मूळची वसईकर असलेल्या श्रद्धा वालकर हिच्या हत्या प्रकरणातील आरोपी आफताब पूनावाला याच्यावर नार्को चाचणी करण्याची परवानगी न्यायालयाने अलीकडेच दिली. नार्को चाचणीची परवानगी भारतीय न्यायालयांमध्ये केवळ अपवादात्मक प्रसंगांमध्येच दिली जाते. कारण सरसकट परवानगी सर्वोच्च न्यायालयाने बेकायदा ठरवली आहे. त्यातही या चाचणीस परवानगी देताना आरोपीच्या संमतीसही न्यायालयाने महत्त्व दिले आहे.

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात काय वेगळे ?

कोणताही खून अथवा हत्या ही निर्घृणच असते. मात्र श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात आरोपी आफताब याने तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून त्याची विल्हेवाट लावण्याचे केलेले प्रयत्न ही कौर्याची परिसीमाच गाठणारे होते. या रक्त गोठवणाऱ्या प्रकरणात आरोपीच्या बोलण्यात एकवाक्यता नसणे आणि सातत्याने वेगळी माहिती देत तपास यंत्रणेची दिशाभूल करण्याचा केलेला प्रयत्न हे नार्को चाचणीस न्यायालयाने अपवादात्मक परवानगी देण्यास दोन महत्त्वाचे मुद्दे ठरले.

Soybean Price, Vidarbha, Ladki Bahin Yojana,
विरोधकांचे ‘सोयाबीन अस्त्र’ ‘लाडक्या बहीण’चा प्रभाव रोखणार ?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
eradication of caste book review
बुकमार्क : जातीय जनगणना की जातिव्यवस्थेचे निर्मूलन?
History Of Tipu Sultan
एका रात्रीत ८०० मंड्यम अय्यंगारांची हत्या; ‘नरक चतुर्दशी’ हा दिवस शोकदिवस का ठरला?
massive protest by uppsc aspirants over exam dates
उत्तर प्रदेशात ‘यूपीपीएससी’ परीक्षार्थींची निदर्शने; दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : नीतिशास्त्र, सचोटी  आणि नैसर्गिक क्षमता
Australia A beat India A by 6 Wickets in in 2nd unofficial Test
IND A vs AUS A : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी भारताची उडाली दाणादाण, दुसऱ्या सराव सामन्यातही हार

यापूर्वी नार्को चाचणी कुणाकुणावर झाली?

अधिकृत परवानगीच्या निर्णयानंतर २००२ साली गुजरातच्या गोध्रा हत्याकांडातील आरोपींची नार्को चाचणी भारतात सर्वप्रथम करण्यात आली. त्यानंतर स्टॅम्प पेपर घोटाळ्यातील आरोपी अब्दुल करीम तेलगीची नार्को चाचणी २००३ साली पार पडली. निठारी हत्याकांडातील दोन आरोपींचीही गुजरातच्या गांधीनगरमध्ये नार्को चाचणी करण्यात आली होती.

आणखी वाचा : विश्लेषण: IND vs NZ साठी लक्ष्मणकडे का दिली प्रशिक्षकपदाची जबाबदारी? द्रविडला ब्रेक देण्याचं नेमकं कारण काय?

सर्वात पहिला प्रयोग कुठे झाला?

नार्को चाचणीचा सर्वात पहिला प्रयोग गुजरातमध्ये झाला. आणि २००० साली पार पडलेल्या राष्ट्रीय न्यायवैद्यक परिषदेमध्ये तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण आडवाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत त्या प्रयोगाची सविस्तर माहिती प्रथमच जाहीर करण्यात आली. अहमदाबादमधील एका जवाहिऱ्याने मुंबईमध्ये सोन्याची बिस्किटे खरेदी केली होती. अहमदाबाद स्टेशनवर उतरल्यानंतर रेल्वे पोलिसांनी त्याला हटकले आणि हा तस्करीचा माल आहे, असे वाटल्याने तो मोकळा करण्यासाठी त्याच्याकडून काही सोन्याची बिस्किटे ठेवून घेतली आणि त्याची रवानगी केली. वस्तुतः त्या जवाहिऱ्याने व्यापारासाठी घेतलेल्या कर्जामधून ती सोन्याच्या बिस्किटांची खरेदी केली होती. त्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना गाठून या प्रकरणाची माहिती दिली. त्यावेळेस रेल्वे स्थानकावर ड्युटीवर असलेल्या पोलिसांना पाचारण करण्यात आले आणि ‘आपण असे काहीही केलेले नाही’ असा कांगावा त्यांनी केला. जवाहिऱ्याने प्रत्यक्षात ती सोन्याची बिस्किटे कर्जाच्या रकमेतूनच खरेदी केल्याची पावती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दाखवली. त्यानंतर कोण खरे आणि कोण खोटे असा पेच वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर होता. हे सारे एका बाजूस घडत असताना दुसरीकडे देशात ट्रूथ ड्रगची चाचणी करण्याचा निर्णय सरकारी पातळीवर झाला होता. न्यायवैद्यक संस्थेला (फोरेन्सिक सायन्स) त्याची जबाबदारी देण्यात आली होती. कारण याचा वापर गुन्हेगारांसंदर्भात केला जाणार होता.

आणखी वाचा : विश्लेषण: अब्जावधी डॉलरचा चुराडा; ‘एफटीएक्स’मध्ये नेमके असे काय घडले?

अशी झाली परवानगीपूर्व पहिली नार्को चाचणी…

अखेरीस रेल्वे पोलीसांच्या जबानीची खातरजमा करण्यासाठी देशातील पहिल्या नार्को चाचणीचा निर्णय सरकारी पातळीवर झाला. या चाचणीमध्ये आरोपींच्या शरीरामध्ये ट्रूथ ड्रग टोचले जाणार होते. ‘सोडियम पेंटोथल, स्कोपलामाइन आणि अॅमिथल सोडियमचा वापर ‘ट्रूथ ड्रग’ म्हणून करण्यात आला. ही रसायने विशिष्ट प्रमाणात इंजेक्शनद्वारे शरीरात सोडल्यानंतर व्यक्ती जाणीव व नेणीव या दोन्ही पातळ्यांच्या बरोबर मध्ये राहाते. त्या अवस्थेत विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे खरी येतात, किंबहुना म्हणून या रसायनांना ‘ट्रूथ ड्रग’ म्हटले जाते. माणसाचे खोटे बोलणे हे नेहमी जाणीवेच्या पातळीवर असते. मात्र जाणीव व नेणीवेच्या मधल्या पातळीवर खोटे बोलणे अशक्य असते. त्यामुळे जे जसे घडले तसेच माणूस प्रश्नागणिक सांगत जातो.

अहमदाबादच्या प्रकरणात काय घडले?

दोन्ही रेल्वे पोलिसांनी ट्रूथ ड्रग टोचल्यानंतर त्यांनी जवाहिऱ्याकडे सोन्याची बिस्किटे पाहिल्यानंतर काय विचार केला आणि त्याला कसे लुटले त्याची सर्व माहिती उत्तरांमध्ये दिली. त्याचप्रमाणे बिस्किटे कुठे लपवून ठेवली आहेत, हेही सांगितले. त्याप्रमाणे त्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी सोन्याची बिस्किटे हस्तगतही केली. अशी पार पडली देशातील पहिली नार्को चाचणी. त्यानंतर गोध्रा हत्याकांड प्रकरणातील आरोपींवर देशातील पहिली नार्को चाचणी अधिकृतरित्या पार पडली.

विश्लेषण: श्रद्धाच्या मारेकऱ्याची नार्को चाचणी होणार; ही चाचणी नेमकी होते कशी? यातून १०० टक्के अचूक निष्कर्ष येतात?

नार्को चाचणीवर आक्षेप…

या नार्को चाचणीवर अनेक आक्षेप घेण्यात आले. चाचणीच्या शास्त्रीय वैधतेबाबतही प्रश्न उपस्थित केले गेले. आणि सरसकट पोलिसांना याबाबत अधिकार देऊ नयेत, असेही अनेक मुद्दे सर्वोच्च न्यायालयासमोर आले. अखेरीस न्यायालयाच्या परवानगीशिवाय चाचणीला परवानगी मिळणार नाही आणि केवळ अपवादात्मक परिस्थितीमध्येच न्यायालय परवानगी देऊ शकेल, अशी मार्गदर्शक तत्वे न्यायालयाने या प्रकणात घालून दिली. त्यामुळे केवळ अपवादात्मक प्रकरणात यास परवानगी मिळते. श्रद्धा वालकर हत्या प्रकरण आणि त्यातील कौर्यामुळे या प्रकरणात नार्को चाचणीस न्यायालयाने परवानगी दिली आहे.