लखनऊमध्ये पिटबुल जातीच्या श्वानाने आपल्याच मालकिणीवर जीवघेणा हल्ला केला. श्वानाने ८० वर्षीय सुशीला यांच्यावर ज्याप्रकारे हल्ला केला ते जाणून प्रत्येकजण हादरला आणि घाबरला आहे. या श्वानाने सुशीला यांच्या शरीराचे तासभर लचके तोडल्याचे शेजारी सांगत आहेत. त्याने सुशीला यांचे पोटही फाडले आणि मांसही बाहेर काढले. यामुळे अनेकांना धक्काच बसला आहे. त्यामुळे आता अशा जातीच्या श्वानाला घरात ठेवणे योग्य आहे का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

पिटबुल श्वानाने ८० वर्षीय सुशीला त्रिपाठी यांच्यावर भयानक हल्ला केला. पिटबुलने सुशीला यांच्या शरीराचे अक्षरशः लचके तोडले. त्यामुळे या पिटबुलमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण आहे. उत्तर प्रदेशातील लखनऊच्या कैसरबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घडना घडली. गच्चीत फिरवण्याच्या उद्देशानं ही महिला पाळवी पिटबुल श्वानाला घेऊन गेली होती. त्यावेळी थरारक घटनेत या श्वानानं वृद्धेवर हल्ला चढवला.

minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
sushma andhare
Sushma Andhare: ‘केलंय काम भारी’वरून अंधारेंचा हल्लाबोल, अंबरनाथच्या सभेत आमदार किणीकरांसह शिंदे गटातील गटबाजीवरही बोट
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……
stepfather rape daughter
मुंबई: अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या, मानखुर्दमधील धक्कादायक घटना
bombay hc reject builder bail over illegal housing projects
बेकायदा गृहप्रकल्प राबवणाऱ्यांवर कारवाई गरजेची; विकासकांना जामीन नाकारताना उच्च न्यायालयाची टिप्पणी
Balu Dhanorkar mother, Vatsala Dhanorkar claim,
खळबळजनक! खासदार बाळू धानोरकरांचा घातपात, आईच्या दाव्याने शंका कुशंका
Eknath shinde
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या कामांना कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात किती मार्क्स? काय म्हणत आहेत ठाणेकर?

दोन जातींच्या मिश्रणातून बनवलेला पिटबुल

पिटबुल हा इंग्लिश श्वान आहे. १९ व्या दशकाच्या उत्तरार्धात श्वानाची ही जात विकसित करण्यात आली. पिटबुलची निर्मिती बुल अ‍ॅण्ड टेरियर डॉग आणि अमेरिकन बुली टाईप डॉग यांच्या मिलनातून करण्यात आली होती. इंग्लंड आणि इतर काही देशांमध्ये याला ‘अमेरिकन पिटबुल टेरियर’ म्हणूनही ओळखले जाते. स्टॅफोर्डशायर फायटिंग डॉग, बुल बेटर डॉग, यँकी टेरियर आणि रिबेल टेरियर अशी त्याची इतर नावे आहेत.

पिट बुल टेरियर्स त्यांच्या चपळता, स्नायुशक्ती आणि मजबूत जबड्यांसाठी ओळखले जातात. यामुळेच ते कुप्रसिद्धही आहेत. पिटबुलच्या धाडसी आणि कधीही हार न मानणाऱ्या स्वभावामुळे त्याला एक उत्तम लढाऊ श्वान म्हटले जाते. म्हणूनच श्वानांच्या लढाईच्या खेळांसाठी हा सर्वात आवडता श्वान मानला जातो. काही देशांमध्ये, पिटबुल्सचा वापर फक्त याच उद्देशांसाठी केला जातो. या कारणांमुळे, पिटबुल हा पाळण्यासाठी अतिशय धोकादायक श्वान असल्याचे म्हटले जाते. काही देशांमध्ये पिटबुल श्वानांचे पालन, व्यापार आणि प्रजननावर पूर्णपणे बंदी आहे.

पिटबुलवर बंदी कुठे आहे?

लल्लनटॉपच्या वृत्तानुसार जगातील प्रमुख देशांपैकी एक असलेल्या इंग्लंडमध्ये पिटबुल श्वानांवर पूर्णपणे बंदी आहे. याशिवाय जगभरातील सुमारे ३० देशांमध्ये पिटबुलवर एकतर पूर्णपणे बंदी आहे किंवा अनेक प्रकारचे निर्बंध आहेत. माध्यमांच्या वृत्तानुसार, या देशांमध्ये न्यूझीलंड, बेल्जियम, फ्रान्स, डेन्मार्क, पोलंड, फिनलंड आणि नॉर्वे या देशांचा समावेश आहे.

पिटबुलच्या माणसांवरील हल्ल्याच्या सर्वाधिक घटना अमेरिकेत पाहायला मिळतात. परंतु त्यावर कोणतीही बंदी नाही. मात्र त्याच्या शेजारच्या कॅनडातील अनेक शहरांमध्ये पिटबुलवर बंदी आहे. या प्रजातीच्या श्वानावर २०१८ सालापर्यंत पोर्तो रिकोमध्ये बंदी घालण्यात आली होती, मात्र आता ते निर्बंध हटवण्यात आले आहेत. भारतातही पिटबुलवर बंदी नाही.

उत्तर प्रदेशात लखनऊ महानगरपालिकाने श्वान परवाना नियंत्रण आणि नियमन उपविधी २००३ नावाने श्वान पाळण्यासाठी एक नियमावली जारी केली आहे. या नियमावलीनुसार, ज्या लोकांना श्वान पाळण्याची आवड आहे त्यांनी अनेक अटींचे पालन केल्यानंतर अनिवार्यपणे परवाना घेणे आवश्यक आहे. नियमावलीनुसार कोणत्याही व्यक्तीने आपल्या श्वानाला शेजाऱ्याचा काही आक्षेप नसेल अशा प्रकारे पाळावे.

पिटबुलवर बंदी का घालण्यात आली?

एका वर्षात एकाच प्रजातीचे श्वान किती लोकांना चावतात, श्वानांची प्रवृत्ती काय आहे? ते मानवासाठी अधिक हल्लेखोर आहेत का? बेकायदेशीर कारणांसाठी श्वानांचा वापर केला जातो का? मिश्र जातीच्या श्वानांच्या वर्तनामुळे प्राणी किंवा मानवाला इजा होण्याची शक्यता जास्त आहे का? या निकषांवर कोणत्याही देशात श्वानांवर बंदी घातली जाते.

अहवालानुसार, अमेरिकेतील सुमारे ४८ टक्के लोक कुत्रे पाळतात. त्याच वेळी, इंग्लंडमधील २६ टक्के लोकांना हा छंद आहे. वेगवेगळ्या अहवालांच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की अमेरिकेत दरवर्षी सुमारे ४५ लाख श्वान चावण्याच्या घटना घडतात. यापैकी ८० हजार प्रकरणे अशी आहेत, ज्यात एखादी व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. अशा वेळी काही आकडेवारी ही पिटबुल पाळण्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण करतात.

१९९७-९८ मध्ये अमेरिकेत श्वान चावल्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्या लोकांपैकी ६७ टक्के लोक हे रॉटव्हीलर आणि पिटबुल चावल्यापैकी होते. याशिवाय अमेरिकेतील आणखी एक धक्कादायक आकडेवारी सांगते की १९८१ ते १९९२ या काळात कुत्रा चावल्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्या ६० टक्के लोकांवर पिटबुलने हल्ला केला होता.