रशिया-युक्रेन युद्धाला आता सहा महिन्यांहून अधिकचा काळ लोटला आहे. मात्र, दिवसेंदिवस हे युद्ध आणखी तीव्र होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, रशियाने आता युक्रेनवर गंभीर आरोप केले आहेत. युक्रेन युद्धात ‘डर्टी बॉम्ब’ वापरण्याच्या तयारीत असल्याचा दावा रशियाने केला आहे. मात्र, हा दावा युक्रेनने फेटाळून लावला आहे. मुळात युक्रेन आपल्याच भागात अशा स्पोटकांचा वापर करेल, ही कल्पनाच मूर्खपणाची असल्याचे युक्रेनकडून सांगण्यात येत आहे. मात्र, हा ‘डर्टी बॉम्ब’ नेमका काय आहे? आणि त्याने नेमकं काय नुकसान होतं? जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – विश्लेषण: पाकिस्तानी पत्रकाराच्या मृत्यूचं गूढ; अर्शद शरीफ नैरोबीत कसे पोहोचले? नेमकं काय आहे प्रकरण?

‘डर्टी बॉम्ब’ काय असतो?

‘डर्टी बॉम्ब’मुळे अणुबॉम्बसारखे नुकसान होत नसले, तरी हा बॉम्ब धोकादायक आहे. या बॉम्बमध्ये किरणोत्सारी घटकांचा वापर करण्यात येतो. स्फोटानंतर हे विषारी घटक हवेत पसरतात. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार या ‘डर्टी बॉम्ब’मधील किरणोत्सारी घटकांचा मानवाच्या शरीरावर तत्काळ प्रभाव होण्याची शक्यता कमी आहे. जोपर्यंत नागरिकांना या किरणोत्सारी घटकांचा प्रभाव जाणवेल, त्यापूर्वी अनेक जण ती जागा सोडून दुसरीकडे जाऊ शकतात.

हेही वाचा – विश्लेषण: बछड्यांना वाचवण्यासाठी मिलनाचा मार्ग पत्करणारी ताडोबातली वाघीण… निसर्गात असे नेहमीच घडते का?

रशियाने नेमके काय आरोप केले आहेत?

रशियाने सोमवारी संयुक्त राष्ट्रातील देशांना एक पत्र लिहिले. या पत्रात त्यांनी युक्रेनवर गंभीर आरोप केले आहेत. युक्रेनकडून ‘डर्टी बॉम्ब’चा वापर होण्याची शक्यता असल्याचे रशियाने म्हटले आहे. तसेच हा मुद्दा संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत उपस्थित करणार असल्याचेही रशियाकडून सांगण्यात आले आहे. रशियाचे आण्विक, जैविक आणि रासायनिक संरक्षण दलाचे प्रमुख, लेफ्टनंट जनरल इगोर किरिलोव्ह माध्यमांशी बोलताना म्हणाले, ”अशाप्रकारे हल्ला करून रशियाला जबाबदार धरण्याचा युक्रेनचा प्रयत्न आहे. तसेच जगात रशियाविरोधी वातावरण तयार करण्याचा हा डाव आहे.”

हेही वाचा – विश्लेषण : धनलक्ष्मी बँकेचे भागधारक आणि संचालक मंडळातील वाद नेमका काय? ‘आरबीआय’ने का केले आहे लक्ष केंद्रित?

रशियाच्या आरोपाला युक्रेनचे प्रत्युत्तर

युक्रेन या युद्धात ‘डर्टी बॉम्ब’ वापरण्याच्या तयारीत असल्याचा रशियाचा दावा युक्रेन आणि त्याच्या सहयोगीदेशांनी फेटाळून लावला आहे. रशियाने ताब्यात घेतलेला भाग जेव्हा युक्रेन परत मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशावेळी त्या भागात युक्रेन या स्फोटकांचा वापर करेल, ही कल्पनाच मुळात मूर्खपणा असल्याचे युक्रेनच्या सहयोगी देशांनी म्हटलं आहे. तर युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी आरोपाचे प्रत्युत्तर देताना हा रशियाचा युक्रेनला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.