जगावर सध्या ओमायक्रॉनचं संकट असल्याने सर्वांचीच चिंता वाढली असून पुन्हा एकदा अनेक देशांवर लॉकडाउन लावण्याची वेळ ओढावली आहे. यादरम्यान ओमायक्रॉनचा प्रभाव कमी करण्यासाठी बूस्टर डोसची गरज आहे का याची चाचपणी शास्त्रज्ञांकडून केली जात आहे. दरम्यान ओमायक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांचा अभ्यास केल्यानंतर शास्त्रज्ञांना दक्षिण अफ्रिकेतील रुग्णांमध्ये एक लक्षण सामान्य असल्याचं लक्षात आलं आहे. हे लक्षण म्हणजे घसा खवखवणे आहे.

दक्षिण अफ्रिकेतील स्थित डिस्कव्हरी हेल्थचे सीईओ रायन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमायक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांमध्ये डॉक्टरांना थोडी वेगळी लक्षणं जाणवत असताना यामधील प्राथमिक आणि सामान्य लक्षणांमध्ये घसा खवखवणे आणि नाक बंद होणे ही लक्ष आहेत.

ZOE Tracking Study नुसार, वाहतं नाक, डोकेदुखी, थकवा (सौम्य किंवा गंभीर), शिंका येणे आणि घसा खवखवणे ही लक्षण नोंदवण्यात आली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने नुकतंच ओमायक्रॉनसंबंधी माहिती देताना सांगितलं होतं की, “डेल्टाच्या तुलनेत याचा संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याचे अनेक पुरावे वारंवार समोर येत आहे. समूह संसर्ग झालेल्या देशांमध्ये डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉनचा प्रसार वेगाने होत आहे. याठिकाणी डबलिंग रेट १.५३ आहे”.

“लोकसंख्येची जास्त प्रतिकारशक्ती असणाऱ्या देशांमध्ये ओमायक्रॉन वेगाने पसरत असून या जलद वाढीचा दर रोगप्रतिकारशक्तीवरही कितपत होतोय याबाबत अद्याप अनिश्चितता आहे. मात्र उपलब्ध डेटानुसार, जिथे समूह संसर्ग झाला होता तिथे ओमायक्रॉन डेल्टालाही मागे टाकेल,” असंही यावेळी सांगण्यात आलं.

ओमायक्रॉनची लक्षणं डेल्टाच्या तुलनेत कितपत वेगळी?

डेटानुसार, ओमायक्रॉनची लक्षणं डेल्टाच्या तुलनेत वेगळी आहेत. एकीकडे ओमायक्रॉन सर्दीसारखी लक्षणं दाखवत असताना, डेल्टाचे निदान झालेल्या रूग्णांमध्ये ताप, सततचा खोकला, थकवा, वास आणि चव कमी होणे आणि काहींमध्ये गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या ही लक्षणं आढळतात.

युकेमधील ZOE करोना अभ्यासीतल प्रमुख शास्त्रज्ञ प्रोफेसर टीम स्पेक्टर यांनी सांगितलं आहे की, “आमच्या डेटानुसार, ओमायक्रॉनची लक्षणे प्रामुख्याने सर्दी, नाक वाहणे, डोकेदुखी, घसा खवखवणे आणि शिंका येणे ही आहेत, त्यामुळे लोकांनी घरीच राहावे”.

“डेल्टाप्रमाणे ओमायक्रॉनमध्येही बूस्टर डोस घेतलेल्या भागांमध्ये प्रमाण दोन ते तीन पट जास्त असून सौम्य संसर्गही पाहण्यास मिळत आहे. पण तरीही करोनाविरोधातील लढाईत हे खूप संरक्षणात्मक आणि महत्वाचं शस्त्र आहे,” असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान जागतिक आऱोग्य संघटनेने ओमायक्रॉनचा धोका कितपत आहे हे चार गोष्टींवर अवलंबून असल्याचं सांगितलं आहे –

  • व्हेरियंटची प्रसारक्षमता किती आहे?
  • अगोदर झालेला संसर्ग आणि लस आणि लागण, प्रसार, रोग आणि मृत्यूपासून किती चांगले संरक्षण करतात?
  • इतर व्हेरियंटच्या तुलनेत किती विषाणूजन्य आहे?
  • गतिशीलता, जोखीम यासंबंधी लोकसंख्येला किती जाणीव आहे? तसंच करोनासंबंधी नियमांचं पालन होत आहे का ?

Story img Loader