नेपाळची राजधानी काठमांडू येथे पाणीपुरीवर थेट बंदी घालण्यात आली आहे. येथे पाणीपुरीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये कॉलराचे बॅक्टेरिया आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. याच कारणामुळे आरोग्य मंत्रालयाने तत्काळ प्रभावाने पाणीपुरीवर पूर्ण बंदी घातली आहे.
हेही वाचा >>>> विश्लेषण : काय आहे पक्षांतर बंदी कायदा? शिंदे गटाकडून त्याला बगल दिली जातेय?
मागीली काही दिवसांपासून काठमांडू येथे कॉलरा रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. येथील ललीतपूर या भागात एकाच वेळी १२ नागरिकांना कॉलराचा आजार झाल्याचे समोर आले. त्यानंतर या भागात पाणीपुरी विक्रीवर बंदी घालण्यात आली. ललितपूर मेट्रोपॉलिटन सिटीने (एलएमसी) पाणीपुरीबंदीवर माहिती दिली आहे. पाणीपुरीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये कॉलराचे बॅक्टेरिया आढळले आहेत, असे एलएमसीने सांगितले आहे.
हेही वाचा >>>> विश्लेषण : कुठे ५० वर्षांपर्यंत शिक्षा तर कुठे परवानगी; जगभरातील गर्भपाताच्या कायद्यांची परिस्थिती काय?
ललितपूर भागातील पोलीस प्रमुख सीताराम हचेतू यांनी पाणीपुरीबंदीवर पोलिसांनी कोणती तयारी केली आहे, याबाबत माहिती दिली आहे. “गर्दीच्या क्षेत्रात पाणीपुरी विक्रीवर बंदी घालण्यासाठी आम्ही सर्व तयारी केली आहे. शहरात कॉलरा रोग पसरण्याचा धोका वाढला असल्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे,” असे हचेतू यांनी सांगितले आहे.
पाहा व्हिडीओ –
हेही वाचा >>>> विश्लेषण : अमरनाथ यात्रेसाठी अभुतपूर्व सुरक्षा व्यवस्था
आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या एपिडमोलॉजी आणि रोग नियंत्रण विभागाचे संचालक चुमानलाला दास यांनी सांगितल्या प्रमाणे काठमांडू महानगरातीस पांट आण चंद्रगिरी नगरपालिका क्षेत्र तसेच बुधनिलकांठा नगरपालिका क्षेत्रात प्रत्येकी एक कॉलराग्रस्त रुग्ण आढळला आहे. पावसाळ्यामध्ये अतिसार, कॉलरा तसेच पाण्याच्या माध्यमातून अनेक रोग पसरतात. याच कारणामुळे मंत्रालयाने या परिसरातील लोकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा >>>> विश्लेषण : तिस्ता सेटलवाड, बी. श्रीकुमार, संजीव भट्ट यांच्या चौकशीसाठी गुजरात एसआयटी कशासाठी?
दरम्यान, सध्या कॉलराची बाधा झालेल्या रुग्णांवर टेकू येथील सुकरराज ट्रॉपिकल अँड इंफेक्शियस डिसिस या रुग्णालयात उपचार केला जातोय. याआधी नेपाळची राजधानी काठमांडू येथे वेगवेगळ्या पाच ठिकाणी कॉलराचे पाच रुग्ण आढळले होते. संग्रमित रुग्णांपैकी दोघे कॉलरामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आले आहे. तसेच कॉलरासारखी लक्षणं दिसताच जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.