भारत आणि युरोपीय देशांसह जगामध्ये कोविड-१९ प्रकरणांमध्ये अचानक वाढ होत आहे. प्रामुख्याने दक्षिण आफ्रिकेत प्रथम आढळलेल्या नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे करोनाबाधितांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. ओमाक्रॉनमध्ये उत्परिवर्तनांची संख्या जास्त असल्याने, संक्रमणाचा प्रसार वेगाने होतो आहे. प्रयोगशाळांच्या अभ्यासाच्या प्राथमिक परिणामांवरून असे दिसून आले आहे की ओमायक्रॉन प्रकार कोविड-१९ लसींद्वारे मिळाले संरक्षण टाळण्यास सक्षम आहे. ओमायक्रॉन प्रकारात लसीच्या जास्तीत जास्त फायद्यांपासून वाचण्यासाठी योग्य उत्परिवर्तन आहे, असे अभ्यासात म्हटले आहे.
मात्र, चांगली बातमी अशी आहे की रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे. आणखी एक महत्त्वाचे निरीक्षण म्हणजे पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींना मोठ्या संख्येने संसर्ग होत आहे. आणि यामुळे एक प्रश्न निर्माण होतो की ओमायक्रॉन व्हेरिएंट एखाद्या व्यक्तीला पुन्हा संक्रमित करू शकते का ज्याला यापूर्वी कोविड-१९ विषाणूचा संसर्ग झाला होता आणि नंतर त्यातून बरा झाला होता.
लोकसत्ता विश्लेषण : ओमायक्रॉनचे उत्परिवर्तन अधिक घातक, अधिक गंभीर?
एका अभ्यासात असे दिसून आले आहे की कोविड-१९ च्या पूर्वीच्या संसर्गातून बरे झालेल्या लोकांना पुन्हा संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो, जो पूर्वीच्या स्वरूपाच्या तुलनेत खूप जास्त असतो. दक्षिण आफ्रिकेतील अभ्यासात असे आढळून आले आहे की ओमायक्रॉनच्या लाटेदरम्यान पुन्हा संसर्ग होण्याचा धोका बीटा आणि डेल्टा वाढीदरम्यान आढळलेल्या जोखमीपेक्षा लक्षणीय आहे.
संशोधकांनी ओमायक्रॉनच्या संसर्गाच्या जोखमीचा अंदाज लावण्यासाठी मार्च २०२० ते नोव्हेंबर २०२१ पर्यंत देशातील कोविड-१९ चाचण्यांचे विस्तृत रेकॉर्ड तपासले होते. त्यांना आढळले की बीटा आणि डेल्टा मुळे संसर्गाचा धोका आधीच्या लाटेच्या काळात स्थिर राहिला होता, पण ओमायक्रॉनच्या आगमनानंतर तो वाढला होता.
लोकसत्ता विश्लेषण : देशात एक लाख रुग्णांचा टप्पा गाठण्यासाठी आठ ते १० दिवस कसे लागले? जाणून घ्या..
अभ्यासात असे आढळून आले आहे की मागील लाटांमध्ये संसर्ग झालेल्या लोकांमध्ये डेल्टाच्या मागील संसर्गाच्या बाबतीत पुन्हा संसर्गाचे प्रमाण जास्त होते. मात्र लसीकरणाचे विविध स्तर, वाढ आणि वय या घटकांमुळे दक्षिण आफ्रिकेप्रमाणे पुन्हा संसर्ग होण्याचा दर इतरत्र समान असू शकत नाहीत.
वैयक्तिक वर्तन, सार्वजनिक आरोग्य उपाय जसे की मास्कचा वापर आणि विशिष्ट रोगप्रतिकारक शक्तीसह इतर घटक एखाद्या व्यक्तीच्या पुन्हा संसर्गा होण्याच्या बाबतीत परिणाम करू शकतात. तटस्थ अँटीबॉडीजची उच्च पातळी अधिक चांगली आहे, पण विशिष्ट प्रमाणात संरक्षण प्रदान करण्यासाठी कोणत्या स्तराची आवश्यकता आहे हे अद्याप स्पष्ट नाही.
लोकसत्ता विश्लेषण : ओमायक्रॉन विरूद्ध कापडाचे मास्क किती प्रभावी आहेत?; जाणून घ्या तज्ञांची उत्तरे
जागतिक आरोग्य संघटना काय म्हणते?
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या मते, ओमायक्रॉन लोकांमध्ये पूर्वीची प्रतिकारशक्ती टिकवून ठेवू शकतो पण भूतकाळात कोविड-१९ झालेल्या लोकांना संक्रमित करू शकते. लसीकरण न केलेल्या लोकांसाठी आणि ज्यांचे अनेक महिन्यांपूर्वी लसीकरण करण्यात आले होते त्यांच्यासाठी ही नक्कीच धोक्याची घंटा आहे. कोविड-१९ मधून बरे झालेल्या व्यक्तींना डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉनचा पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता ३ ते ५ पट जास्त असते, असे जागतिक आरोग्य संघटनेने गेल्या महिन्यात त्यांच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.
लोकसत्ता विश्लेषण : घरगुती कोविड-१९ चाचण्यांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंट आढळतो का?; जाणून घ्या…
डब्ल्यूएचओने म्हटले आहे की हा विषाणू बहुतेक वयवर्षे २० आणि ३० असणाऱ्या प्रौढांमध्ये प्रसारित झाला आहे. सुरुवातीला मोठ्या शहरांमध्ये आणि सामाजिक आणि कामाच्या ठिकाणी मेळाव्यांचा समावेश असलेल्या गटांमध्ये पसरला आहे. दरम्यान, चांगली बातमी अशी आहे की ओमायक्रॉनमुळे डेल्टा प्रकारापेक्षा अधिक गंभीर रोग होतो याचा कोणताही पुरावा नाही, ज्यामुळे गेल्या वर्षी संसर्गाची विनाशकारी दुसरी लाट आली.