अमेरिकेची ई-व्यापार क्षेत्रातील महाकाय कंपनी अॅमेझॉन डॉट कॉम आणि भारतातील सर्वात मोठी कंपनी असणारी रिलायन्स इंडस्ट्रीज एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या आहेत. फ्यूचर समूहाच्या खरेदीवरुन या दोन्ही कंपन्या एकमेकांसमोर उभ्या असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. दोन आठवड्यांपूर्वी अॅमेझॉन फ्युचर ग्रुपला कायदेशीर नोटीस बजावली. त्यानंतर आता सिंगापूर इंटरनॅशनल अॅट्रीब्युटर सेंटर म्हणजेच एसआयएसीने फ्युचर ग्रुपला रिलायन्सबरोबरच्या करारावर स्थगिती आणली आहे. त्यामुळेच आता फ्युचर ग्रुपसाठी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणारे जेफ बोझस विरुद्ध भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी असा संघर्ष रंगताना दिसत आहे.
अॅमेझॉनचे म्हणणे काय?
रिलायन्स इंडस्ट्रीजशी २४ हजार ७१३ कोटी रुपयांच्या व्यवसाय विक्रीचा व्यवहार करून फ्यूचर समूहाने अमेरिकी कंपनीबरोबर केलेल्या कराराचे उल्लंघन झाले असल्याचा दावा अॅमेझॉनने केला आहे. करारबद्ध हक्कांची अंमलबजावणी करण्यासाठीच आम्ही फ्युचर समुहाला नोटीस पाठवण्याचे पाऊल उचलल्याचे, सिएटलस्थित अॅमेझॉन डॉट कॉमने स्पष्ट केलं आहे.
वाद कोणत्या कंपनीवरुन?
अॅमेझॉनने गतवर्षी फ्यूचर समूहातील बिगर-सूचिबद्ध कंपनी- फ्यूचर कुपन्स लिमिटेडमधील ४९ टक्के भागभांडवल हस्तगत केले आणि त्यासमयी केलेल्या करारात समूहातील अग्रणी कंपनी फ्यूचर रिटेलच्या तीन ते १० वर्षे कालावधीत खरेदीचे हक्कही राखून ठेवले होते. फ्यूचर कूपन्सची या कंपनीत ७.३ टक्के हिस्सेदारी आहे. मात्र ऑगस्टमध्ये फ्यूचर समूहाने आपल्या किराणा, घाऊक विक्री तसेच गोदाम व्यवसाय रिलायन्स इंडस्ट्रीजला विक्री करणारा सामंजस्य करार केला. सर्व प्रकारच्या नियामक मंजुऱ्यांचे सोपस्कार या व्यवहाराने अद्याप पूर्ण करावयाचे असले, तरी त्या संबंधाने पहिला कायदेशीर अडसर अॅमेझॉनने निर्माण केला.
९० दिवसांमध्ये काय होणार?
एसआयएसीच्या मध्यस्थता पॅनलने निर्णय दिल्यानंतर किशोर बियानी यांच्या फ्युचर ग्रुपने मुकेश अंबानींच्या रिलायन्स रिटेलरसोबतचा व्यवहार सध्या स्थगित केल्याचे वृत्त आहे. एक सदस्यीय मध्यस्थता पॅनलने मागील आठवड्यामध्ये अॅमेझॉन आणि फ्युचर ग्रुप दरम्यानच्या याचिकेवर सुनावणी केली. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार सध्या न्यायलायने दिलेला आदेश हा ९० दिवसांसाठी लागू होणार आहे. त्या दरम्यान नवीन मध्यस्थीची नेमणूक करण्याचेही आदेश देण्यात आले आहे. रिलायन्स रिटेलबरोबर व्यवहार करुन फ्युचर समूहातील कंपनीने अॅमेझॉनबरोबरच्या करारातील अटींचे उल्लंघन केलं असल्याच्या याचिकेवर सुनावणीनंतर व्यवहारासंदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे.
निर्णयावर अॅमेझॉनचे म्हणणं काय?
अॅमेझॉनने एसआयएसीच्या या निर्णयाचे स्वागत केलं आहे. आम्ही या निर्णयावर संतुष्ट असून हा निर्णय आमच्या दृष्टीने महत्वाचा आहे असंही म्हटलं आहे. दोन्ही कंपन्यांनी जर हा व्यवहार पुढे सुरु ठेवला तर आम्ही पुन्हा दाद मागू असंही कंपनीने म्हटलं आहे.
रिलायन्सचं म्हणणं काय?
या निर्णयानंतर रिलायन्सनेही कठोर भूमिका घेत रविवारी (२५ ऑक्टोबर रोजी) एक पत्रक जारी केलं आहे. अॅमेझॉनच्या तक्रारीनुसारच्या सुनावणीमध्ये देण्यात आलेल्या निर्णयासंदर्भात कंपनी ठाम असल्याचे यात नमूद करण्यात आलं आहे. सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्या असून सध्या रिलायन्स फ्युचर समुहातील उद्योगांचे अधिग्रहण करण्याच्या टप्प्यात आहे. भारतीय कायद्यानुसार आम्ही योग्य कायदेशीर सल्ल्यानुसार हा व्यवहार केला आहे. फ्युचर समुहासोबत केलेल्या करारानुसार कोणताही विलंब न होऊ देता नियोजित वेळेमध्ये हा व्यवहार पुर्ण करण्यासाठी रिलायन्स प्रयत्नशील आहे, असं या पत्रकामध्ये नमूद करण्यात आलं आहे.
वाद चिघळणार?
एकंदरित या निर्णयानंतर दोन्ही कंपन्यांनी घेतलेली भूमिका पाहता अॅमेझॉन विरुद्ध रिलायन्स हा वाद भविष्यात आणखीन चिघळण्याची चिन्ह दिसत आहेत. अॅमेझॉनने या प्रकरणामुळे पुढे व्यवहार सुरु ठेवल्यास पुन्हा दाद मागणार असल्याचे म्हटले आहे तर दुसरीकडे रिलायन्सनेही मागे हटण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता हा व्यवहार नक्की होणार की नाही यासंदर्भात येणाऱ्या कालावधीमध्ये अधिक स्पष्टता येईल आणि यासंदर्भातील संभ्रम दूर होईल.
नक्की काय आहे हा व्यवहार
रिलायन्सने ‘फ्युचर’ समूहाचा किरकोळ आणि घाऊक किराणा व्यवसाय ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्येच ताब्यात घेण्याची घोषणा केली. रिलायन्स इंडस्ट्रीजने ‘फ्युचर’ समूहाचा किरकोळ आणि घाऊक किराणा व्यवसाय २९ ऑगस्ट रोजी ताब्यात घेत असल्याचं जाहीर केलं. २४,७१३ कोटी रुपयांच्या मोबदल्यात रिलायन्सने हे अधिग्रहण केलं. या व्यवहारामुळे रिलायन्सचा किराणा क्षेत्रातील विस्तार आणखी मजबूत होण्याची कंपनीला अपेक्षा आहे. ‘अॅमेझॉन’सारख्या ई-व्यापार कंपनीचा तुल्यबळ स्पर्धक म्हणून रिलायन्सने हे पाऊल टाकल्याचे सांगितले जाते. ‘रिलायन्स रिटेल व्हेन्चर्स लि.’ या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या उपकंपनीमार्फत फ्युचर ग्रुपच्या किराणा व्यवसायातील अधिग्रहण व्यवहार करण्यात आला. या व्यवहारामुळे बिग बझार, एफबीबी, इझीडे, सेंट्रल, फुडहॉल या किराणा नाममुद्रांसह ४२० शहरांतील त्यांच्या १८०० विक्री दालनांवर रिलायन्सचे वर्चस्व प्रस्थापित होणार आहे. ‘फ्यूचर’ समूहाचा लॉजिस्टिक (रसद पुरवठा) व्यवसाय आणि गोदाम व्यवसायही रिलायन्स ताब्यात घेणार आहे. छोटे व्यापारी आणि किराणा दुकानदार त्याचबरोबर मोठय़ा ब्रँडना बरोबर घेण्याचे आमचे धोरण असून ग्राहकांनी मोजलेल्या पैशाचे त्यांना वस्तूंच्या रूपात पुरेपूर मूल्य देण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे रिलायन्स रिटेलच्या संचालक इशा अंबानी यांनी सांगितले होते.