२०१७ साली आलिया भट्टचा ‘राझी’ हा चित्रपट आला होता, प्रेक्षकांनी या चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला होता. ‘सेहमत’ या कादंबरीवर हा चित्रपट बेतला होता. काश्मीरमधील एक तरुणी गुप्तहेर म्हणून पाकिस्तानात जाते आणि तिथून भारताला त्यांच्या सिक्रेट मिशनची माहिती पुरवते. गुप्तहेर या विषयावर हॉलिवूड प्रमाणे आता बॉलिवूडमध्येदेखील चित्रपट वेबसीरिज येत आहेत. ‘मिशन मजनू’ हा नवा कोरा चित्रपट याच धर्तीवर बनवला गेला आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
ट्रेलरमध्ये नेमकं काय दाखवलं आहे?
मिशन मजनूदेखील एका भारतीय गुप्तहेरावर बेतलेला आहे. ट्रेलरमध्ये एक भारतीय गुप्तहेर पाकिस्तानच्या अणु प्रकल्पांना शोधून नष्ट करण्याच्या मोहिमेवर पाकिस्तानमध्ये जातो. या मोहिमेला ‘मिशन मजनू’ असे नाव देण्यात आले आहे. शेरशहा चित्रपटानंतर सिद्धार्थ मल्होत्रा एक वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. तो या चित्रपटात भारताचा गुप्तहेर म्हणून काम करताना दाखवला आहे. ट्रेलरमध्ये तो वेगवेगळ्या रूपात दिसत आहे. कपडे शिवणारा हा तरुण पाकिस्तानच्या उच्च अधिकऱ्यांच्या घरापर्यंत पोहचतो. अशातच त्याची एका पाकिस्तानी तरुणीशी लग्न होते. प्रेमाचा एक टच यात देण्यात आला आहे. पहिल्यांदाच सिद्धार्थ आणि दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदना ही जोडी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रूवाला, अमर भुताला आणि गरिमा मेहता यांनी केली असून दिग्दर्शन शंतनू बागची यांनी केले आहे.
चित्रपट कशावर आधारित आहे?
‘मिशन मजनू’ची कथा सत्य घटनेवर आधारित नाही. चित्रपटाचे कथानक १९७१ मध्ये भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान आणि त्यापूर्वी घडलेल्या सत्य घटनांवरून प्रेरित आहे. बांग्लादेशची निर्मिती या युद्धाला कारणीभूत ठरली होती. त्या वेळी दोन्ही देशांमधील लष्करी संघर्षामुळे १९७१ मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध झाले. हे युद्ध १ आठवडा आणि ६ दिवस चालले जे ३ डिसेंबर १९७१ रोजी सुरू झाले आणि १६ डिसेंबर १९७१ रोजी संपले. हा चित्रपट सर्व गुप्तहेरांना श्रद्धांजली वाहणारा चित्रपट आहे जे आपल्या देशासाठी आपल्या मार्गावरुन जातात. ते आपल्या देशासाठी सतत आपला जीव धोक्यात घालतात.
विश्लेषण: एक देश एक चार्जर योजना काय आहे? USB Type C मुळे नेमकं काय होणार?
चित्रपट कधी येणार? कुठे पाहता येणार?
या चित्रपटाची चर्चा गेल्या वर्षापासून सुरु होती. अखेर २०२३च्या सुरवातीलाच हा चित्रपटप्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. २० जानेवारी २०२३ रोजी Netflix वर प्रदर्शित होणार आहे.