पश्चिम बंगालनंतर आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनीबी राजधानी दिल्लीत प्रजासत्ताक दिनी राज्याचा चित्ररथ काढून टाकण्यावरुन पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे. स्टॅलिन यांनी या चित्ररथ समावेश करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे. तामिळनाडूच्या चित्ररथामध्ये सुब्रमण्यम भारती, व्हीओ चिदंबरनार, वेलू नचियार, मारुथ पंडियार, यांचा समावेश होता. याआधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी पश्चिम बंगालचा चित्ररथ कोणतीही कारणे न सांगता नाकारण्यात आल्याने मला खूप धक्का बसला आहे, असे म्हटले होते. नेताजी सुभाषचंद्र बोस आणि त्यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी हा चित्ररथ तयार करण्यात आला होता, असे ममतांनी त्यांच्या पत्रात नमूद केले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा