ऑस्कर २०२२चा सोहळा सोमवारी पार पडला आहे. पण या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात असे काही घडले जे या पुरस्कार सोहळ्याच्या इतिहासात आजपर्यंत कधीही घडले नाही. कार्यक्रमादरम्यान, अभिनेता विल स्मिथने या सोहळ्याचे सुत्रसंचालन करणाऱ्या क्रिस रॉकला कानाखाली मारली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हे दृश्य पाहून चाहत्यांपासून ते प्रेक्षकांपर्यंत सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. नेहमी शांत दिसणाऱ्या विल स्मिथने असे काहीतरी केले यावर कोणीही विश्वास ठेवू शकत नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
क्रिस रॉक सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार सादर करण्यासाठी मंचावर आला होता. येताच त्याने एक विनोद केला. त्याच्या विनोदाने नाराज झालेल्या विल स्मिथने स्टेजवर जाऊन त्याला कानाखाली मारली. कारण क्रिसने विल स्मिथची पत्नी जॅडाच्या आजारपणाची खिल्ली उडवली.
विल स्मिथच्या पत्नीचे नाव जेडा पिंकेट स्मिथ आहे. ऑस्कर सोहळ्यादरम्यान ती विलसोबत प्रेक्षकांमध्ये बसली होती. यामध्ये अभिनेता-कॉमेडियन क्रिस रॉक स्टेजवर आला. त्याने जेडाची खिल्ली उडवली. क्रिसने जेडाला G.I. Jane २ मध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहे असे यावेळी म्हटले. यावेळी, विल स्मिथ स्टेजवर पोहोचला आणि त्याने क्रिस रॉकला कानाखाली मारली. विल स्मिथने ख्रिसला मारले कारण तो त्याची पत्नी जेडाची चेष्टा करत होता. स्टेजवरून खाली आल्यानंतर विल स्मिथने ख्रिसला ओरडून सांगितले की, त्याच्या तोंडून त्याच्या पत्नीचे नाव घेऊ नको.
जेडाला अलोपेसिया नावाचा आजार आहे, त्यामुळे तिच्या डोक्याचे केस गळत आहेत. तिने पहिल्यांदा २०१८ मध्ये याबद्दल भाष्य केले होते आणि तेव्हापासून तिने सोशल मीडियावर या स्थितीसह जगण्याच्या तिच्या आव्हानांबद्दल माहिती दिली आहे. अंघोळ करताना मूठभर केस हातात आल्यानंतर तिने तिचे केस लहान करण्याचा निर्णय घेतल्याचे तिने सांगितले होते. “माझ्या आयुष्यातील हा एक प्रसंग होता जेव्हा मी अक्षरशः भीतीने थरथर कापत होतो. म्हणूनच मी माझे केस कापले,” असे ती म्हणाली होती.
म्हणूनच क्रिस रॉकने विल स्मिथच्या पत्नीबाबत G.I. Jane २ या चित्रपटाचा उल्लेख केला. या चित्रपटात डेमी मूरने साकारलेले जॉर्डन ओ. नीलचे पात्र टक्कल पडले आहे. ख्रिसने जेडाच्या आजाराची खिल्ली उडवली आणि तिला G.I. Jane २ मध्ये पाहण्याबद्दल भाष्य केले.
विल स्मिथ झाला भावूक
सुरुवातीला चाहत्यांना वाटले की हे सर्व शोच्या स्क्रिप्टचा भाग आहे. पण नंतर काही व्हिडिओ आले ज्यात विलही रडताना दिसत होता, ज्यानंतर चाहत्यांना खात्री पटली की हे सर्व खरोखरच घडले आहे. या घटनेनंतर, एक जाहिरातीचा ब्रेक आला. यावेळी हॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते डेन्झेल वॉशिंग्टन आणि टायलर पेरी विल स्मिथला समजावताना आणि सांत्वन करताना दिसले. यानंतर डेन्झेल विल स्मिथची पत्नी जेडासोबत बोलतानाही दिसला.
क्रिस रॉक एक प्रसिद्ध विनोदी अभिनेता आणि चित्रपट निर्माता आहे. तो ‘बेव्हरली हिल्स कॉप’ आणि ‘मेडागास्कर’ चित्रपट मालिकेचा भाग आहे. क्रिस रॉक १९९० च्या दशकात ‘सॅटर्डे नाईट लाइव्ह’ या आगामी टीव्ही मालिकेमधून प्रसिद्धीच्या झोतात आला. तेव्हापासून, ख्रिस पन्नास टीव्ही मालिकांचा भाग आहे, त्यापैकी बहुतेक कॉमेडी शो आहेत. १९९९ मध्ये, तो विल स्मिथसोबत ‘टोरन्स राइजेस’ नावाच्या मॉक्युमेंटरीमध्ये दिसला होता.
विल स्मिथला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार
विल स्मिथला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. पुरस्कार स्वीकारण्यासाठी तो मंचावर गेले असता त्याने भाषणात माफी मागितली. विल म्हणाला, “मला अकादमीची माफी मागायची आहे. बाकी नामांकन मिळलेल्या लोकांची मला माफी मागायची आहे.”
विल स्मिथने क्रिस रॉकला कानाखाली मारल्याचा मुद्दा इतका मोठा झाला आहे की, पोलिसांनीही या प्रकणाची दखल घेतली आहे. लॉस एंजेलिस पोलिस विभागाने ऑस्कर सोहळ्यादरम्यान घडलेल्या घटनेची माहिती आहे. याबाबत त्यांनी क्रिस रॉकशी संपर्क साधला. मात्र क्रिसने विल स्मिथविरोधात पोलिस तक्रार दाखल करण्यास नकार दिला आहे.