उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यांची धाकटी सून अपर्णा यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर यादव कुटुंबातील राजकीय कलह पुन्हा एकदा उघड झाला. अखिलेश यादव यांना आता याबद्दल उत्तरे द्यावी लागतील.‌

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कोण आहेत अपर्णा यादव?

अपर्णा यादव या मुलायमसिंह यादव यांच्या दुसऱ्या पत्नीचे पुत्र व अखिलेश यादव यांचे सावत्र भाऊ प्रतीक यादव यांच्या पत्नी आहेत. प्रतीक यादव यांना राजकारणात फारसा रस नसला तरी अपर्णा यादव यांची राजकीय महत्त्वाकांक्षा जगजाहीर आहे. मागील विधानसभा निवडणुकीत अपर्णा यांना समाजवादी पक्षाने लखनऊ कॅंट या मतदारसंघात उमेदवारी दिली. खुद्द मुलायमसिंह यादव यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही अपर्णा यादव यांचा भाजपच्या लाटेत पराभव झाला.

UP Election : अपर्णा यादव यांच्या भाजपा प्रवेशावर अखिलेश यांनी व्यक्त केला आनंद; म्हणाले, “त्यांना प्राणी आवडतात त्यामुळे..”

अपर्णा यादव यांच्या नाराजीचे कारण काय?

अपर्णा यादव यांनी उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर यादव कुटुंबापासून राजकीय फारकत घेतल्याने समाजवादी पक्षातील गृहकलहाची  पुनरावृत्ती झाली आहे. अपर्णा यादव यांना समाजवादी पक्षाकडून उमेदवारीबाबत कसलेही ठोस संकेत न मिळाल्याने त्यांनी भाजपची वाट धरल्याचे मानले जात आहे. मागील २०१७ च्या विधानसभा निवडणुकीआधी मुलायमसिंह यांचे बंधू शिवपाल यादव यांनी अखिलेश यांच्या विरोधात बंडाचा झेंडा उभारत वेगळा पक्ष स्थापन केला. शिवपाल यादव यांना त्यावेळी राजकीय यश मिळाले नसले तरी ‘अखिलेश यादव स्वतःचे कुटुंब सांभाळू शकत नाहीत ते राज्य काय सांभाळणार’ असा प्रचार करण्याची संधी भाजपला मिळाली. आता शिवपाल यादव पुन्हा अखिलेश यादव यांच्यासोबत जोडले गेले आहेत. तरी अपर्णा यादव यांच्या भाजप प्रवेशामुळे शिवपाल यांच्याबाबत तर्कवितर्क सुरू झाले. परिणामी आपण अखिलेश यादव यांच्या नेतृत्वातखालीच काम करू असे स्पष्टीकरण देण्याची वेळ शिवपाल यादव यांच्यावर आली.

UP Election : तुम्ही मोदींना का नाही विचारत लग्न केव्हा करणार? काँग्रेस उमेदवाराच्या प्रकरणावर प्रियंका गांधींचा पलटवार

अपर्णा यादव यांची भाजप-योगी यांच्याशी जवळीक अकस्मात की जुनी?

अपर्णा यादव यांच्या माहेरचे घराणे गोरखपूरच्या मठाशी संबंधित आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे याच गोरखपूरचे आहेत. त्यामुळे अपर्णा यादव यांच्या माहेरच्या घराण्याचे व योगी आदित्यनाथ यांचे जुने संबंध आहेत. त्याचबरोबर अपर्णा यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत योजनेचे जाहीर कौतुक करत त्याबाबतच्या कार्यक्रमांतही भाग घेतला होता. राजकीय महत्त्वाकांक्षा असलेल्या अपर्णा यांनी एक प्रकारे भविष्यात वेळ पडल्यावर भाजपशी नाते जोडण्याची त्यावेळी पूर्वतयारीच केली होती, असे मानले जाते.

उत्तर प्रदेशात माजी पोलीस आयुक्तांचा भाजपामध्ये प्रवेश; निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याची सपाची प्रतिक्रिया

अपर्णा यादव यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपला राजकीय लाभ कोणता? आणि अखिलेश यांना तोटा कोणता?

अपर्णा यादव या लोकनेत्या नाहीत किंवा कोणत्याही विशिष्ट मतदार संघात वा भागात त्यांना मोठा जनाधार आहे असेही नाही. त्यामुळे त्यांच्यामुळे मोठा जनाधार भाजपला मिळेल, असे काही नाही. मात्र ओबीसी समाजातील नेते भाजप सोडून जात असल्याने धास्तावलेल्या भाजपला थेट यादव कुटुंबातील सूनच पक्षात आल्याने अखिलेश यादव यांच्या विरोधात वातावरणनिर्मितीसाठी एक मुद्दा मिळाला आहे. शिवाय इतर काही ओबीसी नेते पक्षातून बाहेर जाण्याआधी विचार करतील असाही भाजपचा होरा आहे. भाजपमधून तीन मोठे ओबीसी नेते समाजवादी पक्षात आल्याने प्रचारसभांच्या आधीच्या वातावरण निर्मितीच्या लढाईत अखिलेश यादव हे आतापर्यंत आघाडीवर होते. ही आघाडी मोडून काढण्यात भाजपला अपर्णा यांच्या पक्षप्रवेशामुळे मदत झाली आहे. आता अखिलेश यादव यांच्या विरोधात वातावरण निर्मिती करण्यासाठी अपर्णा यादव यांची मदत भाजपला घेता येईल.