महाराष्ट्रामधील धुळे जिल्ह्यामध्ये आज म्हणजेच मंगळवारी पहाटे ५.५ अंश सेल्सिअस इतक्या निच्‍चांकी तापमानाची नोंद झाली आहे. यंदाच्या हिवाळ्यामधील धुळ्यातील हे सर्वात कमी तापमान ठरलं आहे. धुळ्याबरोबरच संपूर्ण राज्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून थंडीचा तडाखा वाढला आहे, राज्‍यातील अनेक शहरे गारठली आहेत. पुढील ४८ तास धुळ्यामध्ये थंडीचा कडाका असाच राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. असं असतानाच आता उत्तरेतील राज्यांमध्ये आलेली थंडीची लाट महाराष्ट्रामध्येही आली की काय असा प्रश्न अनेकांना पडलाय. मुळात थंडीची लाट म्हणजे काय? हवामान खातं ती कशी जाहीर करतं? लाट आली असं कधी म्हटलं जातं? थंडीमुळे देण्यात येणारा यल्लो अलर्ट म्हणजे काय? हे आणि असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांना थंडीसंदर्भातील बातम्या वाचताना पडतात. याच प्रश्नांचा महाराष्ट्रातील सध्याच्या गारठ्याच्या पार्श्वभूमीवर घेतलेला आढावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राज्यात सध्या स्थिती काय?
उत्तरेकडील राज्यात थंडीची लाट तीव्र झाल्यामुळे राज्यातील तापमानात आणखी घट होऊन गारव्यात वाढ झाली आहे. विदर्भात थंडीची लाट आली असून, बहुतांश भागातील तापमानाचा पारा ८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. थंडीची ही लाट आणखी एक दिवस कायम राहणार आहे. उत्तर महाराष्ट्रातही काही भागांत तापमानाचा पारा १० अंशांखाली गेला आहे. २२ डिसेंबरपासून राज्यात सर्वच ठिकाणी तापमानात पुन्हा काही प्रमाणात वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

रात्रीच्या किमान तापमानात मोठी घट
राज्यात सध्या सर्वच भागात निरभ्र आकाशाची स्थिती आणि कोरडे हवामान आहे. गेल्या दोन दिवसांपासून उत्तरेकडील राजस्थान, पंजाब, चंडीगड, हरियाणा, दिल्ली आदी राज्यांमध्ये थंडीची लाट आहे. ती सध्या तीव्र झाली असून, मध्य प्रदेश, उत्तराखंड, झारखंड आणि थेट विदर्भापर्यंत त्याचा परिणाम जाणवतो आहे. उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह वाढल्याने विदर्भात थंडीची लाट आहे. त्यामुळे मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही काही भागात रात्रीच्या किमान तापमानात मोठी घट झाली असून, बहुतांश भागात ते सरासरीच्या खाली आले आहे.

कोकण रत्नागिरीमध्येही सरासरीखाली तापमान…
विदर्भात सर्वच ठिकाणी किमान तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत २ ते ६ अंशांनी कमी झाला असल्याने या भागात अंगाला झोबणारा गारवा आहे. या भागात आणखी एक दिवस थंडीची लाट कायम राहणार आहे. मध्य महाराष्ट्रात जळगाव, नगर, सातारा, सोलापूरमध्ये किमान तापमान सरासरीखाली गेले आहे. मराठवाड्यात औरंगाबाद, बीड, परभणीत पारा सरासरीखाली आहे. कोकणात रत्नागिरीचे किमान तापमान सरासरीखाली आहे.

नागपूर ७.८ अंश सेल्सिअस…
विदर्भात नागपूर आणि अमरावतीत थंडीची लाट असून, या भागात सोमवारी अनुक्रमे ७.८ आणि ८.० अंश सेल्सिअस किमान तापमान होते. गोंदिया (८.० अंश सेल्सिअस), वर्धा (९.० अंश सेल्सिअस) ब्रह्मपुरी (१०.० अंश सेल्सिअस) या भागातही तापमानात मोठी घट आहे. मध्य महाराष्ट्रात जळगाव येथे नीचांकी ८.७ अंश किमान तापमानाची नोंद झाली. पुणे, नगर, नाशिक आदी भागातील किमान तापमान ११ अंशांच्या जवळपास होते. मराठवाड्यातील औरंगाबादमध्ये १०.६ अंश तापमानाची नोंद झाली. उस्मानाबाद, परभणी आदी भागांत किमान तापमानाचा पारा ११ अंशांच्या जवळपास होता.

थंडीची लाट म्हणजे काय? ती कधी घोषित केली जाते?
सरासरी किमान तापमानापेक्षा एखाद्या दिवशी तापमानामध्ये ४.५ अंश सेल्सिअसपर्यंत घट झाल्यास तो दिवस थंडीचा दिवस होता असं म्हटलं जातं. हवामान खात्याच्या भाषेत अशा दिवसाला थंड दिवस किंवा कोल्ड डे असं म्हणतात. मात्र एखाद्या दिवशी तापमान साडेचार अंश सेल्सिअसहूनही अधिक घसरलं किंवा एकंदरीतच तापमान चार अंश सेल्सिअसखाली गेलं की थंडीची लाट आली असं म्हटलं जातं. म्हणजेच उदाहरण घ्यायचं झालं तर पुण्याचं तापमान हे १२ अंश सेल्सिअस असेल आणि दुसऱ्या दिवशी ते अचानक सात अंशांपर्यंत घसरलं तर त्याला थंडीची लाट आली असं म्हणता येईल. मात्र हेच तापमान १२ अंशांवरुन ९ अंशांवर गेलं तर त्याला थंड दिवस असं म्हटलं जाईल.

अलर्ट म्हणजे काय?
हवामान खात्याकडून वेगवेगळ्या स्तरावरील सतर्कतेचे इशारे दिले जातात. हे इशारे कलर कोडमध्ये असतात. म्हणजेच परिस्थितीच्या तीव्रतेनुसार ग्रीन, यलो, ऑरेंज आणि रेड या चार प्रकारांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात येतो. हवामानाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन मागील काही दिवसांमधील वातावरणातील बदल आणि तापमानाचा अंदाज बांधून हे अलर्ट जारी केले जातात. आयएमडीने उत्तराखंडला १८ डिसेंबर ते २१ डिसेंबरदरम्यान यलो अलर्ट जारी केलाय. पण यलो अलर्टचा किंवा रेड अलर्टचा अर्थ काय होतो आणि यामधून नागरिकांनी काय समजून घ्यायचं असतं हे जाणून घेऊयात.

यलो अलर्ट –
पुढील काही दिवसांमध्ये हवामानाच्या बदलामुळे संकट ओढवू शकते, अशी सुचना जारी करण्यासाठी यलो अलर्ट दिला जातो. दैनंदिन कामे रखडू शकतात त्यामुळे सावधगिरी बाळगण्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात येतो.

ग्रीन अलर्ट –
कोणतंही संकट नाही, सर्व काही ठीक आहे असं सांगण्यासाठी ग्रीन अलर्ट असतो. सामान्यपणे यल्लो, ऑरेंज किंवा रेड अलर्ट मागे घेण्यासाठी ग्रीन अलर्टचा वापर केला जातो.

ऑरेंज अलर्ट –
कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येऊ शकते हे सांगण्यासाठी ऑरेंज अलर्टचा वापर केला जातो. येणाऱ्या संकटासाठी नागरिकांनी तयार रहावे म्हणून प्रशासनाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात येतो. वीजपुरवठा खंडित होणे, वाहतूक ठप्प होण्यासारखे प्रकार घडू शकतात. ही एक प्रकारे पुढच्या संकटाची तयारी असते. गरज असेल आणि महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा असेही या अलर्टमध्ये सांगितले जाते.

रेड अलर्ट –
नैसर्गिक आपत्ती ओढावल्यानंतर किंवा ओढवण्याची शक्यता असल्यास एखाद्या विशिष्ट प्रदेशातील (राज्य, शहर, तालुका, जिल्हा) नागरिकांनी सतर्क राहण्यासाठी रेड अलर्टला जारी करण्यात येतो. या अलर्टचा अर्थ लोकांनी स्वतःला आणि इतरांना सुरक्षित ठेवावं आणि धोकादायक भागात जाऊ नये असा असतो. रेड अलर्टमध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये मोठं नुकसान होण्याची शक्याताही असते. हा इशारा देण्यात आल्यानंतर स्थानिक प्रशासन, आपत्कालीन यंत्रणांनी अधिक सतर्क रहाणं अपेक्षित असतं. अधिक धोकादायक आणि तिव्र पद्धतीची नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असली, परिस्थिती गंभीर होण्याची भीती असली आणि सामान्य जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता असल्यास रेड अलर्ट देण्यात येतो.