोर आणली आहे.

मायक्रोसॉफ्ट एआय. जुआन एमचे मुख्य शास्त्रज्ञ आणि प्रयोगशाळा संचालक, लविस्टा फेरेस यांनी देखील ट्विट केले आहे की LaMDA संवेदनशील नाही.

गुगलने आपल्या ब्लॉगमध्ये LaMdaच्या भविष्याविषयी कोणतीही माहिती दिलेली नाही, परंतु कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित चॅटबॉट्समध्ये जबाबदारीची मोठी समस्या आहे आणि दीर्घ सरावानंतरच या समस्येवर मात केली जाईल, असे निश्चितपणे सांगितले आहे. गुगल २०१७ पासून Lambda bot वर काम करत आहे.

LaMda यशस्वी झाल्यास काय फायदे आहेत?

आजकाल, अनेक कंपन्या आपली सेवा किंवा ग्राहक सेवा केवळ चॅटबॉट्सद्वारे चालवित आहेत. पण सध्याच्या चॅटबॉट्सची प्रतिसाद देण्याची एक ठाराविक व्याप्ती आहे. ज्यामुळे ग्राहकांना समस्या निर्माण होतात. सध्याचे चॅटबॉट्स एका सेट पॅटर्ननुसार लोकांना प्रतिसाद देऊ शकतात, परंतु जर LaMda यशस्वी झाला, तर त्याला येणाऱ्या काळात कस्टमर सपोर्ट सर्व्हिसचा सर्वाधिक फायदा मिळेल. शाळेपासून ते लहान-मोठ्या उद्योगधंद्यांपर्यंत त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained lamda google chatbot that understands emotions like humans abn
Show comments