“करोनाच्या साथीचा प्रादुर्भाव जगभरामध्ये मागील १८ महिन्यांपासून सुरु आहे. मागील १८ महिन्यांपासून जगाच्या कानाकोपऱ्यातील देश या महासाथीचा सामना करत आहेत. मात्र करोना ची ही साथ कधी आणि कशी थांबणार?, हे प्रश्न अनुत्तरितच आहेत. काही तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार करोना कधीच नष्ट होणार नाही. ही जरी थोडी वाईट बातमी असली तरी दुसरीकडे चांगली बातमी ही आहे की आपल्याला करोना सोबत जगता येईल.”

वरील शब्द आहेत सिंगापूरचे व्यापार मंत्री गान किम योंग, अर्थमंत्री लॉरेन्स वोंग आणि आरोग्यमंत्री ओंग ये कुंग यांनी स्ट्रेट्स टाइम्ससाठी लिहिलेल्या संपदाकीय लेखामधील. या संपादकीय लेखाची सध्या जगभरामध्ये चर्चा आहे. या लेखाची जगभरामध्ये दखल घेण्याचं कारण म्हणजे आतापर्यंत करोनाशी अगदी सक्षमपणे दोन हात करणाऱ्या सिंगापूरने आपली करोना संदर्भातील धोरणं बदलली आहेत. सिंगापूर सरकार आता करोनाला एखाद्या सामान्य तापाप्रमाणे किंवा सर्दी-खोकल्याच्या आजाराप्रमाणे समजून त्यावर उपचार करणार आहे.

uddhav thackeray emotional appeal impact to voters
उद्धव यांचे भावनिक आवाहन ठाकरे सेनेला कितपत तारणार? मराठवाड्याकडे विशेष लक्ष?
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Deputy Chief Minister Devendra Fadnavis announced that will waive off the loans of farmers after mahayuti govt
“शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
traffic cleared due to police planning in Pune print news
पाेलिसांच्या नियोजनामुळे वाहतूक सुरळीत-पंतप्रधानांच्या सभेसाठी कडक बंदोबस्त
nitin gadkari
Nitin Gadkari: ‘भाजपाचं पिक वाढलंय, त्यावरही फवारणी करण्याची गरज’, नितीन गडकरींचा इशारा कुणाकडे?
assembly seats in cities near mumbai important for mahayuti
मुंबईलगतची महानगरे विधानसभेतही  शिंदे-फडणवीसांना साथ देणार का? येथील जागा महायुतीसाठी महत्त्वाच्या का?
Devendra Fadnavis Dharni, Chikhaldara Skywalk Work,
‘चिखलदरा स्‍कायवॉकचे काम महाविकास आघाडीने थांबविले’, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणीसांचा आरोप
devendra fadnavis assured to farmers if rate is less than guaranteed price government will pay difference
“हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्यास फरकाची रक्कम सरकार देणार,” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्‍वासन

नक्की वाचा >> समजून घ्या : नाक, घशातून स्वॅब घेण्याऐवजी आता स्मार्टफोन स्क्रीनच्या मदतीने शोधणार करोना पॉझिटिव्ह रुग्ण

सिंगापूरने नक्की नवीन धोरणामध्ये काय बदल केले आहेत? जगातील अन्य देश ‘न्यू नॉर्मल’ म्हणत करोनासोबत जगण्याची तयारी कशापद्धतीने करत आहेत? कोणत्या देशांमध्ये नियम शिथील करण्यात आलेत आणि कोणत्या देशांनी शाळाही सुरु केल्यात याचवरच टाकलेली ही नजर…

सिंगापूरमध्ये करोनाच प्रादुर्भाव किती?

२३ जानेवारी २०२० रोजी सिंगापूरमध्ये करोनाचा पहिला रुग्ण आढलून आला. एप्रिलपर्यंत देशात रोज ६०० हून अधिक करोना रुग्ण आढळून येत होते. ऑगस्ट २०२० मध्ये करोनाची एक छोटी लाट येऊन गेल्यानंतर देशात फार मोठ्याप्रमाणात करोनाचा प्रादुर्भाव झाला नाही आणि रुग्णसंख्याही वाढली नाही. अर्थात ५७ लाख लोकसंख्या अशणाऱ्या सिंगापूरमध्ये रोज २० ते ३० करोना रुग्ण आढलून येत आहेत. देशात करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या अवघी ३६ इतकी आहे.

नक्की वाचा >> Explained: संसर्गाची लाट म्हणजे काय? ती कशी येते? तिसरी लाट टाळता येणं शक्य आहे का?

जगातील सर्वोत्तम देशांपैकी एक तरी…

करोना मृतांच्या संख्येवरुनच सिंगापूर हा जगामध्ये करोनाविरुद्धचा लढा सक्षमपणे आणि प्रभावी मार्गाने लढणाऱ्या देशांच्या यादीत आघाडीच्या देशांपैकी एक आहे. सिंगापूरमध्ये जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची करोना चाचणी केली जाते, त्याला हॉटेल क्वारंटाइन, होम आयसोलेशनसारख्या नियमांचं पालन करावं लागतं. मात्र असं असलं तरी आता सिंगापूरने करोनासोबत जगण्याच्या दिशेने धोरणात्मक बदल करत पहिलं पाऊल टाकलं आहे.

आपण या आजाराला संपूर्णपणे संपवू शकत नाही. मात्र…

सिंगापूरने कोव्हिड १९ मल्टी मिनिस्ट्री टास्क फोर्स तयार केलाय. म्हणजेच अनेक मंत्रालयांचे प्रमुख मंत्री या टास्क फोर्समध्ये असून त्यांनीच या धोरणांसंदर्भात निर्णय घेतलाय. या टास्क फोर्समधील मंत्र्यांनीच लिहिलेल्या या लेखात दरवर्षी अनेकांना फ्लू होतो. या रुग्णांपैकी खूप मोठ्याप्रमाणातील रुग्ण हे रुग्णालयात दाखल न होताच ठणठणीत बरे होतात, असं म्हटलं आहे. आपण या आजाराला संपूर्णपणे संपवू शकत नाही. मात्र या धोकादायक आजाराला आपण इन्फुएन्झा आणि गोवर, कांजण्यांसारख्या सामान्य आजारांप्रमाणे समजून त्यावर उपचार करु शकतो. आता आपल्याला या आजारासोबत जगण्याची सवय लावली पाहिजे, असंही या संपदकीय लेखात म्हटलं आहे.

नक्की वाचा >> समजून घ्या : लस घेतल्यानंतर नक्की किती दिवसांनी करोना संसर्गाचा धोका कमी होतो

सिंगापूरचे नवीन धोरण काय?

> झिरो ट्रान्समिशन धोरण रद्द केलं

> प्रवाशांसाठी असणारं क्वारंटाइन धोरण रद्द करण्यात आलं.

> संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांना आयसोलेट करणार नाही.

> करोनाबाधितांची आकडेवारी रोज जाहीर केली जाणार नाही.

> प्रकृती चिंताजनक असणाऱ्यांचीच विशेष काळजी घेतली जाणार

> मोठे कार्यक्रम आणि आंतरराष्ट्रीय प्रवासाला परवानगी देण्यात येणार

> ऑगस्टपर्यंत देशातील दोन तृतीयांश लोकसंख्येचं लसीकरण पूर्ण करणार. (माहिती सौजन्य : स्टॅटिस टाइम्स)

नक्की वाचा >> Explained : लसींच्या दोन डोसमधील अंतर वाढलं तर काय होतं?; त्याचे दुष्परिणाम होतात का?

इतर देशही अनलॉक…

सिंगापूरप्रमाणेच इतर देशांनाही आपल्या सीमा सुरु केल्यात. भारतामध्येही जवळजवळ सर्व राज्यांनी लॉकडाउनचे निर्बंध शिथिल केलेत. रोज जवळजवळ ५० हजारांच्या आसपास रुग्ण आढळून येत असतानाच करोना पूर्व काळाप्रमाणे व्यवहार सुरुळीत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र भारताने आंतरराष्ट्रीय प्रवासावर निर्बंध कायम ठेवले आहेत. आपण अशा काही देशांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी आपल्या सीमा खुल्या केल्या असून करोनाला आता ते न्यू नॉर्मल मानून जगू लागलेत…

१) बहरीन : लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींना बरहीनमध्ये गेल्यानंतर करोना चाचणी करण्याची गरज लागणार नाही. या प्रवाशांना देशामध्ये प्रवेश केल्यावर बी अवेअर नावेच एक अॅप डाऊनलोड करुन त्यावर लसीकरण प्रमाणपत्र अपलोड करावं लागणार आहे.

२) मालदीव : पर्यटनाला चालना देण्यासाठी मालदीवने लसीकरण मोहीम सुरु केलीय. यामध्ये पर्यटकांना देशाला भेट देण्याबरोबर लसीकरण आणि सुट्ट्यांचा आनंद घेता येणारे थ्री इन वन पॅखेज देण्यात आलं आहे. म्हणजेच सहलीदरम्यान पर्यटकांना लसीकरणही करुन घेता येणार आहे. सध्या दक्षिण आशियातील अनेक देशांमध्ये पर्यटकांवर निर्बंध लादण्यात आलेत.

३) थायलंड : येथील पर्यटन आणि आरोग्य विभागाने एक जुलैपासून लस घेतलेल्या लोकांना क्वारंटाइन आणि आरटी – पीसीआर चाचण्यांमधून सूट दिली आहे.

४) रशिया : जगभरातील पर्यटकांसाठी रशियाने आपल्या देशाची दारं पुन्हा उघडली आहेत. मात्र येथे जाण्याआधी पर्यटकांना करोना निगेटीव्ह रिपोर्ट दाखवावा लागणार आहे.

नक्की वाचा >> Positivity Rate म्हणजे काय? तो इतका का महत्वाचा असतो?

५) आइसलॅण्ड : या देशानेही पर्यटकांच्या स्वागताची तयारी सुरु केलीय. मात्र पर्यटकांना लसीकरण प्रमाणपत्र, करोना निगेटीव्ह रिपोर्ट दाखवणं बंधनकारक आहे. देशाच्या सीमेवरही करोना चाचणी केली जाणार आहे. रिपोर्ट निगेटीव्ह आल्यास पर्यटकांना क्वारंटाइन व्हावं लागणार नाही.

६) इजिप्त : पर्यटकांची आरोग्य तपासणी केली जाणार. त्यांच्याकडून हेल्थ डिक्लेरेशन फॉर्म भरुन घेतला जाईल. त्यानंतर त्यांना क्वारंटाइन आणि करोना निगेटीव्ह रिपोर्टच्या नियमांमधून सूट मिळेल.

७) अफगाणिस्तान : येथे येणाऱ्या पर्यटकांना आरटी पीसीआर चाचणी बंधनकारक असणार नाही. मात्र प्रवाशांना १४ दिवस सेल्फ क्वारंटाइनमध्ये राहण्यास सांगण्यात येतं.

८) मॉरिशियस : आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी १५ जुलैपासून या देशात प्रवेश दिला जाणार आहे. पहिल्या फेजमध्ये लसीकरण झालेल्या पर्यटकांना प्रवेश दिला ाजणार आहे. २० जून पासून करोना सेफ रिसॉर्टच्या यादीतील हॉटेल्सची बुकींग सुरु करण्यात आली आहेत. दुसऱ्या फेजमध्ये काही शिथिल नियमांच्या आधारे पर्यटकांना प्रवेश दिला जाईल.

९) सेशेल्स : लसीकरण पूर्ण झालेल्या लोकांसाठी सेशेल्सने आपल्या आंतरराष्ट्रीय सीमा खुल्या केल्या आहेत. मात्र पर्यटकांना कोरना निगेटीव्ह रिपोर्ट दाखवावा लागणार आहे. तसेच पर्यटकांना आरोग्य विमा बंधनकारक असणार आहे.

१०) ग्रीस : १४ मे पासून या देशाने पर्यटकांना प्रवेश देण्या सुरुवात  केलीय. सध्या युरोपियन महासंघातील देशांबरोबरच अमेरिका, युके आणि इस्त्रायलमधील लसीकरण पूर्ण झालेल्या पर्यटकांना परवानगी देण्यात आलीय. लवकरच इतर देशातील पर्यटकांनाही प्रवेश दिला जाणार आहे.

नक्की वाचा >>  समजून घ्या : Long Covid म्हणजे काय आणि त्यावर कशी मात करता येते?

११) ऑस्ट्रिया : करोनाचा फटका बसल्यानंतर ऑस्ट्रियाने १९ मेपासून नवीन धोरणांनुसार करोना नियंत्रणाला सुरुवात केली. त्यांनी सध्या युरोपीयन महासंघातील देश, न्यूझीलंड, सिंगापूर आणि दक्षिण कोरियामधील पर्यटकांना प्रवेश देण्यास सुरुवात केलीय.

या २६ देशांनी केल्या सुरु शाळा

मॅक्सिको, व्हेनेझुएला, पेरु, म्यानमार या देशांनी पूर्णपणे शाळा सुरु केल्यात.

तर काही प्रमाणामध्ये शाळा सुरु करणाऱ्या देशांमध्ये फ्रान्स, युनायटेड किंग्डम, ग्रीनलॅण्ड, कॅनडा, अमेरिका, ब्राझील, अर्जेंटीना, फिनलॅण्ड, ईराण, अल्जेरिया, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, भारत, कंबोडिया, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, फिलिप्न्स, चीन, रशिया, कझाकिस्तान या देशांचा समावेश आहे. (माहिती सौजन्य : युनिस्को, कोव्हीड एज्युकेश रिक्व्हरीवरुन साभार)