राष्ट्रपती हा देशाचा प्रथम नागरिक असतो असे म्हटले जाते. भारताचे विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ या महिन्यात संपत आहे. नवीन राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची तयारी सध्या जोरात सुरू आहे. २४ जुलैपर्यंत देशाच्या १५ व्या राष्ट्रपतींचे नाव समोर येईल. यासोबतच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या निवृत्तीचीही तयारी सुरू आहे. राष्ट्रपती निवृत्तीनंतर कुठे राहतात, त्यांना किती अधिकार आणि सुविधा मिळतात, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, तर जाणून घेऊयात अशा सर्व प्रश्नांची उत्तरे –
राष्ट्रपती कोविंद यांना मिळू शकतो हा बंगला –
मीडिया रिपोर्ट्सनुसार, राष्ट्रपती राम नाथ कोविंद निवृत्तीनंतर राजधानी दिल्लीतील १२ जनपथ येथील निवासस्थानी स्थलांतरित होऊ शकतात. ल्यूटेन्स दिल्लीतील हा सर्वात मोठा बंगला आहे. माजी मंत्री रामविलास पासवान ज्या बंगल्यात राहत होते ते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे नवीन निवासस्थान असण्याची शक्यता आहे.
कोणत्या सुविधा मिळतात? –
प्रेसिडेंट एलिमेंट्स अॅक्ट-१९५१ नुसार भारताच्या राष्ट्रपतींना निवृत्तीनंतरही अनेक सरकारी सुविधा मिळतात
-मासिक पेन्शन
-सुसज्ज सरकारी बंगला
-दोन सचिव आणि दिल्ली पोलिसांची सुरक्षा
-पाच वैयक्तिक कर्मचारी
-२ लँडलाईन, १ मोबाईल आणि १ इंटरनेट कनेक्शन
-मोफत पाणी आणि वीज
-कारसाठी महिन्याला २५० लिटर पेट्रोल
-मोफत वैद्यकीय सुविधा
-कार आणि ड्रायव्हर्स
-मोफत लाइफ टाइम ट्रेन आणि फ्लाइट तिकीट
राष्ट्रपतींच्या पत्नीला रु.३०,००० चे सचिवीय सहाय्य
१८ जुलै रोजी मतदान
भारताच्या पुढील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी १८ जुलै रोजी मतदान होणार असून मतमोजणी २१ जुलै रोजी होणार आहे. यामध्ये भाजपाकडून द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरीकडे विरोधी पक्षाकडून यशवंत सिन्हा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ९८ जणांनी फॉर्म भरला होता. यापैकी केवळ दोन उमेदवारांचे अर्ज योग्य आढळून आले आहेत. उर्वरित ९६ जणांचे अर्ज रद्द करण्यात आले.