पश्चिम बंगालनंतर आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनीबी राजधानी दिल्लीत प्रजासत्ताक दिनी राज्याचा चित्ररथ काढून टाकण्यावरुन पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे. स्टॅलिन यांनी या चित्ररथ समावेश करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे. तामिळनाडूच्या चित्ररथामध्ये सुब्रमण्यम भारती, व्हीओ चिदंबरनार, वेलू नचियार, मारुथ पंडियार, यांचा समावेश होता. याआधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी पश्चिम बंगालचा चित्ररथ कोणतीही कारणे न सांगता नाकारण्यात आल्याने मला खूप धक्का बसला आहे, असे म्हटले होते. नेताजी सुभाषचंद्र बोस आणि त्यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी हा चित्ररथ तयार करण्यात आला होता, असे ममतांनी त्यांच्या पत्रात नमूद केले होते.
सरकारने परेडसाठी निवडलेली अंतिम चित्ररथ अद्याप जाहीर करणे बाकी असताना, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परेडमध्ये २१ चित्ररथ असतील. ज्यामध्ये १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आणि केंद्र सरकारच्या अंतर्गत नऊ विभाग किंवा स्वतंत्र संस्थांची कपात केली आहे.
राज्य अधिकार्यांच्या मते, पश्चिम बंगाल हे एकमेव राज्य नाही ज्याचा चित्ररथ नाकारला गेला आहे. श्री नारायण गुरूची केरळमधील प्रस्तावित चित्ररथही निवडलेला नाही. निवड तज्ञ समितीद्वारे केली जाते आणि त्यात कोणताही राजकीय सहभाग नाही, अशी प्रतिक्रिया संरक्षण मंत्रालयाचे अधिकारी, ज्यांच्यावर परेडची जबाबदारी आहे त्यांनी दिली आहे. राजकीय वाद वाढत असताना, कृष्ण कौशिक यांनी हे कसे डिझाइन केले आणि निवडले जाते हे स्पष्ट केले आहे.
चित्ररथ ठरवण्याची प्रक्रिया कधी सुरू होते आणि कोण सहभागी होऊ शकते?
दरवर्षी सप्टेंबरच्या सुमारास संरक्षण मंत्रालय, ज्यांच्यावर प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी आणि सोहळ्यासाठी जबाबदारी असते, सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेश, केंद्र सरकारचे विभाग आणि काही संवैधानिक अधिकार्यांना या परेडमध्ये सहभागी होण्यासाठी चित्ररथाद्वारे आमंत्रित करते.
संरक्षण मंत्रालयाने ८० केंद्रीय मंत्रालये आणि विभाग, सर्व ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या सचिवांमार्फत आणि निवडणूक आयोग आणि नीती आयोग यांना १६ सप्टेंबर रोजी पत्र लिहून त्यांना सहभागी होण्याचे आमंत्रण दिले होते. पत्रातमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागासाठी चित्ररथाचा प्रस्ताव आमंत्रित करण्याची प्रक्रियेबाबत भाष्य केले होते. त्यानंतर २७ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करायचे होते आणि ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात प्रस्तावांची निवड प्रक्रिया सुरू झाली.
सहभागी राज्ये किंवा केंद्र सरकारचे विभाग त्यांच्या चित्ररथाद्वारे काही चित्रण करू शकतात का?
सर्वसमावेशक थीममध्ये सहभागींना त्यांच्या राज्य/ केंद्रशासित प्रदेश/ विभागाशी संबंधित घटक दाखवावे लागतील. या वर्षी सहभागींना दिलेली थीम भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे होती. सरकारने इच्छुक सहभागींना भारत ७५, स्वातंत्र्य संग्राम, कल्पना, कृती आणि निराकरण यावर आधारीत चित्ररथ तयार करण्यास सांगितले होते.
संरक्षण मंत्रालय सर्व चित्ररथांमध्ये काय समाविष्ट करू शकते किंवा काय असावे याबद्दल मूलभूत मार्गदर्शक तत्त्वे देखील दिली होती. सहभागी घटक “प्रसिद्ध संस्थांमधील तरुण पात्र डिझायनर” असावेत. प्रतिमा किंवा सामग्रीच्या चमकदार प्रदर्शनासाठी इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले भिंती, रोबोटिक्स किंवा मेकॅट्रॉनिक्स वापरून हलणारे घटक, थ्रीडी प्रिंटिंग काही घटकांसाठी वापरले जाऊ शकते, असे यामध्ये सांगण्यात आले होते.
दोन भिन्न राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे चित्ररथ फारसे सारखे असू शकत नाही, कारण या चित्ररथांमध्ये देशाची विविधता दाखवली पाहिजे. राज्य/केंद्रशासित प्रदेश/विभागाच्या नावाशिवाय, समोरच्या बाजूला हिंदी, मागे इंग्रजी आणि बाजूला प्रादेशिक भाषा लिहिल्या जाव्यात. याशिवाय, चित्ररथामध्ये कोणतेही लिखाण किंवा लोगोचा वापर असू शकत नाही.
संरक्षण मंत्रालयाने सहभागींना चित्ररथासाठी पर्यावरणास अनुकूल सामग्री वापरण्यास आणि प्लास्टिक किंवा प्लास्टिक-आधारित उत्पादनांचा वापर टाळण्यास सांगितले.
चित्ररथ कसे निवडले जातात?
ही निवड प्रक्रिया विस्तृत आणि वेळखाऊ आहे. संरक्षण मंत्रालयाने कला, संस्कृती, चित्रकला, शिल्पकला, संगीत, वास्तुकला, नृत्यदिग्दर्शन इत्यादी क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींची एक तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे, जी प्रस्तावांमधून चित्ररथ निवडण्यास मदत करते.
ज्या चित्रांमध्ये किंवा डिझाइनमध्ये बदलासाठी सूचना देऊ शकता येतात अशांची तपासणी समितीकडून केली जाते. रेखाटन सोपे, रंगीत, समजण्यास सोपे असावे आणि अनावश्यक तपशील टाळण्यास सांगितले जाते. यामध्ये कोणत्याही लेखी विस्ताराची आवश्यकता नसावी अशीही सूचना केली जाते. चित्ररथामध्ये पारंपारिक नृत्य असल्यास ते लोकनृत्य असावे आणि वेशभूषा आणि वाद्ये पारंपारिक आणि अस्सल असावीत. प्रस्तावात नृत्याचा व्हिडिओ समाविष्ट करावा असेही सांगितले जाते.
एकदा मंजूर झाल्यानंतर, पुढील टप्पा म्हणजे सहभागींनी त्यांच्या प्रस्तावांसाठी त्रिमितीय मॉडेल्स आणणे, जे अनेक निकष लक्षात घेऊन अंतिम निवडीसाठी तज्ञ समितीद्वारे पुन्हा तपासले जातात. अंतिम निवड करताना समिती इतर घटकांसह दृश्य अपील, जनमानसावर होणारा परिणाम, चित्ररथाची कल्पना/ थीम, संगीत सोबत या घटकांचे नियोजन पाहते. समिती ज्यांना निवडले आहे, त्यांनाच पुढील फेरीची माहिती देते. त्यानंतर सहभागाचे निमंत्रण पत्र दिले जाते.