आसाममध्ये एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील नागाव जिल्ह्यात कंगारू न्यायालयाच्या आदेशावरून एका व्यक्तीला जिवंत जाळण्यात आलं आहे. एवढेच नाही तर संबंधित व्यक्तीचा मृतदेहही पुरण्यात आला होता. हे प्रकरण उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यातही घेतलं आहे.

याप्रकरणी पोलिसांचं मत काय?
उपविभागीय पोलीस अधिकारी एम दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागाव जिल्ह्यातील बोर लालुंग भागातील कंगारू न्यायालयात एका हत्येप्रकरणी सुनावणी सुरू होती. या सुनावणीदरम्यान आरोपी व्यक्ती हत्येप्रकरणी दोषी आढळल्यानंतर कंगारू न्यायालयाने संबंधित व्यक्तीला जिवंत जाळण्याचा आदेश दिला. त्यानुसार दोषीला सार्वजनिक ठिकाणी जिवंत जाळण्यात आलं. रणजीत बोरदोलोई असं मृत पावलेल्या व्यक्तीचं नाव आहे.

satish wagh murder case mohini wagh and 5 others remanded to police custody till 30 december
खून करण्यामागे कारण आर्थिक की अनैतिक संबंध? सतीश वाघ खून प्रकरणात पत्नीला पोलीस कोठडी
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
kalyan east minor girl rape case
कल्याण पूर्वेतील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी दोन जण अटक, दाढी करून पेहराव बदलत असताना विशाल गवळीवर पोलिसांची झडप
Rape on Minor Girl and then Accused Killed Her
Kalyan Crime : कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या, मृतदेह बापगाव भागात फेकला; आरोपी विशाल गवळीला अटक
Gisele Pelicot
पत्नीवर १० वर्षे ५० हून अधिक लोकांकडून बलात्कार, पती आढळला दोषी; फ्रान्सला हादरवणारे सामूहिक बलात्कार प्रकरण काय?
police crime marathi news
“पोलिसांनी गुन्हा केला तर अधिक कठोर…”, वाचा, जामीन रद्द करताना काय म्हणाले न्यायालय?
Parbhani Violence, Sushma Andhare,
“परभणी हिंसेमागे आंबेडकरी नव्हे, हिंदुत्ववादी संघटना”, सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप
Mumbai police rape news
मुंबई : १७ वर्षीय मुलीवर अत्याचाराप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा

कंगारू न्यायालय म्हणजे काय?
कंगारू न्यायालय हे भारतात हजारो वर्षांपासून अस्तित्वात आहे. पण काही वर्षाआधीच ही न्यायालये भारतात बेकायदेशीर ठरवण्यात आली असून त्यांना गुन्हेगारी श्रेणीत टाकण्यात आलं आहे. असं असूनही अजूनही गावपातळीवर ही न्यायालये सक्रिय आहेत. अशा न्यायालयात एखाद्या व्यक्तीला आरोपी मानून बेकायदेशीर किंवा असंवैधानिक पद्धतीने शिक्षा दिली जाते. कोणत्या तरी एकाच बाजूने हा निकाल सुनावला जातो. अशा न्यायालयांमध्ये पुराव्यांच्या आधारे निकाल सुनावला जात नाही, तर लोकांच्या दबावाखाली किंवा लोकांच्या भावनांचा प्रवाह लक्षात घेऊन निकाल दिला जातो.

हेही वाचा- विश्लेषण : सपा-काँग्रेसने शिंझो आबे यांच्या हत्येचा संबंध अग्निपथ योजनेशी कसा जोडला?

बिहार-पश्चिम बंगालमध्ये कंगारू न्यायालयाच्या सर्वाधिक घटना
एका अहवालानुसार, बिहार आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यांमध्ये कंगारू न्यायालये सर्वाधिक सक्रिय आहेत. या राज्यांमधून अनेकदा हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना समोर येत असतात. कंगारू न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, खून आणि बलात्कार करण्याचे देखील आदेश देण्यात आले आहेत.

हेही वाचा- विश्लेषण : भारतीय तमिळ लोक म्यानमारच्या सीमेजवळील शहरात कसे गेले?

कंगारू न्यायालयाच्या आदेशानुसार दिलेल्या शिक्षा

  • काही दिवसांपूर्वी बिहारमधील गया जिल्ह्यात माओवाद्यांनी कंगारू न्यायालयाच्या आदेशानुसार एकाच कुटुंबातील चार जणांना फासावर लटकवलं होतं.
  • काही महिन्यांपूर्वी आसामसारखीच एक घटना पश्चिम बंगालमधील मालदा येथे घडली होती. येथील एका व्यक्तीला कंगारू न्यायालयाने जिवंत जाळण्याचे आदेश दिला होता. निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक लोकांनी संबंधित व्यक्तीला पेटवून दिलं होतं.
  • तर ओडिशातील मयूरभंज येथेही कंगारू न्यायालयाची क्रूरता पाहायला मिळाली होती. वेगवेगळ्या समाजातील तरुण-तरुणीचं प्रेमसंबंध उघडकीस आल्यानंतर गावकऱ्यांनी त्यांचं मुंडन करून त्यांची रस्त्यावरून धिंड काढली होती.

Story img Loader