आज प्रेक्षक चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पहाण्यापेक्षा घरीच ओटीटी माध्यमावर चित्रपट बघण्यास पसंत करतात. आज या माध्यमावर वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट, माहितीपट, वेबसीरीज प्रेक्षकांसाठी उपलब्ध आहेत. ओटीटी माध्यमातील अग्रगण्य कंपनी नेटलफिल्क्सने सध्या प्रेक्षकांसाठी एक नवा पर्याय घेऊन आली आहे. जगभरात नेटाफिल्क्सचे अनेक वापरकर्ते आहेत. मध्यंतरी नेटफ्लिक्सने आपले वापरकर्ते गमावले होते. यावरच आता कंपनीने उपाययोजना केली आहे.

नेटफ्लिक्सने अमेरिकेतील वापरकर्त्यांना एक नवे फिचर आणले ज्यामध्ये वापरकर्त्यांना मागील प्लॅनपेक्षा यामध्ये स्वस्तात प्लॅन मिळू शकतात. अमेरिकेच्या बरोबरीने ही सेवा आता इतर देशातील वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीला कंपनीने पासवर्ड शेअरिंग प्रकार रोखण्यासाठी नवी योजना घेऊन येत आहेत. वापरकर्ते आपला पासवर्ड इतरांना बरोबर शेअर करत असल्याने साहजिकच कंपनीला याचा तोटा सहन करावा लागत होता. आता नेटफ्लिक्सने एक नवीन प्रोफाइल ट्रान्सफर फिचर आणले आहे ज्यात एखाद्याच्या खात्यातून आपली वैयक्तिक प्रोफाईल नवीन प्रोफाईलमध्ये स्थलांतरित करता येणार आहे.

विश्लेषण: कोणत्या वयात मुलांच्या हातात ‘स्मार्टफोन’ देणे योग्य? पाश्चिमात्यांच्या संशोधनातून काय दिसून आले?

नेटाफिल्क्सने सोमवारी हे जाहीर केले आहे की पासवर्ड शेअरिंग प्रकाराला आता आळा घालण्यास सुरवात केली आहे. वेगवेगळ्या ठिकाणांहून एकाच खात्यावर अधिक लॉगिन करणाऱ्या लोकांना आता कंपनी ओळखू शकते. लॅटिन अमेरिकेतील अशा वापरकर्त्यांना यासाठी आणखीन पैसे भरावे लागतात. नेटफ्लिक्स लवकरच प्रोफाईल स्थलांतराची मोहीम सुरु करणार आहे. वापरकर्त्यांना नवी प्रोफाईलवर मागच्या प्रोफाइलवरची सगळी माहिती मिळू शकेल. कंपनीने अशी योजना करण्यामागे कारण सांगितले आहे की ‘ज्यांनी मित्रांकडून पासवर्ड घेतला आहे अशा लोकांना त्यांचे प्रोफाईल पुन्हा सेटअप करावे लागणार नाही, आणि ते प्रत्यक्षात पुढे जाऊन स्वतःसाठी नवीन सदस्यत्व मिळवू शकतील’.

पासवर्ड शेअरिंग प्रकार कमी करून वापरकर्त्यांनी स्वतःचे सबस्क्रिप्शन खरेदी करावे यासाठी ही मोहीम सुरु केली आहे. कोणतीही योजना राबवताना त्यात अडथळे येणारच, नेटफ्लिक्सला काही आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. जे लोक दुसऱ्यांच्या पासवर्डवर आपली प्रोफाइल वापरत आहे त्यांना या मोहिमेमुळे स्वतःची प्रोफाईल सदोष वाटण्याची शक्यता नेटफ्लिक्सला वाटत आहे. अमेरिकेत तसेच देशांमध्ये नेटाफिल्क्सच्या बेसिक प्लॅनची किंमत सुमारे $६.९९ आहे . नेटफ्लिक्सच्या या नव्या फिचरमुळे एखादा व्हिडीओ तुम्ही ७२०p रिझोल्यूशन पर्यंतच बघू शकता. ज्यावेळी मोबाईलची स्क्रीन्स २k आणि ४ k असतील तेव्हा या रिझोल्यूशनच्या खालती गेले तर वापरकर्ते ते पाहू शकणार नाही.

विश्लेषण: ‘व्हॉट्सअ‍ॅप’ने भारतातील २३ लाख अकाऊंट बंद का केले? बंदीपासून अकाऊंट कसं वाचवाल?

नेटफ्लिक्सला पुढे सध्या आणखीन काही आव्हाने आहेत ती म्हणजे मोफत सुविधा घेतलेल्या वापरकर्त्यांना खात्री नव्या योजनेची खात्री पटवून देणे, नव्या प्लॅनसाठी त्यांच्याकडून पैश्यांची अपेक्षा करणे, नवी योजनेत मर्यादित स्ट्रीमिंग गुणवत्ता, तसेच प्रत्येक ६० मिनिटानंतर ४ ते ५ मिनिटांच्या जाहिराती यात दाखवल्या जाणार आहेत. अशा अनेक आव्हाने त्यांच्यापुढे आहेत. हे योजना कितपत यशस्वी होईल हे काही दिवसात कळलेच. आज ओटीटी माध्यमात टिकून राहायचे असल्यास कंपन्यांना वेगवेगळ्या कलुप्तया कराव्याच लागणार आहेत.

Story img Loader