पंकज भोसले
वीस वर्षांपूर्वी भारतीय प्रेक्षकांसाठी ‘ऑस्कर’ नामांकित चित्रपटाचा योग जुळणे अवघड होते. चित्रपटाला ऑस्कर मिळाल्यानंतर काही महिन्यांनी वितरकांच्या मर्जी आणि हौसेपोटी विजेते चित्रपट पाहायला मिळत. पंधरा वर्षांपूूर्वी हे चित्र पायरसीचा बाजार अवतरल्याने बदलले. पुरस्कारासाठी पाठविण्यात येणाऱ्या सिनेमांच्या प्रती डीव्हीडीवर उतरवून त्याचे वितरण देशातील गल्लोगल्ल्यांतील विक्रेत्यांकडून उपलब्ध होऊ लागले. मात्र गेल्या पाचेक वर्षांत भारतात नेटफ्लिक्सचे जाळे विस्तारले आणि ऑस्करची नामांकने जाहीर होण्याच्या कितीतरी आधीच हे चित्रपट पाहून घेणे सुकर झाले. हॉलिवुडच्या वॉल्ट डिस्ने आणि वॉर्नर ब्रदर्स या दिग्गज संस्थांची ऑस्करवरची सत्ता संपवून ‘नेटफ्लिक्स’च्या चित्रपटांना सर्वाधिक नामांकन मिळण्याचे हे सलग तिसरे वर्ष आहे.
यंदा काय झाले?
मंगळवारी ऑस्करची नामांकन यादी जाहीर झाली. ‘डोण्ट लूक अप’ आणि ‘पॉवर ऑफ डॉग’ या दोन प्रमुख चित्रपटांसह नेटफ्लिक्सच्या चित्रपटांनी झाडून वेगवेगळ्या गटातली २७ मानांकने पटकावली. थेट सिनेमागृहात चित्रपट प्रदर्शित करणाऱ्या वॉल्ट डिस्नेचे ‘वेस्ट साईड स्टोरी’ आणि ‘नाईटमेअर अॅली’ तसेच वॉर्नर ब्रदर्स कंपनीचे ‘ड्यून’ आणि ‘किंग रिचर्ड’ हे चित्रपट नामांकने पटकावण्यात मागे पडले. या सगळ्या चित्रपटांची लोकप्रियता जगभरात सारखी असली, तरी सिनेमा ग्राहकांच्या सवडी-आवडीनुसार त्यांच्या गॅझेटवर पुरविणाऱ्या नेटफ्लिक्सला मागे टाकणे या उद्योगातील पारंपरिक घटकांना जमले नाही.
थोडा इतिहास…
एका लहरीतून अमेरिकेत सुरू झालेल्या या व्यवसायाने एक तपात ईस्ट इंडिया कंपनीसारखे सर्व खंडांतील देशांवर आपले वर्चस्व फडकावले. १९० देशांमध्ये वीस कोटींच्या नजीक ग्राहक बनविले आहेत. इजिप्तची क्रांती दाखविणारा ‘द स्क्वेअर’ हा माहितीपट २०१३ मध्ये नेटफ्लिक्सच्या निर्मितीतून उतरलेले आणि ऑस्करमधले पहिले नामांकन होते. त्यावेळी वॉर्नर ब्रदर्सचा ‘आर्गो’ हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला होता. अन् स्ट्रिमिंग सेवा पुरवणारी नेटफ्लिक्स कंपनी स्टुडिओजच्या तुलनेत कच्चा लिंबू अवस्थेत होते.
गेल्या तीन वर्षांत…
गेली तीन वर्षे ही नेटफ्लिक्सची ऑस्करवर पकड घट्ट करणारी. करोनाकाळात देशोदेशीच्या टाळेबंदीसत्रात घरात अडकून पडलेल्या नागरिकांना नेटफ्लिक्सने मनोरंजित अवस्थेत ठेवले. चित्रगृहे बंद झाली. काही देशांत ती उघडली तरी त्यांमध्ये जाण्यासाठी करोनाने प्रचंड असुरक्षित वातावरण तयार केले. अशा वेळी चित्रपट-मालिका आणि सर्व प्रकारचे मनोरंजन घरबसल्या रांधणाऱ्या नेटफ्लिक्सची चलती झाली.
पसंतीची सलगता…
नेटफ्लिक्सला जसे ग्राहक पसंती देत आहेत, तसेच चित्रकर्तेही. सुरुवातीला अमेरिकन इंडिपेण्डण्ट चित्रकर्त्यांचाच ओघ नेटफ्लिक्सकडे आला होता. मात्र काळाची पावले ओळखून देशोदेशीच्या दिग्गज दिग्दर्शकांची फळी उभारून नेटफ्लिक्सने चित्रनिर्मितीत अफाट गुंतवणूक केली. २०२० साली नेटफ्लिक्सच्या चित्रपटांना २४ नामांकने होती. तर गेल्या वर्षी ३५ नामांकने. यंदा अॅपलटीव्हीसारखे प्रतिस्पर्धी असले, तरी २७ नामांकनासह नेटफ्लिक्सचा आघाडीझेंडा फडकत आहे.
नवा प्रतिस्पर्धी…
नेटफ्लिक्सला टक्कर देऊ पाहणारा नवा प्रतिस्पर्धी अॅपल टीव्हीने गेल्या काही वर्षांत ‘टेड लासो’ ही सर्वांत गाजलेली मालिका दिली. आता यंदा पहिल्यांदा ‘कोडा’ या चित्रपटासाठी अॅपल टीव्हीला पहिले सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे नामांकन मिळाले आहे. यंदा अॅपलने तयार केलेल्या चित्रपटांना सहा नामांकने आहेत, तर अॅमेझॉन स्टुुडिओच्या चित्रपटांना अभिनयातील तीन नामांकने आहेत.
यंदा पुरस्कार पटकावणार?
गेल्या तीन वर्षांत सर्वोत्कृष्ट चित्रपटासह नामांकनात आघाडी घेणाऱ्या नेटफ्लिक्सला आत्तापर्यंत एकदाही सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पारितोषिक मिळालेले नाही. ऑस्करमधील परमोच्च सन्मान मिळविण्याची शक्यता यंदा सर्वाधिक आहे. कारण नेटफ्लिक्सच्या ‘पॉवर ऑफ डॉग’ या चित्रपटाला मानाची सर्व १२ नामांकने या चित्रपटाला मिळाली आहेत.
पसंतीचा दुसरा…
सर्वाधिक मानांकन असलेल्या ‘पॉवर ऑफ डॉग’ने गेल्या काही महत्त्वाच्या पुरस्कारांवर नाव कोरत ऑस्करमधील स्थान आणखी भक्कम केले आहे. पण गेल्या दोन महिन्यांपासून ‘डोण्ट लूक अप’ या चित्रपटाबद्द्ल टोकाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. धुमकेतू पृथ्वीवर आदळणार या संकल्पनेभोवती त्याचे कथानक फिरते. अमेरिकेच्या राजकारण आणि समाजकारणाचे विडंबन करणारा हा चित्रपटही ऑस्करचा दावेदार मानला जात आहे. २७ मार्चला म्हणजेच भारतीय वेळेनुसार २८ मार्चच्या पहाटे नेटफ्लिक्सचे खऱ्या अर्थाने वर्चस्व यंदा पाहायला मिळू शकेल.